Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

देशाचे दुश्मन

देशाचे दुश्मन, ( भाग 3) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर


     टिळक आणि चिपळूणकर ! दीन-दुबळ्या दुनियेचे धुरंधर पुढारी ! राष्ट्राला खडबडून जागे करणारे नवयुगीन भारताच्या नवचैतन्याचे विद्युतप्रवाह ! देशाभिमानाच्या चळवळीचे आद्यजनक ! लोकनायकांचे नेते, स्वदेशीचे प्रणेते, स्वकीयांचे चाहते आणि विद्वत्तेचे भाते ! देशाभिमान टिळकांचा व लेखाभिमान चिपळूणकरांचा' अशी जोडी मागे झाली नाही; सध्या नाही व पुढे होणार नाही. देशबंधु दास मेले पण त्यानेसुद्धा टिळकांच्या मरणाइतके देशाचे नुकसान झाले नाही; व पुढे होणार नाही. ब्रह्मदेवाने जेव्हा सद्गुणांचे सहस्रभोजन घातले, टिळक-चिपळूणकर नावाची दोन भटे इतकी तुडुंब जेवली की, दुसऱ्यांच्या वाट्याला जायला सद्गुण शिल्लकच राहिला नाही. पश्चिमेचा उद्धार करण्याकरिता आकाशातल्या बापाचा एकच पूत धावत आला, पण पूर्वेचा ब्रह्मांड पांडित्याचा झेंडा फडकविण्याकरिता ब्रह्मदेवाच्या मुखातून एक पलटणच्या पलटण येथे आली आहे. या पलटणीचे कर्ममार्तंड (कमांडर) कै. टिळक आणि चिपळूणकर हे होत ! टिळक-चिपळूणकर देवबाप्पाच्या भगतगणांनी आपल्या आराध्य देवतेचा असा महागजर चालविलेला असतो की, हे 'टिळक - चिपळूणकर' काय गौडबंगाल आहे, असे वाटू लागते. टिळक- चिपळूणकरांची

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

कीर्तीदुदुभि

    एवढा आटारेटा करून जी दुमदुमली जात आहे, याच्या बुडाशी खरोखरीच काही नौबदी कारण काय आहे, याचा विचार करू. टिळक-चिपळूणकर विद्वान मुत्सद्दी होते म्हणून त्यांच्या नावाने एवढा की जय' होत आहे म्हणावे, तर रानडे-आगरकर, गोखले यांच्या खंबीर विद्वत्तेपुढे व गंभीर मुत्सद्दीपणापुढे हा टिळक-चिपळूणकरी थाट दुबळ्या कलावंतीणीने केलेल्या नकली शृंगारासारखाच हीणकस ठरत आहे. निर्भिड, बिनतोड आणि धाडसी मत प्रतिपादण्याने 'टिळक महाराज की' होत आहे म्हणावे, तर राजारामशास्त्री भागवत, यांच्यापुढेही टिळक-चिपळूणकरी निर्भिडता, महाराणीमागे लुब्रेपणाने फिरणाऱ्या दासीपेक्षाही हीनवृत्त आणि स्वार्थलोलुप ठरेल ! दिलफाट स्वार्थत्यागाच्या महायज्ञाने यांच्या कीर्तिचा धूर आकाशात चढला म्हणावा, कै. दास, देशसेवेमुळे कोट्याधिशांचे भिक्षाधीश झाले आणि टिळक-चिपळूणकरी दुक्कल केवळ चळवळीच्या नावावर वाघ्याचे पागे आणि भटजीचे शेटजी बनले. महामर्दुमकीने इंग्रज बहादुरावर खूप शर्तीने चढाई केली म्हणून या परशुरामियांची भलीभलाई बहारली, या म्हणण्यात मात्र जेवढा तथ्यांश तेवढा मिथ्यांश आहे. इंग्रजांच्याविरुद्ध या परशुरामियांनी रणशिंग फुंकले म्हणा, की

संध्येची पळी

    आपटून महाध्वनी केला म्हणा, इंग्रजाविषयी या ब्रह्म-मुखकुलावतंसांच्या मस्तकात तिडीक आणि हृदयात तिरस्कारयुक्त द्वेष मात्र होता. प्रश्न एवढाच आहे की ब्राह्मणांचे राज्य टोपीकर बूटवाल्यांनी घेतले, म्हणून तिडीक होती, का खरोखरीच सर्व जनतेला मुक्त करण्याकरिता होती ! टिळक-चिपळूणकरांच्या ढोबळ चरित्रावरून ही दुक्कल महान देशभक्त होती असे हमखास वाटू लागते. आणि परप्रांतीय हिंदसेवक वरवरच्या भपक्याला फसलेही आहेत ! पंजाब म्हटले की, लाला लजपतराय यांची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते, बंगाल शब्द उच्चारला की पाल, दास, वगैरे अनेक अतिरथी दिसू लागतात आणि महाराष्ट्र म्हटले की टिळक - चिपळूणकर - केळकर- लवाटे कवडे-देवधर हाटेलवाले, जोशी खानावळवाले अशी बडीबडी देशाची भक्ताळ धेंडे दिसू लागतात. महाराष्ट्राचे मुख्य केसरीपत्र. या मुखाला बत्तीसच काय पण छत्तीस दात आहेतच. प्रत्येक दात चावण्याच्या सनातन सवयीने इतका सुंदर आणि सुजरा बनला आहे की, ब्राह्मणाशिवाय कोणी दुसरा डोके काढू लागला की, त्याच्या नरडीला हा दात लागलाच. टिळक-चिपळूणकरांच्या चरित्राचे निःपक्षपातीपणाने निरीक्षण करणाऱ्यास टिळक-चिपळूणकर देशभक्त नसून अत्यंत नीचकोटीतले

