बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
पुरोहीत वर्गाने दगडाचे देव निर्माण करून देवांना आपल्या उपजिवीकेचे साधन बनविले. धातुच्या व दगडाच्या वेगवेगळ्या मुर्ती तयार करून बहुजनांना उपासना करावयास तसेच अनेक नद्यांना तिर्थस्थान बनवून त्यात बहुजनांना बुड्या मारावयास लावीत आहेत. कुठलाही देव आपली मनोभावे सेवा करणा-या ख-या, दुःखी भक्ताना कधीही सुखी करीत नाही वा जो पाप व भ्रष्टाचार करतो, लोकाना लुबाडून श्रीमंत बनतो अशाचेही देव काही बिघडवीत नाही वा त्याला शिक्षाही करीत नाही. या देशावर मुसलमानानी अनेक स्वा-या केल्या,लाखो लोकाना ठार केले. अनेक स्त्रियांचा उपभोग घेतला.शोषण करणारे व अत्याचारास बळीपडणारे कोणत्या तरी देवाचे निस्सीम भक्त होते. पण त्या देवाने या भक्ताना वाचविले नाही. ज्यानी या लोकाना ठार मारले त्याना त्याच्या देवाने अत्याचार न करण्यासाठी प्रवृत्त केले नाही. ही खरी वस्तुस्थिती ब्राम्हणांनी कधीही बहुजनाना सांगीतली नाही. उलट आपली पापे लपविण्यासाठी मुसलमानी आक्रमकांना प्रसिद्धी दिली. आपला व्यभिचार खपविण्यासाठी देवानाच व्यभिचारी बणविण्यात आले. देवदासी प्रथेचा जन्म याच व्यभिचारातुन झाला. देवदासी प्रथेची निर्मिती करुन देवाच्या नावावर देवदासीचा उपभोग पुजारी व महंत घेऊ लागले. बहुजनातील सुंदर मुलींना देवदासी बनण्यास भाग पाडले जात असे व त्यांचे शोषण करण्यात येत असे. महाराष्टात विठठलाचा वैदिक आर्यानी स्वत:साठी भरपुर उपयोग करून घेतला. वैदिकांच्या कथेनुसार पांडुरंग प्रसन्नपणे लोकाना भेटत असे. सगळीकडे दैवी चमत्कार होत असे. विठ्ठलाच्या संतासोबत बनावट भेटी घडवून आणण्यात आल्या. ह्या भेटी कधी सावता माळी,कधी गोराकुंभार,कधी चोखामेळा, कधी संत रोहीदास, तर कधी नामदेव यांच्याशी होत असत. ब्राम्हणांनी समाजात रोज नवनवीन बातम्या पसरविणे सुरु केले.कधी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले, कधी भिंती चालविल्या, कधी पांडुरंगाने महाराचा वेष घेतला, कधी नामदेवाच्या घरी पाणी भरत आहे, कधी रोहीदासाच्या घरी जोडे शिवत आहे, कधी चोखोबाबरोबर जेवत आह, कधी मेलेली माणसे जिवंत होत आहेत, कोणी पुष्पक विमानाने स्वर्गात जात आहे तर कधी पाण्यात बुडविलेल्या वह्या (पोथ्या)आपसुकच कोरड्या होऊन वर येत आहेत. अशा खोट्या अफवा बहुजनात पसरविण्यात आल्या.
अल्लाऊद्दिन खिलजी हा आपल्या दहा पंधरा हजार सैनिकाबरोबर विध्यांद्री ऊतरून महाराष्ट्रात आला व थेट रामदेवरायाच्या देवगिरीवर चढाई करून हरीभक्त रामदेवाच्या अफाट संख्येच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचा पुरता पराभव केला. बहुजनाच्या कत्तली केल्या.मंदिरे लुटली तेव्हा चमत्कार करणारा व दृष्टांचे संहार करणारा पंढरीचा विठोबा कुठे होता?. हिंदूच्या प्रत्येक देवास चार ते सहा हात असुनही त्या देवाने त्याला का रोखले नाही?. माझ्या हरीभक्ताला मारणारा तू कोण? असे म्हणत कोणत्याही देवाने अल्लाऊद्दिनला सिहासनावरून खाली खेचले नाही. अल्लाऊद्दिन देवगीरीची ऐसीतैसी करीत होता तेव्हा झाडून सारे देव कधी रोहीदासाला चप्पल शिवायला मदत करीत होते तर कधी जनाबाई सोबत दळण दळीत होते. देवास त्या राक्षसी अल्लाउद्दीनच्या अत्याचाराचा राग आला नाही व कोपलाही नाही पण इकडे एखादा हिंदू नवस फेडायचा विसरला कि देव त्यावर कोपतो. त्याचा सत्यानाश करतो. सत्यनारायण घरात नाही घातला व वास्तुशांती केली नाही तर घराला भुतबाधा येते. घरात सैतानी राज्य वास करते. असे भोळ्या बहुजनाला ब्राम्हणाकडून सांगण्यात येत असे. रामदेवराय हा निस्सीम रामभक्त व विठ्ठलभक्त होता. नियमीत देवाची व ब्राम्हणाची पुजा करीत होता तरीही त्याचे राज्य चकनाचुर झाले. देव त्याचे राज्य बुडत असताना धाऊन गेला नाही. यावरून ईश्वर वा देव हा मुळी नाहीच तर ती माणसाच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराज हा अल्लाऊद्दीन खिलजी व रामदेवरायाचा समकालीन. ज्ञानेश्वराने रेड्याला बोलायला लावले व भिंत चालवली असे काहीजण प्रसार करतात. एवढी शक्ती ज्ञानेश्वरात होती असे मानले तर अल्लाऊद्दीन खिलजीच्या सैनिकींसमोर भिंती आडव्या का केल्या नाहीत?. आपल्या शक्तीने त्याच्या सैन्याला का रोखले नाही?. अल्लाऊद्दीन खिलजी तुझ्यावर चाल करून येत आहे अशी एक सुचनाही त्यानी रामदेवरायास का दिली नाही?. ज्ञानेश्वराचे समकालीन विज्ञानवादी संत नामदेव म्हणतात.
