बारा बलुतेदार मध्येच सर्वात महत्त्वाचा घटक असतो सुतार समाज. पूर्वापार परंपरेनुसार ज्या गावात सुतार समाजाची घर नसेल त्याला गाव म्हंटली जात नसे त्याला वाडी किंवा वस्ती असे असे म्हटले जाई. या देशातील प्रत्येक गावात सुतार समाजाचे एक तरी घर असतेच. सुतार समाज हा गावाचा अविभाज्य भाग आहे. सुतार समाज म्हटले की आपल्यासमोर चित्र येते फर्निचर अथवा लाकडी कोरीवकाम अथवा गावातल्या शेतीसाठी लागणारी लाकडाची अवजारे तयार करणारा कारागीर वर्ग. सुतार समाजात आहेर सुतार, पांचाळ सुतार, लिंगायत सुतार अशा काही पोटजाती आहेत. सुतार समाजाचा समावेश प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात आहे.
आज आरक्षण मिळण्यासाठी क्षत्रिय व ब्राम्हणजाती (सुवर्ण समाज ) देखील दावेदारी करू लागल्या आहेत. पण या ठिकाणी वेगळेच घडले आहे. जागतिकीकरणाचा फटका सर्वाधिक ज्या समाजाला बसला आहे घर बांधकाम असो की अन्य फर्निचर चे कामे असून यामध्ये काळाानुसार फारच मोठा बदल होत गेलेला आहे. आणि सुतार समाजाचा हा पारंपारिक व्यवसाय संकटात सापडलेला आहे. सुतार समाजाने मात्र वेगळीच मागणी केली आहे. 'आमचे विचार प्रगत झाले आहेत, त्यामुळे आमचे आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण समाजात घ्या', अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णूगरुड व संजय भालेराव यांनी केली.
'सुतार समाज हिंदू धर्माच्या सर्व परंपरा, चालीरिती, व्रत, पूजा-पाठ नित्यनियमाने करतो. समाजातील लोक गळ्यात जानवे घालतात, मुंज करतात, धर्मग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण व सुतार यांच्यात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरांमध्ये बरेचसे साम्य आहे. त्यामुळे नव्याने जनगणना करून सुतार समाजाला खुल्या प्रवर्गात घ्यावे, या मागणीचे निवेदन प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे. लवकरच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे विष्णू गरूड यांनी सांगितले. गरुड म्हणाले. गेल्या ७० वर्षांतील आरक्षणाच्या लाभामुळे सुतार समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.
प्रतिष्ठानच्या मागण्या
1) सुतार विश्वकर्मीय समाजाला 'विश्वब्राह्मण' म्हणून दर्जा द्या.
2) दोन लाखांपर्यंतचे व्यावसायिक कर्ज विनातारण.
3) तालुका पातळीवर विश्वकर्मा औद्योगिक भवन उभारा, ग्रामीण भागातील सुतार समाजाला घर बांधणीसाठी पाच लाखांचे कर्ज द्या.
4) सामुदायिक विवाह सोहळ्याला अनुदान द्यावे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar