बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
ब्राम्हणांच्या पशुहत्येवर आणि मांसभक्षणावर चार्वाक, बुध्द व जैन यानी जबरदस्त हल्ले चढविले.गौतम बुध्दानी आपल्या विचाराने सामाजीक क्रांती केली. 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय' चा मंत्र दिला. वैदिक ब्राम्हणाच्या हिंसेला बुध्दानी अहिंसक पध्दतीने उत्तर दिले. बहुजनाना अहिंसेचा महामंत्र दिला. त्यामुळे गौतम बुध्दाच्या विचारावर लोक भाळू लागले व त्यांचे विचार अमलात आणू लागले. त्यामुळे सगळीकडे शांतता नांदत होती. अहिंसा बंद झाली होती. बहुजन समाजाने बुध्दाची विचारसरणी स्विकारल्यामुळे वैदिक ब्राम्हणाना कोणीही विचारीनासे झाले. त्यामुळे आर्य ब्राम्हण रॉमेलियन सरड्यासारखे रंग बदलू लागले. बरेच ब्राम्हण ब्राम्हणत्वाचा रंग लपवून भिक्षुक व बौध्द धर्मीय बनले. गौतम बुध्दाच्या मृत्युनंतर धम्मात शिरलेल्या वैदिकांनी बौध्द धर्मात फेरफार केला. आपले विचार त्यात घुसडविले.
पुष्यमित्र शुंग या ब्राम्हण सेनापतीने राजा अशोकाचा नातु बृहदथ याचा खुन केला व स्वत:ला राजा घोषित करुन देशात प्रतिक्रांती केली. बौध्द भिक्षुकाचे मुंडके आणून देणार्यास बक्षिस घोषित करण्यात आले. नालंदा व तक्षशीला सारखी अनेक जागतीक विद्यापीठे नष्ट केली. प्रत्येक गावातील विहारे नष्ट करुन त्यावर मंदिरे बांधली. बुध्द धम्मीय बहुजन जनतेला अनन्वित छळण्यात आले. पुष्यमित्राच्या माध्यमातून ब्राम्हणांना राजकीय सत्ता मिळाल्यामुळे वैदिकांनी बुध्द धम्मीय बहुजनासाठी चौथा शुद्र वर्ण निर्माण करुन माणुसकीचे हक्क नाकारले. बहुजनाच्या मुखातून बुध्द धम्म या शब्दाचा ऊच्चार निघाला तर त्यांच्या जिभा कापण्यात येत होत्या. या भीती मुळे बहुजन समाज बुध्दाला व त्याच्या धम्माला पुर्णपणे विसरला व अरबानी दिलेल्या हिंदु या शब्दाला कवटाळून बसला. पुढे पुढे तर आर्य ब्राम्हणानी स्वत:ला अहिंसक व मांस न खाणारे आम्हीच आहोत असे घोषित केले. असे वातावरण निर्माण केले की जणू तेच या देशातील अहिंसेचे आद्य प्रवर्तक आहेत.गाय खाणारे व यज्ञात पशुचा बळी देणारे आर्य ब्राम्हण हे गोहत्या मोठे पाप आहे असे सांगन गोहत्येच्या चळवळीही करु लागले. आताचे आर्य ब्राम्हण की ज्याना गाईला चारा कसा घालतात ? व दुध कसे काढतात ? ते माहीत नाही. तेच गाईच्या रक्षणाचे प्रणेते बनू लागले आहेत.
आर्य ब्राम्हणानी बुद्धासोबतच दुसर्या बहुजन पुरुष राम व कृष्ण या लोकप्रिय बहुजन नेत्यांना विष्णुचे अवतार बनविले व त्याना वेगवेगळे रुप दिले.नव्या गोष्टीना विरोध करायचा आणि त्या फायद्याच्या आहेत असे दिसू लागले की त्याचेवर हक्क सांगायचा. दुसर्याने तयार केलेले धान्याचे खळे आपण लुटून न्यायचे हे ब्राम्हणाचे नितीतंत्र आहे. दुसर्याच्या ताटाचा सुखापभोग़ घ्यायला ब्राम्हण हे नेहमी तत्पर असतात. ते छोट्या छोट्या संस्कृतीला गिळंकृत करीत आहेत. त्याना निष्प्रभ करुन इतिहासाच्या पानातून मिटविण्याचे षडयंत्र रचत आहे. अलिकडे बौध्द, जैन व शिख धर्म ह्या हिंदु धर्माच्या शाखा आहेत असा प्रचार करु लागले आहेत. त्यांचे हे कार्यक्रम मोठ्या नेटाने चालू आहे. आदिवासींना वनवासी संबोधून व तिचा मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार करुन आदिवासी हे या देशाचे मूलनिवासी आहेत ही ओळखच ते मिटवायला लागले आहेत. सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बघितला तर आपल्याला दिसते की बहुजन समाज हा सतत ब्राम्हणाच्या हातातील शस्त्र बनला आहे. ब्राम्हणाने विचार करावा पण कृती करु नये. ही कृती ब्राम्हणेत्तर बहजन समाजाच्या हातून करण्यात यावी असे धर्मग्रंथ सुद्धा सांगतात. ही कृती करताना बहुजनानी कोणताही विचार करू नये. केवळ ब्राम्हण भुदेवाच्या आदेशाचे पालन करावे. तेच त्याचे परमकर्तव्य होय: बाबरी मस्जिद पाडताना डोके ब्राम्हणाचे तर हात हे बहुजनांचे होते. नंतर झालेल्या दंगलीत ब्राम्हण सुरक्षित राहीले तर बहुजन समाज हकनाक बळी पडला. ब्राम्हणशिवाय एखादा धार्मिक विधी केला तर तो असफल होतो अशी भिती बहुजनाच्या डोक्यात घालण्यात आली. परिणामी बहुजन हा गुलाम बनून राहीला व ब्राम्हणाला श्रेष्ठ म्हणत राहीला. ब्राम्हणाने पूजा केल्यशिवाय बहुजन आपल्या घरात प्रवेश करीत नाही. धर्माच्या नावाखाली बहुजनाच्या रक्तात लाचारीची बिजे वैदिकानी पेरली आहेत.