जो देव आहे असे म्हणतो तो पाखंडी,लबाड व चालाक असतात देव दाखविल ऐसा नाही गुरु ! जेथ जाय तेथे दगड शेंदरू !
संत म्हणतात देव दगड धोंड्यात नाही तो माणसात आहे. जे लोक देवाची उपासना करतात ते पापीच असतात. त्यांच्या हातातून भंयकर चुका झालेल्या असतात किवा नेहमी होत असतात त्या पापातुन मुक्तता मिळविण्यासाठी तो उपासना करीत असतो. पण जो सत्याने चालतो तो कधीही उपासना करीत नसतो.त्याला त्याची काही गरज नसते.काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज पुरता अडकलेला आहे. असंख्य असा पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. बहुजन समाज हा ऐतखाऊ व परोपजीवी लोकाना जगवून स्वत: भयंकर दुःखी व दारिद्र्यात जीवन जगतो. कुठल्याही देवाची उपासना केल्याने पुण्य मिळत नाही. कारण सर्व देवांचा ऊगम हा पुरोहीत ब्राम्हणांच्या कल्पनेतून झाला आहे. त्यामुळे देवांच्या उपासनेत बसणे हे आपल्या आयुष्यातला अमुल्य वेळ खर्च करणे होय. उपासतापास,जत्रा व तिर्थक्षेत्राला गेल्याने विनाकारण आपण मेहनतीने जमा केलेले धन ब्राम्हण पुरोहिताच्या खिशात जाते व आपल्या दारिद्र्यात भर पडून आपला विकास खुंटवतो व ब्राम्हणांचा विकास वाढवितो.
देशात नवनवी मंदिरे बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यापासून ते उद्योगपती पर्यंत सर्वानी या कार्यात वाहून घेतले आहे. मंदिरे उभे करण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकारणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दान देतात. परंतु मंदिर पुर्ण होई पर्यंत कोठेही न दिसनारा भट-ब्राम्हण मंदिर पुर्ण होताच पुजेच्या नावाने मंदिराचा ताबा घेत असतो. आज तर जिथे वस्ती तिथे मंदिर ही संकलपना देशात रुजवून भट-ब्राम्हणाला रोजगाराच्या संधी उपलबध्द करुन दिल्या जात आहेत.
ईश्वराच्या (देवाच्या) पुजा अर्चा, पुजेचे स्थान, साहित्य व मंत्र हे ब्राम्हणानी रचलेल्या काल्पनिक कथा द्वारेच होत असते. भट-ब्राम्हण सांगतील ति पुर्व दिशा, केवळ त्यांचा शब्द हा अंतीम, त्यात कोणाचिही लूडबूड नाही, ईश्वराचीही (देवाचीही) नाही.
ब्राम्हण हिंदू धर्मात आपले वेगळेपण जपत आहेत. हिंदू बहुजनापेक्षा आम्ही वेगळे आहोत हा अहंकार जपण्यासाठी ते गळ्यात जानवे घालतात, डोक्याला शेंडी ठेवतात व कपाळाला भस्म लावतात. हे अवलियापण आपण ईतरपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी करीत असतात. ह्या गोष्टीचे ते सार्वजनीक ठीकाणी उघड दर्शन घडवित असतात. वर्ण व जातीचा उच्चतम टेंभा मिरवून ते बहुजन समाजाला वर्णव्यस्थेतील त्यांची जागा दाखवित असतात. आज बहुजन समाज त्याकडे केविलवाने बघण्याशीवाय काहीही करु शकत नाही. कारण धर्माची सत्ता ज्यांच्या हाती तोच सर्वांचा उचापती हेच आजचे समीकरण झाले आहे.