देशाचे दुश्मन, ( भाग 8) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
शिष्यांच्या पगड्या हिसकावण्यात आल्या. बिचाऱ्या अस्पृश्यांच्या गळ्यात तर धरणी बाटेल म्हणून थुंकण्याकरता गाडगी अडकवली ! वाचकहो ! डोके शांत ठेवून असल्या पेशवाईचा पुरस्कार करणाऱ्या टिळक-चिपळूणकरांची किंमत ठरवा. वेश्येच्या माडीवर उतरलेल्या भटावर, शूद्राच्या काखेतून पावन होऊन आलेल्या भटणीवर अस्पृश्याची सावली पडली म्हणून त्या अस्पृश्याला गुलटेकडीच्या मैदानात छाटून टाकणारे हे ब्रह्मराक्षस पेशवे आणि त्यांची परंपराच चालवू पाहणारे हे सैतान टिळक-चिपळूणकर ! जर पुनर्जन्म असेल तर पेशवाईत गारद झालेले हे सर्व जीव आज पुन्हा जन्मून ब्राह्मणांच्या चारीमुंड्या पिरगळण्यास कमी करणार नाहीत. पुनर्जन्म जितका सत्य तितकाच तो न्याय्यही ठरेल ! पेशवाईचा इतिहास म्हणजे ब्राह्मण समाजाने लिहिलेले आपले
ब्राह्मणांनी 'ब्राह्मण' म्हणून जगावे की अखिल भारतीय हिंदूत मिसळून 'ब्राह्मण्याच्या' दृष्टीने मरावे, याचा सडेतोड निकाल सांगणारे जज्जमेंट ! मनुष्याच्या खुनशी प्रवृत्तीचा उन्मत्त अतिरेक, जुलमी वृत्तीचा मस्त अभिनिवेष, धर्मसत्तेचा मिलाप होताच होणारे सैतानी खेळ पेशवाईंचा इतिहास उर फोडून सांगत आहेत. जीव तोडून गरजत आहे. जोपर्यंत जगात पेशवाईचे पक्षपाती टिळकानुटिळक गटाराने वळवळणाऱ्या गांडुळासारखे चळवळत आहेत तोपर्यंत अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न खडतर होऊन राहणारच ! कै. दास म्हणत, 'मी माझ्या स्वराज्यात ब्राह्मणांच्या मुली महार, धेडास द्यावयास लावीन.' पण हे ब्राह्मण आहेत, म्हणजे 'ब्राह्मण्य' आहे तोपर्यंत स्वराज्य मिळत नाही आणि मिळाले तर टिकत नाही. ब्राह्मण नाहीसे झाल्यावरच स्वराज्य मिळणार तर त्यांच्या मुलींकरिता कोणता जावई शोधावा, याची पंचायत पडणारच नाही. 'ब्राह्मण' ही चिज अशी आहे की, ती भेदाशिवाय जगतच नाही आणि गुलामगिरीशिवाय जन्मत नाही. पेशवाईनंतर ब्राह्मणांची निराळी आवृत्ती निघाली. सत्तेचा रेच उतरल्यामुळे पर्वतीच्या रमण्यात भटभिक्षुकांना ओगराळ्याने दक्षिणा वाटून लठ्ठभारती पोळ पोसता येईनात, तेव्हा या फुकटखाऊ पोळांचे संरक्षण कसे व्हावे; ही भटभिक्षुकांना काळजी पडली. स्वत:चे राज्य गेले आणि छत्रपतींचे संस्थान टिकले हे ब्राह्मणांना पाहवेना ! परशुरामभाऊची करवीरकर छत्रपतीने नरम केलेली हड्डी 'भटोबाच्या मनात सलत होती, खुपत होती. सातारकर छत्रपती पहिल्यापासून भटजीच्या काव्याला बळी पडले नाहीत. सातारकर छत्रपती प्रतापसिंह यांनीही ब्राह्मण्यांच्या दास्यातून ब्राह्मणेतरांना मुक्त करण्याची योग्य चळवळ सुरू केली. पेशवाई अवशेष उर्फ आताच्या टिळक पंथाचे पितामह कै. लोकमान्य