देशाचे दुश्मन, ( भाग 14) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
गुलामगिरीतून मुक्त करण्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर ! अशी १८-१९ वर्षांच्या या महाराष्ट्राच्या मार्टिन लुथरने घनघोर प्रतिज्ञा केली. त्याकाळच्या सर्व पुरूषांत जोतिरावांचे वाचन पहिल्या प्रतीचे होते. स्वातंत्र्य मिळवू शकेल पण पहिले स्वातंत्र्य गेले का ? कसे गेले ? कोणते दुश्मन भोवले ? याविषयी जोतिरावांचे विचार चालू झाले. भारताची नाडी कशामुळे बिघडली आहे ? याचा विचार जोतिराव करू लागले. हिंदूत दुफळी म्हणून हिंदूंचे राज्य गेले. दुफळी जातीभेदामुळे झाली आणि जातीभेद ब्राह्मणांनी पाडले ! खोटे ग्रंथ, लबाड वृते, स्वार्थी धर्म या भटभिक्षुकांनी माजविल्यामुळे एकंदर राष्ट्र मानसिक दौर्बल्याने खिळखिळे झाले आहे. जोतिरावांनी विचार कर-कर केला! आणि शेवटी निश्चय करून महाराष्ट्राला गरजून सांगितले की, लढवय्या महाराष्ट्रा ! मराठी मनगटाच्या पहाड़ी देशा, तुला शूद्र म्हणणारा भटजी, कलियुगात क्षत्रिय नाहीत म्हणणारा दुश्मन, धर्माच्या नावावर तुला लुटणारा बदमाष, दरोडेखोर, धर्माच्या नावावर बायकांवर पापी दृष्टी ठेवणारा पुराणिक हेच दुश्मन, हेच हिंदूंचे, हिंदू धर्माचे आणि हिंदुस्थानचे सात जन्माचे वैरी, यांना हाकलून दे, म्हणजे तुझे कोटकल्याण होईल.
"ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून जोति म्हणे "
हे ऐकून ब्राह्मणांच्या अंगाची आग झाली. कारण ब्राह्मण म्हणजे भूदेव ! त्यांना हा 'शूद्र जोति' हाकलू द्या म्हणतो! हरामखोर, कृतघ्न चिपळूणकरांनी आपली जात दाखवून जोतिरावांवर दुगाण्या झाडल्या. ब्राह्मणांकरिताच खटपट करणाऱ्या टिळक-चिपळूणकर भटुड्यांनी राष्ट्राकरिता काय केले, हे एक तरी भटोबा दाखवून देऊ शकेल काय ? सर्व हिंदुस्थानातील सहा कोट अस्पृश्य आणि त्यांच्या दुप्पट असलेल्या ब्राह्मणेतरांना दास्यातून मुक्त करणारा महात्मा जोतिराव 'सेक्शनल' आणि तात्या, भाऊ, आण्णांच्या घशात जनतेचे पैसे कोंबणारा