Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बहुजनात अंधश्रद्धेचा अधिक प्रसार व प्रचार

बहुजनांचे मारेकरी  -  लेखक  बापु म. राऊत  

     शेकडो भाकडकथा रचून बहुजन समाजाला अंधश्रध्दात बुडवून ठेवण्याचे अघोरी कृत्य करण्याचे कार्य ब्राम्हण समाज करीत आहे. बहुजन समाजाला अंधश्रध्देत गुंतवून ठेवण्यासाठी देव व धर्माचा अधिकाधीक वापर करीत आहेत. शुभ-अशुभ, स्वर्ग-नरक, आत्मा व मोक्ष इत्यादी बाबीची भिती बहजन समाजाला दाखविण्यात येते. कुणाच्या दारिद्र्याचा, रोगाचा व व्यंगाचा संबंध पुर्व जन्मात केलेल्या पापाशी लावतात.आज देव-धर्म, पुजा-पाठ , यज्ञ, सत्संग या गोष्टींनी थैमान घातले आहे. बहुजन समाजावर याचा फार मोठा प्रभाव पडत आहे. बहुजन समाजातील माणसे हे रोज सकाळी व संध्याकाळी देवाची दोन दोन तास पुजा करतात. एवढेच नव्हे तर लोकल ट्रेन मध्ये हनुमान चालीसा, तुलसी चालीसा, शिव चालीसा खिशातून काढुन मनातल्या मनात पुटपुटत असतात. काही जण तर दुसर्‍याला त्रास होईल एवढे बडबडत असतात. जे आपला जास्तीत जास्त वेळ पुजा पाठात देतात. ते आपल्या मुलांच्या अभ्यासात वेळच देऊ शकत नाही. मुलांचे भवितव्य त्यांनी देवावर सोडलेले असते. अशांची मुले केवळ चपरासी किवा गोदीमध्ये काम करणारा कामगारच बनू शकतात. ते आपल्या मुलांना डॉक्टर, ऑफीसर  बनवू शकत नाहीत. आणी हेच तर ब्राम्हणवाद्यांना हवे आहे. तुमची मुले शिकली, ऑफीसर, न्यायाधीश बनली तर त्यांची मुले कुठे जातील?. त्यामुळेच बहुजन समाजाला जास्तीत जास्त देवांच्या नादी लावीत आहेत. ब्राम्हण हे आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करीत असतात. त्यांच्या सोबत स्पर्धेत टिकण्याची तुमची कुवत हिरावून घेतल्या जाते.बहुजन समाज अंधश्रध्देत गुरफुटून राहीला तर शासन कर्त्या समाजाला ती पर्वणीच ठरते. कारण असा समाज होयबा म्हणूनच वावरत असतो.

Bahujananche Marekari      समाजातील हा बहुजन समाज जागृत झाला तर तो राज्यकर्ता बनेल व आपली मिरासदारी संपेल ही भिती या मुठभर शासन का समाजाला वाटते. म्हणून बहुजन समाजाला ईश्वर-आत्मा अशा घातकी मार्गाला लावण्याचे काम भट-ब्राम्हण शासनकर्तावर्ग अहोरात्र करीत असतो. वादळ वा-यात, चक्रीवादळात, भुकपात व मंदीरात चोरी होण्यासारख्या इतरही गोष्टीत जो देव स्वत:चे रक्षण करु शकत नाही तो दुस-याचे कल्याण कसे करेल ? देव सर्वाचा रक्षणकर्ता आहे असे मानले तर लोक भुकेने का मरत आहेत?. देशात दुष्काळ का पडत आहेत? बहुजन लोक आत्महत्या का करीत आहेत?. भट ब्राम्हणावर आत्महत्येची पाळी का येत नाही ? देवळातल्या संपतीवर तो एकटाच कसा डल्ला मारीत आहे? त्याचे नातू पणतू देशात न राहता परदेशात ऐषारामात राहतात. पण बहजन समाज मात्र कंगाल राहतो याचा विचार बहुजन समाजाने केला पाहीजे. या देशातील सरकार हे बहुजनांच्या विकासाला प्राधान्य देत नाहीत. उलट त्याला अंधश्रध्देच्या गर्तेत ढकलण्याचे काम करीत आहे.यात्रा स्थळाचा विकास करण्यासाठी शासनाने 15 कोटी रुपये दिले आहेत.हज यात्रेला जाणार्‍या भाविकाच्या तिकिटात हजारो कोटी रुपयांची सवलत दिली जाते. सिहस्थ मेळाव्यात 448 कोटी रुपये खर्च केले जातात (लोकसत्ता दि.15 फेब्रुवारी 2005). हि रक्क्म तसी किरकोळच आहे यापेक्षाही अधिक रक्कम खर्च केली जाते परंतु गरीबांच्या आरोग्य, शिक्षण, निवारा या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी सरकार काहीही पावले उचलत नाही.धर्मस्थळांचा विकास की मानवांचा विकास या प्रश्नावर मानवी विकासाला दुय्यम स्थान देण्यात येत आहे. देवाच्या व भोंदु साधुच्या मागे पुढे बहुजन समाज फिरायला लागला आहे. हि त्यांच्या आत्मनाशाची नांदी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सावधगिरीचा इशारा देताना म्हणतात, गळ्यातील तुळसीमाला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतुन मुक्त होण्यास उपयोगी पडत नाही किवा तुम्ही रामनामाचा जप करता म्हणुन घरवाला भाड्याची सुट देत नाही अगर वाणी आपले पैसे कमी करीत नाही. तुम्ही पंढरीचे वक्तशीर वारकरी आहात म्हणुन तुमचा मालक तुम्हास पगारात वाढ करुन देत नाही. मग असे असनही तुम्ही देवी-देवतांच्या भजनी का लागता ?

     समाजातील अत्यंत मोठा भाग देवांच्या मुढ कल्पणात गळुन गेल्यामुळे काही आपमतलबी माणसे आपला कावा साधतात. जगात इश्वर असो वा नसो त्याचा विचार करण्याची आज गरज नाही.जगात ज्या घडामोडी घडत असतात त्यामागे माणुस काम करीत असतो. नैसर्गीक आपत्ती यायला भुगर्भाच्या बाह्य व आंतरंगीय कार्यकरण भाव जबाबदार असतो. त्यामागे कोणतिही दैवी शक्ती काम करीत नसते. परंतु तथाकथीत धर्माचे दलाल याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले हित साधतात.दैवी कोपामुळे हे झाले असे ते सांगतात, यातून ते आपले अर्थशास्त्र पक्के करीत असतात. आजचा बहुजन समाज मेंढरासारखा ढोंगी साधुच्या भजनी लागला आहे मात्र स्वत:च्या विकासाच्या कोणत्याही आयोजनात तो कधीही ढुंकुन बघत नाही.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209