देशाचे दुश्मन, ( भाग 12) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
शेवटचा धरडा लागला असेल! हातापायाला तणावे देऊन परशुरामाने भीतीने डोळे वासले असतील ! २१ वेळा क्षत्रियांचा निःपात करणारा परशुराम, १८ व्या शतकात क्षत्रियांना कुटील राजनीतीने छळू पाहणारे परशुरामीयन यांचा चिपळूणकरांनी आपल्या निबंधमालेत मोठा गौरवपूर्ण निर्देश करून जोतिरावांना हिणविले आहे. पण एकाच हयातीत ब्राह्मणांच्या शंभर हयाती जोतिरावांनी मातीमोल केल्या. चिपळूणकरांच्या पोराबाळांच्या उरावर जोतिरावांचे सच्चे चेले ब्राह्मणाचे थडगे बांधतील हा भविष्यकाळातील उघडा आराखडा पुराणांची चिपाडे चघळणाऱ्या चिपळूणकराला आकलन करता आला नाही. चिपळूणकरांना चार भटभिक्षूके मोठा विद्वान समजतात, धोरणी समजतात. पण चळवळीचे ज्ञान झाले नाही, तो धोरणी, विद्वान की ब्राह्मण्याच्या उकिरड्यावर पुराणांचा कचरा फुंकणाला लंब XXX ! विष्णूभटाने आपल्या निबंधमालेत ब्राह्मण शूद्र हे दोनच वर्ण राहिलेत असे जोतिरावांची टर उडविताना ठणकावून दिले आहे. असल्या हीन हृदयाच्या विष्णूभटाचा, मोठा महात्मा म्हणून पुतळा उभारलेला पाहून ज्या क्षत्रियाची टाळू तडकून जात नाही तो क्षत्रियच नव्हे ! असल्या देशबुडव्या व नामर्द शत्रूला मान देणे हा क्षत्रियाचा अधःपात ठरेल ! राष्ट्राच्या क्षात्रवृत्तीला तेजोहीन करणाऱ्या असल्या अवसानघातकी भटुरड्यांना शक्य त्या रीतीने तेजोहीन करून टाकले पाहिजे. कायदा सांभाळून जेवढी शस्त्रास्त्रे यांच्यावर फेकता येतील, तेवढी फेकून यांचा चक्काचूर उडविल्याशिवाय राष्ट्राला तरणोपाय नाही. अविच्छिन्न शत्रूपेक्षा हे प्रच्छन्न घरभेदीपण प्रथम नाहीसे केले पाहिजे. इंग्रजी संरक्षणाची मायापाखर या विष्णूभटावर आणि गाढ अज्ञानाची झापड अस्सल क्षत्रियावर होती, म्हणून हा विष्णूभट बचावला. आजच्या क्षत्रियांच्या उदयकालात असा एखादा तरी बरळू द्या, त्याच्या पिढ्यान्पिढ्या क्षत्रियांचे अस्तित्व पाठीवर उठलेले दिसेल ! सध्या क्षत्रिय जागे झालेत आणि हिंदू मुसलमानात विक्षेप येत चालला आहे, म्हणून भटाने क्षत्रियांचे अस्तित्व मान्य करून आपल्या आपल्या गोऱ्या गौरायांच्या संरक्षणाकरिता है। सनातन कुत्र्याचे शेपूट भीतीच्या नळीत घातले आहे. एवढी भीतीची नळी निघू द्या; पुन्हा हे शेपूट वाकडे होऊन, या जगावरील क्षत्रिय ब्राह्मण वाणीत तरी नाहीसे होणारच ! क्षत्रियांनी या पुराणांचा चोथा चघळणाऱ्या भटांच्या सम्मतीवर आपले क्षत्रियत्व ठरवू नये. ज्यांचे मनगट अजूनही पाश्चात्त्य रणभूमीवर
