बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
या देशाचे मुळनिवासी मेहनतीदार व चिकाटी होते. गुरु शिवाय शिक्षा घेण्याची ऐपत मुळनिवासीयात होती.द्रोणाचार्याकडे एकलव्याने विद्या शिकण्याची ईच्छा प्रदर्शित केली. पण तुला विद्या शिक्षणाचा अधिकार नाही. केवळ ब्राम्हणच विद्या ग्रहण करु शकतात, असे म्हणत एकलव्याची हकालपट्टी केली. उलट हाकलून देणार्या द्रोणाचार्यालाच गुरुस्थानी मानले. त्याचा पुतळा तयार करून व पुज्य मानून धनुर्विद्या शिकली. एवढा नम्रपणा मुळनिवासीयात होता. एकलव्य धनुर्विद्येत एवढा तरबेज झाला की अर्जुनालाही मागे टाकले. जोरजोराने भुंकत असलेल्या व अभ्यासाची एकाग्रता भंग करणार्या कुत्र्याचे भुंकणे एकलव्याने एका बाणाने बंद केले तर दुस-या बाणाने पुर्ववत केले. या प्रसंगाने द्रोणाचार्य क्रोधीत झाला व एकलव्याकडे गुरुदक्षिणेची मागणी केली.एकलव्याने उदारपणे दक्षिणा देण्याची तयारी दर्शवली. पण द्रोणाचार्याने गुरुदक्षिणेत अंगठाच कापुन मागीत एकलव्याला निकामी केले. एवढा द्रोणाचार्याने बेशरमपणा केला. धनुर्विद्या व अंगठा यांचा अन्योन्य संबंध आहे पण एकलव्याचा अंगठा कापुन अर्जुनाला दुसरा प्रतीस्पर्धीच असणार नाही याची काळजी द्रोणाचार्यानी घेतली. जगातल्या कोणत्याही गुरुने अशी गुरुदक्षिणा मागितली नाही. शुद्राला काहीही शिकण्याचा अधिकार नाही असे सांगणार्या शास्त्र व धर्माचे पालन द्रोणाचार्यानी केले. अशा विषमतेच्या समर्थकाच्या नावाने भारत सरकार द्रोणाचार्य पुरस्कार देते यापेक्षा दुसरे लांच्छन असू शकत नाही. असे पुरस्कार देणार्याची मानसिकता काय असावी याचा बहुजन समाजाने शोध घेतला पाहीजे.