देशाचे दुश्मन, ( भाग 10) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
होते. भगवान बुद्ध, महावीर, तुकाराम वगैरे संत-महंतांनी ब्राह्मणावर हल्ले फेरहल्ले चढविले पण ते त्यांच्यानंतर सर्व निष्फळ ठरले. म. जोतिरावांनी हिंदू समाजाला झालेल्या रोगाचे बिनचूक निदान केले; रोग बरे तर करायचेच पण जे ब्राह्मण्य तेच नाहीसे केले म्हणजे पुन्हा भीती राहणार नाही आणि अत्यंत धैर्याने जीवावर उदार होऊन हिंदूंचा उद्धार करण्याकरिता जोतिरावांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यसमाजाची पुण्यात स्थापना केली. पुण्यासारख्या ब्राह्मण्याच्या माथ्यावर मारलेली ही जोतिरावांची सत्यसमाजाची मेख मस्तक भेदून आरपार काळजापर्यंत गेली आणि पक्की रूतली की ब्राह्मण्यांच्या घटका मोजीत, नाकी सूत धरण्याखेरीज त्याच्या भगतांना आता दुसरा उपाय राहीला नाही. पळीपळी दूध घालून मरत्या ब्राह्मण्याला हुशारी आणण्याचा प्रयत्न होत आहे. पण ही सत्यसमाजाची मेख आता या ब्राह्मण्याला ओंकारेश्वरावर पोचविल्याशिवाय सोडीत नाही, त्याला ब्राह्मण तरी काय करणार ? उलट्या दारात उलटा दांडा ठोकून सुलटा सरळ मार्ग करणारा वक्र मुत्सद्दी, धैर्यशाली पुढारी ब्राह्मणांना लाभला, पण याने ब्राह्मणशाही पित्त सर्वांग खवळले, आणि एखाद्या दारूड्यासारखे तोंडी येईल तेवढे ओकले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्यापुढे या टिळक-चिपळूणकर गाढवांच्या पोरांनी आपल्या बापाची म्हणजे गाढवाची मिरवणूक काढून स्वत: च्या उत्पत्तीची खूण पटवली. पेशवाई असती तर जोतिरावांना हत्तीच्या पायी बांधले असते, कडेलोट केला असता, पण ज्या इंग्रजामुळे चिपळूणकराला हे शासन करिता येईना त्याच इंग्रजावर या भटबहाद्दराने खार खावयास सुरवात केली. इंग्रजी राज्य जोतिरावांचे
तयार नाही. यामुळे चिपळूणकरादी भटाभिक्षुकांना कलियुगाचा मोठा दरारा बसला • आणि कलियुग उलथून सत्ययुग आणावयाचे असेल तर पहिले इंग्रज हाकलले पाहिजेत, असा चिपळूणकरांनी लेखणीचा चंग बांधला. 'शूद्र' वर डोके करून ब्राह्मणांची बरोबरी करू लागतात हा केवढा अधर्म ! विष्णुभट चिपळूणकरासारने जोतिरावांवर आपल्या निबंधमालेत जे शिंतोडे उडविलेत, जे वाक्प्रहार केलेत त्यावरून या मग्रूर कुत्र्याला गोळी घालून कोणी मारले असते तर तो देवाघरी अन्याय ठरला नसता. या मस्तवाल कुत्र्याचे शिष्य बाळभट टिळक ! सत्तेचा यांना शोष पडला होता. तो सयाजीराव गायकवाड, त्याने भटाची खिचडी बंद करून यांची पेशवाई परंपरा उर्फ ऐतखाऊ झब्बूशाही मोडली म्हणून टिळकांची पगड़ी रागाने हातभर वर चढली. सत्ता असती तर सयाजीरावाला या पेशव्याच्या मानसपुत्राने केस धरून खाली खेचला असता. सम्मती बील, पुण्याची सामाजिक परिषद यावेळी या बाम्णांना आपल्या हातात सत्ता नाही म्हणून आपली फजिती होते, हे कळून चुकले. करवीर छत्रपतीला टिळकांच्या पूर्वज पेशव्यांनी शूद्र ठरविले असता, हा शाहू छत्रपती क्षत्रिय म्हणवून घेऊ लागला. 'अरे कुणबटा ! यदोक्त म्हणतो काय' अशी निर्लज्ज टवाळी करायला टिळकानुटिळकांना शरम वाटली नाही. हातात सत्ता नसल्यामुळे ब्राह्मण्याचा
