बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
कृष्ण हा यादव कुळाचा, गवळी समाजाचा शुरवीर होता. पण आर्य ब्राम्हणांच्या नादी लागला. आर्यांच्या सांगण्यावरून त्याने स्वकुलाचा सर्वनाश केला. कंस व जरासंघ हे महापराक्रमी राजे होते. त्यानी आर्य ब्राम्हणांचे वर्चस्व अमान्य केले. वर्णाश्रम धर्माला झिडकारत समतेचे तत्व रुजविण्यास त्यांनी सुरुवात केली. आर्य ब्राम्हणाला त्यानी आव्हान दिले. आमच्या विशेषाधिकाराला आव्हान देणा-याचा सर्वनाश केल्याशिवाय आम्ही सुखी होऊ शकणार नाही. हे वैदिकांनी ताडले व कंसाचा नायनाट करण्यासाठी त्यानी आर्येत्तरातील श्रीकृष्णाची निवड केली. कृष्णाला फितुर करुन त्याचे मार्फत आपल्या विरोधकाना आर्यानी नेस्तनाबूत केले. श्रीकृष्णाच्या नावावर अनेक चमत्कारीक कथा लिहल्या. त्याच्या बाललीला रंगविल्या तर कंसाला क्रूर व पापी दाखविण्यात आले. अशा अनेक कथा बहुजन समाजात प्रसृत करण्यात आल्या व बहुजन समाजाने त्या सत्य म्हणन स्विकारल्या. आांनी कष्णालाही एका विदुषकाच्या स्वरुपात बहुजनसमोर प्रस्तुत केले. कृष्णाला हजारो स्त्रियांचा नवरा ठरवून त्याची बदनामीही केली. स्त्रियांसी लगट करणारा, त्यांचे कपडे लपवणारा व खोड्या करणारा,ब्राम्हणी व्यवस्थेच्या रक्षणकर्ता असे बहुजनाच्या कृष्णाला चित्रीत केले.
कृष्णाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सनातनवादी व बहुजनातील मनुवादी व्यवस्थेचे गुलाम देशात अक्षरक्ष: थैमान घालीत आहे. दहीहंडीचे कार्यक्रम जागोजागी लावीत आहेत. त्यात बहुजनाची मुले सहभागी होत आहेत. दहीहंडी फोडणारे 75 टक्के युवक पंगु होतात. नंतर त्यांची दखल कोणीच घेत नाहीत. बहुजन मुले आपला अभ्यास न करता दहीहंडीच्या तालमीत मग्न असतात तर ब्राम्हणाची मुले अभ्यास घरात अभ्यासात मग्न असतात. ती कधीच दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर निघत नाहीत. त्यांना कलेक्टर व न्यायाधीश बनायचे असते. बहुजन मुले धर्माच्या गुंगीत बेहोश होऊन साधा बाबूही बनण्याच्या लायकीचा ठरत नाही. तो केवळ धर्ममार्तंडांच्या हातातील हत्यार बनत आहे.