बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
वैदिक ब्राम्हण हे स्वत:ला कधीच हिंदू म्हणऊन घेत नसत. इतिहासात हिंदू धर्माची कधीही स्थापना करण्यात आली नव्हती.या धर्माला कोणताही संस्थापक नाही.हिंदू धर्माचा असा कोणताही धर्मग्रंथ नाही. हिंदू ह्या शब्दाच्या निर्मितीमागील इतिहासकार दोन पर्याय सांगतात. पहिला हिंदू हा शब्द सिंधू या शब्दाचा अपभ्रंश आहे तर दुसरा हिंदू हा शब्द अरबानी दिलेला आहे. इथल्या मूळ लोकाकडे अरब मागास, लाचार या नजरेने बघत त्यामुळे तुच्छ भावनेतून शिवीच्या स्वरुपात हिंदू हा शब्द अरबानी वापरला व मळच्या जनतेला अपमानास्पद वागणूक देताना हिंदू हा शब्द वांरवार वापरुन स्वत:चे मनोरंजन करुन घेतले. परंतु त्यानी वापरलेला शब्द अपमानकारक आहे याची जाणीव नसल्याने भारतीयांनी तो शब्द स्विकारला आणि कालांतराने 'अज्ञानातच सुख असते ' या न्यायाने त्याच शब्दाला धर्माशी जोडून हिंदू धर्म असे नाव पाडले. भट-ब्राम्हणाने हिंदू हा शब्द सुरुवातीस नाकारला. जेव्हा अकबर व औरंगजेबाने हिंदूवर कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा आम्ही हिंदू नसल्यामुळे जिझीया कर आम्हाला बंधनकारक नाही. जिझीया करातून आम्हाला मुक्त करावे. अशा प्रकारची विनंती येथील ब्राम्हणांनी अकबर व औरंगजेबाकडे केली होती. परंतु हिंदु या शब्दात जेव्हा वैदिक ब्राम्हणांना फायदा दिसायला लागला तेव्हा या शब्दाला असे कवटाळले की जणू तेच या शब्दाचे निर्माते आहेत. हिंदु या शब्दाला त्यांनी अधिक मुलामा देऊन तो शब्दच बहुजनाच्या जीवनमरणाच्या प्रश्नाशी निगडीत केला. युरोपियन राज्यकर्ते गुलाम जनतेला काम सांगताना “यु बास्टर्ड" अशी शिवी द्यायचे. ही शिवी म्हणजे अज्ञानी जनतेला अमृत पर्वणी वाटायची. लोकात येऊन छाती फुगऊन सांगायचे सायबाने मला आज यु बास्टर्ड म्हणून सन्मानाने आवाज दिला. अज्ञानामुळे अपमानजनक शब्द त्याना सन्मानजनक वाटला. त्याचं प्रकारे अरबांनी दिलेली हिंदु ही शिवी सन्मान म्हणुन समाजाने स्विकारली व शिवीलाच धर्म हे नाव दिले. भट ब्राम्हणाला हा इतिहास चांगला माहीत आहे पण हिंदु हा शब्द त्यांच्या साठी सोन्याची अंडी देणारा ठरला आहे. त्यामुळे या शब्दावर ते आज भाष्य करीत नाहीत. सारेच्या सारे चिडीचूप आहेत. आज भटब्राम्हण हिंदु या शब्दाचा शस्त्रासारखा वापर करीत आहेत. हिंदुत्वाच्या शब्दाने सामान्य बहुजन लोकाना बेभान करून इतर धर्मीय लोकांचे मुडदे पाडायला उद्युक्त केले जात आहे.