Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

को.ब्रा. ची

देशाचे दुश्मन, ( भाग 6) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर

    (कोकणस्थ ब्राह्मणाची) आणखी एक निमकहराम टोळी घाटमाथ्यावर पाठी पडशी टाकून आली. अगोदरच्या ब्रह्मका सर्पांना हा 'कोब्रा' जोडीला मिळाल्यावर मग अन्यायाला, अधर्माला सीमा तरी कशी राहणार ? 'धनाजी' म्हणताच इस्लामी वारूच्या तोंडचे पाणी पळत असे. त्या धनाजीशी निमकहरामी करून, इतकेच नव्हे तर ज्या गोष्टी लिहिण्यास लेखणी शरमते आणि नरमते, असल्या गलिच्छ तऱ्हेने बाळाजीने स्वतःची शय्यासंपद धनाजीच्या घरी गहाण टाकून पेशवाई बळकावली. काही ब्राह्मण लोक बढतीसाठी कुठल्याही दाराने, कसलेही साधन हाती धरून स्वार्थ साधीत असतात. एवढे विधान ठोकायला पेशवाईचा इतिहास पुरेसा आहे. बाईल बढतीची देवघेव करून मानवी सभ्यतेला काळीमा फासणारे ब्राह्मण हे आमचे वर्णगुरू! साहजिकच आहे, ज्यांचा परात्पर परमेश्वर ब्रह्मदेव स्वत:च्या कन्येवर बलात्कार करायला भित नाही; तर त्याच्या या लाडक्या लेकरांनी स्वतःच्या मुली वशिल्याकरिता नजराणा म्हणून पाठविल्या तरी तो ब्रह्मदेवाएवढा तरी गुन्हा नाही. असे प्रकार पेशवाईत असंख्य झाले आहेत. असल्या अधमाधम ब्रह्मवृंदांची तरफदारी करणारे टिळक-चिपळूणकर हे आधुनिक वकील होऊन गेले.

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

    हिंदुस्थानच्या इतिहासात मन संतप्त करून सोडणारी आणि एकंदरीत मानव जातीला कलंकभूत होऊन राहिलेली पेशवाई उर्फ दोनशे वर्षांपूर्वीची टिळकशाही कारकीर्द सुरू झाली. या पेशवाईत काय अनाचार घडला नाही ? कसले अत्याचार झाले नाहीत ? मानवी कवटीच्या वितभर कोठडीत जेवढी म्हणून नीच कृतीची उत्पत्ती होऊ शकेल, तेवढी होऊन गेली. परमेश्वर कधीही निजलेला नसतो, पण पेशवाईचा अंमल पाहिला की, यावेळी परमेश्वर पेंगत तरी असला पाहिजे किंवा क्षीरसागराला भरती आल्यामुळे त्याला या दुर्जन पेशव्यांच्या संहारार्थ येता आले नसावे, असे वाटू लागते. इतिहास संशोधनाच्या नावाखाली हीच सोनेरी टोळी इतिहासाची पाने उलटी लिहिण्याचा पुण्याला शास्त्रीय प्रयत्न करीत आहेत. आपल्या वाडवडिलांचे काळे-बेरे, पाप-पर्वत भूतकालाच्या खोल दरीत गाडणे हेइमानी वंशजाचे शतकृत्य ठरेल, यात शंका नाही; पण आपल्या सैतानी पूर्वजांच्या कीर्ति- मंदिराचा बनावट पाया भरण्याकरीता दुसऱ्याच्या महापराक्रमाला कमी दर्जाचे ठरविण्याचा प्रयत्न करणे, हे ब्राह्मणाशिवाय दुसऱ्याच्या हातून होणारच नाही. पेशवाईचा इतिहास बदलण्याच्या या टिळकानुटिळकांचा मोठा भगिरथ प्रयत्न चाललेला असतो आणि त्याबरोबरच कर्तुम अकर्तुम शिवरायांचे अलौकिकत्व रामदासी कफनीत गुंडाळून एकजात मराठ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावण्यात येत असतो. शिवछत्रपती यांचे वंशज व मराठे यांना कागदोपत्री, हातोहाती नामोहरम करण्याची परंपरा या पेशवाईपासून तो टिळकांपर्यंत सुसंगत आहे. ज्या पेशवाईचा टिळक-चिपळूणकरांना मोठा पहाडी अभिमान होता, ती पेशवाई तरी काय होती ? टिळक-चिपळूणकरांच्या आंतेवासी आप्तेष्टांच्या पेशवाईचे वर्णन करणे फारसे अवघड नाही. कलत्र आणि जिवीत कोणत्याही पेशव्याच्या कारकिर्दीत सुरक्षित नव्हते. आजच्या पेशव्यांच्या सुतकी टिळकानुटिळकांनी किती जरी पेशवाईचे काळेबेरे झाकण्याचा प्रयत्न केला तरी इतिहास असा निःसंग आहे, की तो कोणाचीही भीड न ठेवता, शिष्टाशिष्टतेचा पडदा न ठेवता पहिल्या बाजीरावाचा बाप 'बाळाजी' का 'धनाजी' असा प्रश्न उपस्थित करायला भित नाही. इतिहासाचे एक पान सांगते की, नानासाहेब पेशवा बापाचे नाव बाजीराव लावीत होता, लागलीच दुसरे पान मल्हाररावांचा हा पुत्र असणे शक्य आहे, असे छातीठोक सांगायला कचरत नाही. जो इतिहास नारायणरावांच्या खुनाबद्दल एका डोळ्याने दुःखाश्रु ढाळतो, तोच इतिहास चुलतीवर बलात्कार करू पाहाणारा नरपशू बरा मेला म्हणून आनंदाश्रुही ढाळायला कमी करीत नाही. नारायणरावांची बायको नाना फडणीसांच्या गळ्यात मिठ्या मारते तर इकडे नाना एका सोनारणीच्या पोराला सवाई माधव करतो; हे इतिहासच सांगत आहे. पेशवाईच्या भर आमदनीत नाना फडणीसांनी घासिरामी साधनावर एकही भटीण धड ठेवली असेल काय ? ज्याने स्वामिनीवर पापदृष्टी ठेवून शेवटास नेली, तो पुरुष जातीला कलंकभूत होऊन राहिलेला नाना फडणीस इतर सरदारांच्या आया-बहिणी दासी - बटकीपेक्षा जास्त किंमतीच्या कशा समजणार ? पुढे शेवटच्या रावबाजीने तर काय पुणेच डोक्यावर घेतले. बायको घेऊन वाड्यात गेला नाही, म्हणून बापू गोखल्याची पाट थोपटताना आजच्या भटांना कढी वरपण्यासारखे अवसान भरते, पण यावरून बापूशिवाय सर्व भटांच्या बायका वाड्यावर रात्र-दोन मुक्काम करीत होत्या. हे ब्रह्ममुखानेच सिद्ध होत नाही काय ? ब्राह्मणांच्या बीजशुद्धीचा टेंभा मिरवून प्रभू जातीला संकरज म्हणणाऱ्या राजवाड्यांनी या पेशवाईत गडबडगुंड्यावरून तरी ब्राह्मण जात



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209