Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आरक्षणाची पोटदुखी

देशमुख ढोबळे संवाद

( जोशींच्या घरातून बाहेर निघालोच तो देशमुखांचा पोरगा मला म्हणाला, 'काका आमच्याकडे चला. बाबांना तुमच्याशी काही काम आहे.' म्हणून मी देशमुखांकडे गेलो. तेथे तलमलेसाहेबही बसले होते) 

मी : काय देशमुखसाहेब, कस काय बोलविण पाठविलं  ? 


देशमुख : अहो एक महत्वाच मी तुम्हाला सांगतो. आपल्या ह्या ओबीसी बहुजन वगैरेच्या चर्चा त्या जोशीकडे कशाला करता. मला थोडाफार राजकारणाचा अनुभव आहे, म्हणून सांगतो. तुम्ही त्यांना कितीही चांगल सांगितल तरी ते करतील आपल्या मनाचच. अहो हे लोक कधी बदलले आहेत का ? की आता बदलतील ? 

मी : निश्चित बदलले आहे आणि बदलतीलही. मनूस्मृती म्हणते

न नश्त्येदथवा गायेन न वादित्राणी वाद्येत् ।
नास्फोटयेन्न च क्ष्वेडेन्न च रक्तो विरावयेत ।। 

अर्थात नाचणे, गाणे, वाद्यवादन, शड्डू ढोकणे, दातांचा आवाज काढणे, प्रेमाने प्राण्यांचा आवाज वगैरे काढणे हे ब्राम्हणांना वर्ण्य आहे. पण आज तर नाचणे, गाणे व वाजवणे ह्या क्षेत्रात तर ब्राम्हणच अग्रणी आहेत. ब्राम्हणच ब्राम्हणवाद डूबवित आहेत. ते आपले धर्मबंधू आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करायलाच पाहीजे. होऊ शकत ते कुठल्यातरी अफवा तंत्राचे वा अहंभावाचे बळी पडले असतील. ब्राम्हणवादाचे बळी असतील. जन्मानी सर्व माणसे सारखीच असूनही ब्राम्हणवाद हा ब्राम्हणात श्रेष्ठत्वाचा अहंभाव निर्माण करतो तर शुद्र-अतिशुद्रात कनिष्ठत्वाचा न्यूनगंड निर्माण करतो. ब्राम्हणवाद नष्ट करायचा म्हटले तर ब्राम्हणांना अहंभावातून बाहेर पडण्याचे आवाहन करावे लागेल तर बहुजनसमाजाला न्यूनगंड झटकून टाकण्याचे प्रबोधन करावे लागेल. हिंदु जातीव्यवस्था हा एक कैदखाना आहे..ह्या कैदखान्याच्या वेगवेगळ्या कमऱ्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे कैदी बंद आहेत आणि हे कैदी एक दुसऱ्याशी भेटू नये, पळून जाऊ नये म्हणून एका कमऱ्यामध्ये बसून जेलरची भूमिका ब्राम्हण बजावित आहेत. ह्या सर्व प्रकारात हा जेलर हे विसरून गेला आहे की इतर कैद्याप्रमाणे एका कमऱ्यात स्वत:स बंदीस्त करून तो स्वत:ही कैद्याप्रमाणेच जीवन जगतो आहे. त्याला भीती वाटते की तो त्याच्या कमऱ्यातून कैदखान्याच्या बाहेर आला तर सर्व कैदी पळून जातील. पण त्यामुळे हजारो वर्षापासून तोही कैद्याचेच जीवन जगतोय. ह्या कैदखान्याच्या पलीकडे ही एक विशाल विश्व आहे, ह्याचे त्याला भानच नाही. ह्या गोष्टीची माहिती जर एखादा कैदी ह्या जेलरला करून देत असेल तर त्यात वाईट काय आहे ? हा जेलर जेव्हा आपल्या कप्प्यातून बाहेर येऊन सर्व कैद्याची मुक्तता करेल व ही सर्व मंडळी निळ्याभोर आकाशाखाली व सुजलाम-सुफलाम अशा ह्या भारतभूमिवर हातात हात मिळवून नाचायला लागलीत तर ह्या देशाचे भवितव्यच बदलून जाईल. अन्यथा कैदेत बंद असलेले वेगवेगळ्या कप्प्यातील कैदी तर आता संवाद साधतच आहे व ते हा कैदखाना कुठल्याही क्षणी फोडून टाकायच्या स्थितीत पोहोचले आहे. डॉ. आंबेडकरासारख्या एका विद्वान कैद्याने तर आपला कप्पा तोडून ह्या जेलरच्या हातावर तुरी ठेवल्या आहेत व आतील इतर कैद्यानाही संदेश पाठविला आहे की, ' निघा ह्या कैदखान्यातून बाहेर. बाहेरचे विश्व अतिशय सुंदर आहे.' फुले-आंबेडकरी चळवळीची पहाट तर कधीच उजाडली आहे. आता प्रकाशाला रोकण्याचे सामर्थ्य कोणातच उरलेले नाही. जो ह्या प्रकाश सूर्यावर धुंकायचा प्रयत्न करेल तो स्वत:वरच थुकत असेल एवढ हे एक कटू सत्य आहे. ह्या सूर्यप्रकाशात कोण किती न्हावून निघतो हेच प्रत्येकाला ठरवायचे आहे. ब्राम्हणांनीही आपला ब्राम्हणी धर्म कधीचाच बुडविला आहे. सातसमुद्रापलिकडे जाणे पाप मानणाऱ्या ब्राम्हणाचीच सर्वात जास्त मुले आज अमेरिकेत मोठमोठ्या हुद्यावर नोकऱ्या करीत आहेत. विधवा झाल्यावर केशवापन करणाऱ्या ब्राम्हण महिलाच आज मोठमोठ्या शहरात पंचतारांकीत ब्युटी पार्लर चालवित आहेत. स्त्रीची लज्जा हाच तिचा दागीना माननाऱ्या ब्राम्हणांच्या मुली आज सिनेसृष्टीत कमीतकमी कपडे घालून था-थय्या करून करोडो रुपये कमवित आहेत.

Aarakshan acchi potdukhi      धर्माच्या व राष्ट्रनिर्मितीच्या गप्पा मारणारे ब्राम्हण, शेकडो भोंदू साधू समाजात निर्माण करून आपल्या बहुजन समाजाला अंधारात ठेवत आहे. अंधारात आपण राहायचे का ?, हे आपल्याला ठरवायचे आहे. बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीच्या प्रबोधनातून दलिताची पिढी ही पुढे सरसावली आहे. प्रश्न आम्हा ओबीसीचा आहे. आम्ही काळासोबत धावणार की भूतकाळात राहणार ? 

देशमुख : ढोबळे साहेब हे तलमले. आपले ओबीसीच आहेत. 

तलमले : हो साहेब, मी तेली आहे. देशमुखसाहेबांनी मला 'ओबीसी सेवासंघाचा' सदस्य बनविले आहे. ओबीसी सेवासंघाचे माहितीपत्र मी वाचले आहे. तरी ओबीसी म्हणजे कोण हे मला नीटपणे समजवा ? 

मी : ओबीसी हा अदर बॅकवर्ड कास्टचा इंग्रजीतील शॉर्टफॉर्म आहे. हिंदु व्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर व जातीव्यवस्थेवर आधारीत आहे. हिंदु जातीव्यवस्थेत ब्राम्हण हे सर्वतोपरी, तर महार, मांग, चांभार हे सर्वात खाली आहेत. ओबीसी जाती ह्या हिंदु जातीव्यवस्थेतील ब्राम्हणांच्या खालच्या व अस्पृश्य जातीच्या वरच्या जातीसमूहाचा गट आहे. ह्या जातीतील लोक श्रमावर आधारीत व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. ह्या ओबीसी जाती सेवक जाती आहेत. ह्या जातीची विभागणी आपण दोन विभागात करू शकतो. 

१. कामगार जाती जसेकी लोहार, सोनार, कुंभार, धोबी, भंडारी व तत्सम 

२. शेतकरी जाती कुणबी, माळी, तेली, आगरी, वंजारी, धनगर व तत्सम ठोकळ मानाने पाहिले गेल्यास वर्णव्यवस्थेत ह्या जाती शुद्रवर्णीय आहेत. 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209