देशाचे दुश्मन, ( भाग 15) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
सर्व राष्ट्रांचा उद्धारकर्ता ? ज्या टिळकांनी अस्पृश्यांच्या सहभोजनाच्या जाहीरनाम्यावर सही केली नाही, असल्या त्या देशघातकी सैतानाला 'देशभक्त' म्हणणे यापेक्षा मुर्खपणा तो कोणता ? सोवळ्या ओवळ्याची महती गाऊन भोळ्या ब्राह्मणेतरांच्या अज्ञपणाचा फायदा घेणारा हा चित्पावन टिळक सर्व राष्ट्राचा पुढारी होत, असे हवे तर भटांनी म्हणावे; टिळकांनी ज्या मराठ्यांना 'शूद्र' ठरविण्याचा प्रयत्न केला ते अस्सल मराठे टिळकांच्या चित्रावर लाथ मारल्याशिवाय राहणार नाहीत. अस्पृश्यांशी सहभोजनाला तयार न होता हा सहा कोटी अस्पृश्यांचा उद्धारकर्ता कसा होतो ? थांबा भटांनो, जरा थांबा ! अस्पृश्य जागे होऊ द्या ! मांजराने ताटात तोंड घातले तर ज्या टिळकोबाचे ताट बाटत नव्हते; मांजरापेक्षाही ज्यांनी अस्पृश्यांना हीन लेखले ते अस्पृश्य जागे झाल्यावर टिळकांचे पुतळे गाळात कोंबून उलटे उभे करतील आणि विरोधाच्या वडवानलात अस्पृश्यांशी रोटी व्यवहार करणाऱ्या आपल्या हौदावर त्यांना पाणी भरून देणाऱ्या त्यांना पहिल्या प्रथम शिक्षण देणाऱ्या जोतिरावांना डोक्यावर घेऊन नाचतील आणि असा जयजयकार करतील की, तो ऐकूनच राहिली - साहिलेली भटे पटापटा माना टाकतील! केवढे जोतिरावांचे दिलफाट धैर्य! भटांच्या भयंकर विरोधाला न जुमानता केवळ हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाकरिता त्यांनी हातावर शिर घेतले आणि अस्पृश्यांकरिता पहिली शाळा काढली. केवढा कर्तबगार सुधारक ! इतकेच नव्हे तर जे जातीचे कांदे रोटी व्यवहार करायला अजून दचकतात, तो व्यवहार जाहीर नोटीस देऊन त्यांनी केला. जो मनुष्य आहे त्याच्या अन्नाला बाट नाही, हे हिंदू धर्माचे खरे तत्त्व आमलात आणले. कोठे हे महात्मा जोतिराव आणि कोठे वेटिंगरूममध्ये भात खाल्ला नाही काही पोहे खाल्ले म्हणणारा लबाड टिळक ! वेटिंगरूममध्ये भात खाल्ला असता तर काय लागलीच प्राण गेला असता ? पण ब्राह्मणेतराचे सावली पडलेले अन्न टिळकांनी खाल्ले असते तर त्याचे पितर धडाधड नरकात पडले नसते का? महात्मा गांधी म्हणतात, "अस्पृश्योद्धार झाल्याशिवाय हिंदुस्थान स्वतंत्र होणार नाही." आणि हे चिपळूणकर- टिळक भटजी म्हणतात, "ब्राह्मणांनी कौन्सिलात शिरल्याशिवाय देशोद्धार होणार नाही, मराठ्यांना शूद्र ठरविल्याशिवाय ब्राह्मणांचे फावणार नाही" ही टिळकांची विचारसरणी ! आज टिळकांचे मठ्ठ शिष्य व लठ्ठ जहाल गांधीच्या दुर्दम दणदणाटाला दचकून अस्पृश्योद्धार करा म्हणतात. पण हे भटांचे सौजन्य नसून गांधीचा पुण्यप्रभाव आणि सत्य संशोधकांचा वर्मी टोला याचा परिणाम आहे. त्यामुळे त्यांना वरवरून तरी कबुली द्यावी लागते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची शाळा काढली, आपल्या घरातल्या हौदावर पाणी भरण्यास परवानगी दिली, म्हणून याच देशाच्या दुश्मन भटजींनी जोतिरावांच्या अंगावर शेणमारा करविण्यास कमी केले नाही. महाराष्ट्रात अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचा पाया जोतिरावांनी घातला आणि