देशाचे दुश्मन

    होते, हे सहजच पटणारे आहे. पंढरपूरच्या वारीला खऱ्या संतांसोबत काही भामटेही 'ग्यानबा तुकाराम' म्हणत जात असतात; भोळे-भाबडे त्याच्याही चरणांवर मस्तक ठेवीत असतात. तशातलाच प्रकार टिळकांच्याबाबतीत झाला आहे. लाल, पाल व दास या महासाधुंच्या स्वातंत्र्य-देवीच्या दिंडीत टिळकोपंत आपल्या लग्यावर रोख ठेवून खऱ्या संतापेक्षाही मोठा अर्विभाव आणून 'जयहरी' म्हणत राहिला; लोकांनी म्हटले, वाहवा टिळक वाहवा ! पण सोंग टिकणार किती दिवस ! अखेरीला हा संत नव्हे तर सैतान आहे. हे आपोआप सिद्ध होत गेले. स्वातंत्र्य तर राहूद्याच, पण लांछित स्वराज्याच्या हप्त्याचा एक तुकडा मिळतोसा पाहून हा सोंगाड्या चोर एकदम जागा झाला आणि 'महाराष्ट्रीयांनो, मी तुमच्याकरिता धडपडत आहे' असे जेव्हा तेव्हा ठासून सांगणाऱ्या टिळकांनी महाराष्ट्रीय समाजाला दुखविण्यास व लाग साधण्याचा बेत करण्यास कमी केले नाही. टिळक ब्राह्मण जातीकरिता स्वराज्य मागीत नाहीत, मिळाले तर सर्वांना मिळेल, असे प्रौढीने भूल देणाऱ्या टिळकांचे अंत:करण अथणी मुक्कामी बाहेर पडले; 'शिंप्यांना कौन्सिलात जाऊन काय मशिन चालवायची आहे ? कुणबटांना काय नांगर धरायचा आहे ? वाण्यांना काय तागडी धरायची आहेत?' ही टिळकांची हृदयरचना दाखविणारी ब्राह्मणी वचने टिळक माऊलींच्या मुखातून बाहेर पडली. ही मुक्ताफळे बाहेर पडताच भटभिक्षुकांनी आता आपल्या हाती स्वराज्य पडणार ! या आनंदाने टाळ्या पिटून परशुरामवासी पेशवाईला आनंदाश्रू ढाळावयास लावले ! प्रत्येक भारतीयाला समान हक्क प्राप्त करून देण्याकरिता चित्त, वित्त वेचणारे कोठे लाल, पाल व दास आणि आपल्या भटभिक्षुकाकरिताच शेंडी झाडून स्वराज्य मागू पाहणारा कोठे राष्ट्रीय दरवडेखोर टिळक ! टिळकांच्या या अथणीच्या व्याख्यानाने उर्फ भामट्याच्या कबुलीजबाबाने टिळकांचे लोकमान्यत्व तर तिरडीवर चढलेच पण ब्राह्मण म्हटला की कसा पहिल्या प्रतिचा हलकट आणि अव्वल दर्जाचा अधम असतो याची जाहीर प्रचिती सर्व समाजाला आली. शिंपी, सोनार, माळी, मराठे आदिकरून जनतेच्या खऱ्या प्रतिनिधींना कौन्सिलात जायचे नाही तर परान्नपुष्ट आणि खाल्ल्याघरचे वासे मोजणाऱ्या भटभिक्षुकांनी कौन्सिलात घुसायचे? पण गंमत अशी आहे की टिळक इतके मनाचे कुजकट आणि कृतीचे हलकट होते, म्हणूनच त्यांचा बोलबाला चालविला आहे. टिळक- क- चिपळूणकरांचा बोलबाला रानडे, आगरकर, गोखले, फुले, भागवत यांच्यापेक्षाही जास्त माजवला जातो, याचे इंगितच मुळी हे आहे. रानडे, आगरकर काय देशभक्त नव्हते ? पण त्यांनी ब्राह्मणांचे स्तोम माजविण्याचा टिळकासारखा पाजीपणा केला नाही, म्हणून बिचारे आर्यांचा उद्धार करायला आलेल्या या चितेपासून निघालेल्या भूतांच्या अवकृपेला कारण झाले. टिळक- चिपळूणकरांची आरती जशी जनता जागी होईल, तसतशी आपोआप कमी होऊन, टिळक - चिपळूणकर या दोन चितोत्पन्न चित्पावनांची खरी ओळख पटत जाणार आहे ! टिळकांच्या बाजारबुणग्या भगतात एकजात चितोद्भव लोकांचा एकरकमी भरणा आहे !! हेच ब्रह्मयाच्या लाळेतून लोळत आलेले लघळलुच्चे टिळकांना तीन दिडक्याचा



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209