वर्धा, सर्कस मैदानाच्या प्रांगणात ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकमय राष्ट्रनिर्मितीचा पुरस्कार, सनातनी प्रवृत्तीला विरोध, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान ही या संमेलनाची मुख्य सूत्रे आहेत. या संमेलनात पुस्तकविक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध
सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात की त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते आणि हे विचार