चढविताना क्षात्रतेज दाखवू शकते. त्या वीर मर्द मराठ्यांनी ब्राह्मणांच्या वटवटीने निस्तेज न होता आपल्या वाडवडिलांचे नाव राखले पाहिजे, आणि पुन्हा इतिहासाची पेशवाई आवृत्ती निघू नये, म्हणून हे ब्राह्मण्यांचे भूत सातपाताळ गाडले पाहिजे, या क्षात्रवृत्तीविध्वंसक तृतीयपंथी मनोरचनेचे उर्फ टिळक-चिपळूणकरांचे पुतळे कसे उभारता ! यांचे कागदाचे पुतळे करून जाहीर रीतीने जाळण्याचे सण काढा ! क्षत्रियांची मुंज करताना त्यांच्या कमरेला हिंद देवीचा उद्धार करणारे, समशेर लटकवताना परशुराम, चिपळूणकर, टिळक यांच्या मूर्ती करून आठ वर्षाच्या क्षत्रिया छाव्याकडून लाथेखाली तुडवा आणि मग शिवछत्रपतीची शपथ घ्यावयास लावा; असले छात्रविधी काढा. गुलामगिरीची ओठाळी ज्या हिसक्याने तुटेल असा हासडून हिसका मारला तर भारत मातेचा उजळ माथा व्हावयाला वेळ नको. महाराष्ट्राच्या मानगुटीवर महाराष्ट्राचे रक्त आणि अवसान यांचा फराळ करणारे हे ब्राह्मण्याचे भूत मानेवर राहिले, तर मग अस्पृश्य तर राहूद्याच, पण मराठ्यांनासुद्धा काही करता येणार नाही, एवढ्याकरिता शिवछत्रपतींनी जसे ब्राह्मणांच्या इच्छेला लाथेखाली तुडवीत राज्याभिषेक करून घेतला, त्याचेच अनुकरण करून क्षत्रियांना शूद्र ठरविणारे या टिळक - चिपळूणकरांच्या बेइमान जातभाईंच्या अडथळ्याला टाचेखाली रगडीत हिंदुस्थानच्या उद्धाराकरिता नेटाने चला. सर्व हिंदू एक होत नाहीत, म्हणून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य अडले आहे, आणि हे ब्राह्मण्य नडते म्हणून हिंदू तेवढा एकजीव होत नाही. आता मराठ्याने याबाबतीत मागे राहून चालणार नाही. ज्यांच्या पूर्वजांनी पाचोळ्याचे परमेश्वर बनून संबंध देश हालवून सोडला, त्यांनी अस्पृश्य वगैरे बांधवांना मोठ-मोठे कार्यकर्ते बनवून पुन्हा पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे. टिळकानुटिळक तुमच्या उन्नतीच्या वाटेवर अपशकून करण्याकरिता बोडके उभे राहतील, आपल्या बोडक्या विधवा आडव्या लावतील, पण त्यांच्या या राष्ट्रघातकी प्रयत्नाकडे बिलकूल लक्ष देऊ नका. ब्राह्मण लोक ब्रह्मदेवाच्या ओकारीपासून झालेले असोत किंवा
झालेले असोत, त्यांची जन्मतःच अशी वाकडी शेपटी असते, ती तापवलेल्या लाल नळकांडीत घातल्यावाचून करचळणार नाही. एखादे आठ वर्षाचे भटाचे कार्टे साठ वर्षांच्या ब्राह्मणेतराला 'ए गेन्या पाटील' असले उर्मट शब्द वापरायला कचरत नाही. देवाच्या गाभाऱ्यात एखादी डोके तासलेली जिच्या डोक्यावर रुपया छन्दिशी वाजवून घ्यावा असली बोडकी पुजाऱ्यांशी व्यभिचार करून देवाला शिवली तरी भटांचा देव 'विटाळत' नाही, पण गांधीसारखा ब्राह्मणेतर शिवला तरी यांचा देव बाटतो. केवढा हा मनुष्यजातीचा अपमान! या अघोर पातकाची झाडाझडती ब्राह्मण कशी देणार ! ब्राह्मणावर सावली पडली म्हणून मुंडी उडविणारी पेशवाई जाऊ द्या; पण आज विसाव्या शतकात ब्राह्मणाच्या प्रेताला तुम्ही शिवलात तर अधर्म होतो; हा ओंकारेश्वरी अन्याय उघड्या माथ्याने भर पुण्यात मिरवितो आहे. ज्या नराधमाची प्रेते पालथ्या मानेने न्यावी लागतील, असली मात्रागमनी भटे जन्मताच श्रेष्ठ आणि ज्यांच्या मरणाने दुनिया दुःखाने कडकडेल ते ब्राह्मणेतर जन्मत:च नीच ! हे आमचे अठरापगड शास्त्रे सांगतात आणि आम्ही ऐकतो ! ब्राह्मणेतरानो ! कुत्रे गल्लोगल्ली पोट भरून संतती उत्पन्न करू शकते, ब्राह्मणांनी तुम्हाला कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ मानले आहे का असे एखादे तरी पुराण दाखवाल काय ? गाढ अज्ञान है। ब्राह्मणेतरांचे साजशृंगार ! धुर्त लबाडी ही ब्राह्मण्यांची शिंगे ! या शिंगाने धरणीचे पोट फाडीत शेषाच्या मस्तकापर्यंत ब्राह्मणांनी पोहोचवलेली आहे. मराठ्यांनो ! माळ्यांनो, सोनारांनो, कान फाडून पुराणे काय सांगतात ते ऐका ! 'मत्स्य पुराण सत्तराव्या अध्यायात पुण्यवती स्त्रियांच्या सदाचरणाचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रियांचा धर्म सांगितला त्यात, 'अनंगदान' व्रत आहे. भडकून न जाता हा हिंदू धर्माच्या नावावरला पाजीपणा वाचा ! क्षत्रियाच्या करारी हृदया ! तू ज्यांचे संरक्षण केलेस, त्या हरामखोर लोकांचे धर्मरहस्य पहा, तुझ्या कुटुंबाकडे वाकडा डोळा करणाऱ्यांच्या डोळ्यासकट जीव गोळ्याचा खुळखुळा करून पोरांना खेळण्यास देणाऱ्या मर्द मराठ्या ! तुझ्या धर्मगुरूची ही पापी दृष्टी वाचताना भडकून बेभान होऊ नकोस ! पुराणकर्ते जेहत्ते म्हणतात, "ज्या रविवारी हस्त, पुष्य अथवा पुनर्वसू यांतले नक्षत्र येईल त्या दिवशी स्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करून मदनाच्या नामांनी विष्णुची सर्वांग पूजा करावी. नंतर व्रतात (?) विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करून एक शेर साळीचे तांदूळ घृतपात्रासह द्यावे व यथेष्ट भोजन घेतल्यावर तो साक्षात कामदेव मानून आपला देह त्याला अर्पण करावा. याप्रमाणे तेरा महिने करावे, नंतर गादी गिरद्या, मच्छरदाणी वगैरे उपसाहित्यांनी युक्त शय्या त्या ब्राह्मणाला द्यावी, एक दुभती गाय द्यावी, नंतर त्याला प्रदक्षिणा करून निरोप द्यावा. हे व्रत (?) घेतल्यापासून जो ब्राह्मण रतीसुखासाठी रविवारी घरी येईल, त्याला सर्वभावे करून मानावे. "
हा मत्स्य पुराणाचा ७० वा अध्याय ! आमच्या कन्यागमनी ब्रह्मयाच्या मुखातून पडलेल्या धर्मगुरूंची ही शिकवण ! बोला! कोणता ब्राह्मणेतर या पुराणापुढे मान लववून आपली बायको दर रविवारी भटाच्या पलंगावर चढवायला तयार आहे ? ही पुराणे जाळायला जो ब्राह्मणेतर तयार होत नाही, तो अज्ञानी तरी असला पाहिजे किंवा मत्स्य पुराणोक्त, बायको देऊन स्वर्ग जिंकणारा तरी असला पाहिजे ! या पुराणांचे पक्षपाती टिळक- चिपळूणकर ! या पुराणांचा जोतिरावांनी द्वेष केला म्हणून भटांनी त्यांना छळले ! वेश्यांनाही हाच धर्म सांगून भटांची सोय लावून ठेवली आहे. गोव्याकडे तर धर्माच्या नावाखाली शेसविधी करून जातच्या जात वेश्या बनविली आहे. नंबुद्री भटाची कारटी लग्न न करता मोपला पत्करते आणि लोठ्या ब्राह्मणेतरांच्या घरात दर रविवारी घुसत असते. ही सध्याची स्थिती! वाचकहो, या अन्यायाचा विचार करा! असल्या पुराणांची बाजू उचलणाऱ्या भटाची मायबहिण शूद्राने 'अनंगदान' देऊन पावन केली, तर ते क्षम्यच नव्हे काय ? उठ, मर्दा ! तुझ्या अब्रुवर या भटुड्यांनी पापदृष्टी ठेवली. सदाचाराच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली पूर्वजांच्या माय-माता भ्रष्ट केल्या, त्या दुश्मन भटुड्र्यांना, धर्मग्रंथांना, पोथ्यापुराणांना तू लाथेखाली तुडवून जाळणार नाहीत तर तुझे पूर्वज दुःखाने हंबरडा फोडतील! आजच्या नामर्द भटाची, हा असला धर्म आचरा म्हणून सांगायची माय व्याली नाही. पपण आजचेच भट श्रुती स्मृतीच्या खालोखाल या पुराणांना नेऊन बसवतात. त्याला टिळक - चिपळूणकर कृतीने दुजोरा देतात, याबद्दल तू काय करणार आहेस ? आंधळ्या हिंदू मर्दा, तुझ्या धर्माकरिता, धर्माच्या संरक्षणाकरिता हातावर शिर घे! आणि पहिल्या झटक्याला ही पुराणे ब्रह्माएवढी होळी पेटवून त्यात त्यांना ढकलून भस्म करून टाक ! बायका ब्राह्मणाला देणे हा धर्म ? शिवाशिव ! हे नागवे धर्मग्रंथ डोळ्यापुढे असता ब्राह्मणांशी सलोखा कसला करता ? यापेक्षा सर्पाशी मिठी मारा, तो तुमचा प्राण घेईल पण पुराणोक्त पत्नीविषयक अब्रू घेणार नाही. प्राणापेक्षा अब्रू प्यार आहे. बीभत्स पुराणे आणखी याहीपलीकडे वाहवली आहेत. राजा बाहेरून आला असता राणीच्या पलंगावरला भट
'राणी अनंगदान व्रतांनी पतिव्रता झाली' म्हणून सांगत आहे. ब्राह्मणांनो! ब्राह्मणेतर चिडतात ते उगीचच चिडत नाही. तुमची पुराणे तुमच्या हातून तुम्ही जाळली नाहीत तरी सर्व ब्राह्मणी-भटणीवर दानाचा सूड उगवला जाणार नाही, या भयाण भविष्याची खात्री कोणी द्यावी ! बायलेच्या बाबतीत जनावरालासुद्धी चिड असते. मग हिंदू जनता तर ती जसजशी जागी होणार तसतशी ह्या पुराणोक्त जखमा ठणकून संबंध देशात भयंकर क्रांती होत जाणार. या क्रांतीचा आग्यावेताळ चिथावून जाऊ नये, अशी इंग्रज सरकारची इच्छा असेल तर सरकारने चट सारी पुराणे
करावीत, त्याची एकही प्रत जवळ पाळील त्याला कडक शिक्षा ठणकवावी. अशा तऱ्हेने कडक बंदोबस्त केला तरच पुढच्या सुशिक्षित जागृत ब्राह्मणेतर जगात ब्राह्मण जातीला समाधानाने वागता येईल. ब्राह्मण लोकांनी स्वतः करिता हा खणून ठेवलेला