देशाचे दुश्मन, ( भाग 11) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
घशाखाली सोडणारा टिळक ! किंजवडेकर खाटकाने बोकड मारून यज्ञ केला, म्हणून महावस्त्र अर्पण करणारा तात्या अनुटिळक, करवीर छत्रपती ब्राह्मणेतरांचा पुरस्कार करू लागताच हा 'हा स्वराज्यद्रोही छत्रपती' असे म्हणू लागला, यात काही एक नवल नाही. उलट असल्या कडू अवलादीने असे म्हटले नसते तरच आश्चर्य! टिळक-चिपळूणकरांनी जो देशद्रोही पंथ निर्माण केला, त्या पंथाने महात्मा जोतिरावांचे सर्व कार्य नामशेष करण्याचा कसून प्रयत्न केला. सत्यशोधक म्हटला की त्याला हरउपायाने नेस्तनाबूद करणे हे या ब्रह्ममुखोत्पन्न जंताचे जीवितसाफल्य होऊन बसले होते. एखाद्या कोंदणातल्या कुठल्याशा 'भटाला 'देवाज्ञा' झाली तर लागलीच 'ते सार्वजनिक कार्यात (?) भाग घेत असत. ते केसरीचे एकनिष्ठ वाचक होते. असे लिहावयास केसरी चुकून विसरत नाही. पण ब्राह्मणेतराचा कसलाही अतिरथी काहीही करू लागला किंवा कैलासवासी झाला तरी भितीवरला ढेकूण मेल्यापेक्षा केसरीला जास्त विचार करवत नाही. कै. जोतिरावांची पहाडी धडाडी व अभिनंदनीय चळवळीची आघाडी ब्राह्मणी नजरेला दिसत तर नाहीच, पण दिसली तर खपतही नाही. १८२७ साली जोतिरावांचा जन्म झाला. जोतिरावांच्या जन्मदिवशीच