होत आहे, याची खूणगाठ टिळकांनी मनात बांधून, सत्ता काबीज करण्याकरिता कंबर कसून प्रयत्न चालविले. केसरी ऑफिस सर्व ब्राह्मणांनी, त्यातून चित्पावनांनी गजबजून सोडले. कोणतीही टिळकांची संस्था घ्या, तिथे शेणातल्या किड्याप्रमाणे चित्पावन बुजबुजलेले दिसावयाचेच. 'अहोरूपम्' 'अहो ध्वनिः' या न्यायाने टिळकांनी नरसोपंतांना म्हणावयाचे 'वाहवा नरसोपंत ! आपले नाक अजून शाबूत आहे असे तुम्ही दाखवा.' नरसोपंतांनी उलट टिळकांची पाठ थोपटायची व म्हणायचे 'वाहवा ! बळवंतराव, आपल्या शेपटीला इतक्या पापानेसुद्धा अजून किडे पडले नाहीत.' असे एकमेकांची स्तुती करणारी एक टोळीच जमा झाली; महाराष्ट्राचे लाखो रूपये लुटून हमालाचे न्याहाल बनले. ब्राह्मण्य जगविण्याकरिता सत्ता मिळवू पाहाणारे टिळक आपल्याला विसरणार नाहीत, म्हणून प्रथम बरेचसे भोळे ब्राह्मणेतर त्यांच्या पाठी लागले होते. पण 'इथे माझा तात्या, हे माझ्या आण्णाला हे माझ्या बापूचेच, याला भाऊशिवाय कोणी हात लावू नये.' इतकी नीच व स्वार्थी बुद्धी जेव्हा टिळकांची दिसली, तेव्हा ब्राह्मणेतरच काय पण त्यांचे शिष्य म्हणविणारे
हे ब्राह्मण गृहस्थसुद्धा बिघडून टिळकांच्या घशात उतरलेल्या जनतेच्या पैशाचा हिशेब जाहीररितीने प्रसिद्ध करू लागले. आपल्या स्वार्थाच्या विरूद्ध जाणाऱ्याशी ब्राह्मण जात कशी वागते, हे कोल्हटकरांच्या छळावरून दिसत आहे. विरूद्ध ब्राह्मण गेला तरी तो नीचशिरोमणी टिळक आपल्या शिष्याहाती त्याला छळतो, तो ब्राह्मणेतरांना किती त्रास देत असेल ! ज्यांना आपल्या आयाबहिणींच्या डोक्यावर न्हाव्याचा विळ्यासारखा वस्तरा सप्ताही फिरताना पाझर फुटत नाही, त्यांना तुमच्या गर्दनावरून सुरा फिरवताना दया कशी येणार ? ब्राह्मणांची चैन बंद करून ब्राह्मणेतरांना छळता येईना, म्हणून इंग्रजावर त्यांचा डोळा. इंग्रज सोडून मराठ्यांचे राज्य असते आणि त्यांनी ब्राह्मणांचा यज्ञ आरंभिला असता तरी भटांनी राजद्रोह केला असता, हे शिवछत्रपतींपासून कालच्या शाहू छत्रपतींपर्यंत सप्रमाण सिद्ध होत आहे; यांना फक्त ब्राह्मणांची सत्ता पाहिजे होती. स्वकीयांची सत्ता पाहिजे म्हणावे तर शाहू छत्रपती, सयाजीराव गायकवाड हे काय परकीय राज्यकर्ते होते ? पण ते ब्राह्मणाचे गळू कापू लागल्यामुळे या टिळक महाटिळकांचे माथे भणाणले आणि आपण बाळाजीपंत नातूचे अस्सल सुतकी कसे आहोत; हे जाहीर रितीने दाखवून दिले. चुकूनही ब्राह्मणी जहागिरीवर वाकडी नजर न करणारे टिळकानुटिळक, ब्राह्मणेतर संस्थानिकांचा कोठे वाकडा पाऊल पडतो आणि कोठे आपण आपला पेशवाई सूड उगवतो, याकरता टपलेले असत. देश म्हणजे ब्राह्मण, देशसेवा म्हणजे भटांच्या चरणांवर
'घालिन लोटांगण वंदिन चरण'
देशोद्धार म्हणजे निरनिराळे फंड काढून भटमाऊलीच्या मुखात चारा, पेंड, सरकी कोंबणे ! देशाचे शिक्षण म्हणजे चार भटांची कारटी एके ठिकाणी करून त्यांना घटापटांच्या खटपटी करावयास लावणे हे राष्ट्रीय शिक्षण ! दुसरे कसलेही शिक्षण असो, नोकरी असो, वर्तमानपत्र असो, नाही तर पुस्तके असोत, प्रत्येक ठिकाणी भट घुसाडणे ही टिळकांच्या चरित्रातील सूत्रबद्ध आचारपद्धती वाचकांनी लक्षात घ्यावी. विलायतेला जाऊन आला म्हणून प्रायश्चितादाखल