लेखक - देवनुरू महादेव, 'ಆ'' ಎ$ ಎ$: ಆಳ ಮತು) ಅಗಲ' या देवनुरू महादेव यांच्या पुस्तिकेचा मराठी अनुवाद - अनुवादक - मुग्धा धनंजय
रास्वसंघाचे खरे स्वरुप आणि त्यांचे हेतू काय आहेत हे काळजीपूर्वक तपासून लोकांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण देशाला विघटित करण्याच्या दृष्टीने रास्वसंघ कसा सातत्याने प्रयत्नशील आहे हे लोकांना समजावे म्हणून हे एक छोटेसे पाऊल म्हणजे ही पुस्तिका आहे. रास्वसंघ म्हणजे काय याबद्दल उभे केलेले रम्य चित्र आणि सत्य यात फार मोठी तफावत आहेती समजावून देणे हा यामागचा हेतू आहे.
आपल्या लोककथांमध्ये एक कथा फार प्रसिद्ध आहे. एक क्रूर चेटक्या जगभर हाहाकार माजवतो, दुर्वर्तन करतो- त्याला कुणाचीही भीती वाटत नसते कारण त्याने आपले प्राण साता समुद्रापार असलेल्या एक गुंफेत ठेवलेल्या पोपटामध्ये लपवून ठेवलेले असतात. हा सुरुवातीला फक्त चेटक्या असतो, आणि मग तो बहुरुपीही होतो. तो अनेक रूपे धारण करू शकतो. त्याची वेषांतर क्षमता अमर्याद असते. आणि त्याला कुणीही काहीही करू शकत नाही, कारण त्याचा जीव, त्याचा प्राण अज्ञात अशा दूरस्थ गुंफेत सुरक्षित असतो. या भयंकरातून सुटका करून घ्यायची तर प्रथम त्याचा प्राण कुठे लपवलेला आहे हे शोधून काढावे लागेल. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. अशाच प्रकारे रास्वसंघाचा प्राण कुठे लपलेला आहे याचा शोध घेताना या संघटनेची पाळेमुळे कुठल्या प्राचीन चिखलात रुतलेली आहेत त्या चिखलाचाच मी माग काढला. मला जे दिसले ते हिडीस आहे. त्याचा एक बारीकसा अंश या पुस्तिकेत मी देतो आहे. यातून जर कुणी अधिक खोलवर शोध घेऊ लागले तर मी या माझ्या प्रयत्नाला यश आले असेच समजेन.
आता काही ऋणनिर्देश. माझे मित्र शिवसुंदर, प्रसन्न एन. गौडा, बी. श्रीपाद भट आणि प्रा. कुमारस्वामी यांच्या साहाय्यामुळे, सूचनांमुळे या पुस्तिकेतील माहिती सुव्यवस्थितपणे मांडता आली. काही संदर्भाचा कन्नडमधे अनुवाद करून दिल्याबद्दल सुरेश भट बक्रबायलू यांचाही मी ऋणी आहे.
देवू