Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू

अ.भा. ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६)  अध्यक्षीय भाषण  

     आदरणीय उद्घाटक, स्वागताध्यक्ष, संयोजक, मान्यवर पाहणे आणि शब्दसृष्टीच्या मान्यवरांना, जय ओबीसी...

     क्रांतिज्योती सावित्रीआई आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारफुलांनी मगंधित झालेल्या या पवित्र फुलेनरीत आज भारतवर्षातील ५२ टक्के वंचितांचं पहिलं ओबीसी साहित्य संमेलन भरत आहे. यामुळे आम्हा सर्वांचा ऊर, फले, आंबेडकर आणि शाहु महाराजांच्या ऋणस्मृतींनी भरून आलेला आहे.

     अनेक अडचणींमधन हे पहिलं संमेलन साकारत आहे. या कामी आम्हा ५२ टक्के ओबीसींचे झुंझार नेते, महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक मा. सुधाकर गणगणे आणि त्यांचे सर्व ओबीसी टायगर्स यांचा टायगर्स एवढाच वाटा आहे. मी सिंहाचा म्हणणार नाही, कारण सिंह हा बरेचदा सिंहिणीने केलेल्या आयत्या शिकारीतून आपला वाटा बळाने घेतो. असो.

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan     विशेष आनंदाची बाब म्हणजे हे संमेलन पुणे शहरात होत आहे ही! कारण हे स्थळ आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक क्रांतिज्योती सावित्रीआई आणि महात्मा फुले यांचे ! महात्मा फुले, केशवसुतांच्याही ४० वर्षे आधी जन्मले होते. केशवसुतांचा आयुष्यकाळ १८६६ ते १९०५ तर महात्मा फुल्यांचा १८२७ ते १८९०. सावित्रीआई यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह  मुंबईच्या शिळाप्रेसने १८५४ साली प्रसिद्ध केला.

"माझ्या जीवनात । जोतिबा स्वानंद 
जैसा मकरंद । कळीतला 
अडाणी जनाचा असे कर्णधार
 तयांना देतसे सद्विचार 
 कृतिवीर होता तसा ज्ञानयोगी
 स्त्रियां, शूद्रासाठी सदा दुःखभोगी'

('सावित्रीबाईची काव्यसंपदा' - कृ. प. देशपांडे) 

     'पुणे तिथे काय उणे' असं आम्ही ऐकत आलो. जिथे कुठलेच उणे नाही तिथले जिणे किती आनंदी असेल, असे परक्या इसमाला वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच की काय, मूळ पुणेकर बाथरूमध्ये गुणगुणतात म्हणे- “जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा?" असो.

     ही पुण्यभूमी मराठी माणसाची सांस्कृतिक राजधानी आहे, असं मोठ्या कौतुकानं म्हटलं जातं. पुणे फेस्टीव्हलमधून त्याचं यथार्थ दर्शनही घडतं.
'आपलं, काम आणि आपण' असं येथलं सूत्र. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य येथलेच. परंतु स्वराज्य मिळाल्यावर त्याचे सुराज्य करणे हे येथल्या कारभाऱ्यांच्या कर्तव्यात बसत नाही की काय? अहो, पुण्यातले खड्डे बघून आमच्या विदर्भातील आदरणीय 'बुढे' येथल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमांना यायला टाळतात. अहो, आमच्याकडची गर्भार बाई, तिला पुण्याला चलायचं म्हटलं की तिच्या डोळ्यांसमोर पुण्याचे रस्ते म्हणजे चक्क लेबर वार्डासारखे येतात. म्हणूनच पुण्यासारखे सहनशील लोक अन्यत्र कुठे नसावेत, आणि म्हणूनच माझं हे मारुतीच्या शेपटासारखं लांबणारं भाषण आपण सहन करणारच, याबद्दल मी निश्चिंत आहे. असो;

     तरीही ओबीसी बहुजनांचं कसं आहे...?
     बघा. मुद्दाम कुणावर
     चाल करून जाऊ नये
     कुणी चाल करून आले 
     त्याला पाठ दावू नये 
     आणि शिंप्याकडून 
     युद्ध गणवेष मिळेस्तो 
     योद्ध्याने वाट पाहू नये.

     तर रसिक श्रोतेहो,

     'आज इथे Other Backward Class अर्थात इतर माघारलेले लोक - इतर मागासलेले नव्हे; Forward Class म्हणजे जर पुढारलेले असं त्याचं मराठीकरण आहे, तर Backward Class लाही माघारलेला वर्ग असेच संबोधायला हवे. या माघारलेल्यांना पुढारलेल्यांच्या बरोबरीने आणायचे आहे. ते मानुषता मूल्यानुसार पुढारलेल्यांनी आणायला हवे होते. पण तसे घडले नाही. कारण पुढच्याला मागच्याचेच खांदे लागतात असे दिसते.

'पुढच्याला मागच्याने खांदा द्यावा असा व्यवहार धन्य व्हावा'

     असो; कधीपासून आम्ही इतर माघारलेले लोक एकत्र आलो? तर आता-आताशा; मंडल आयोगाचा बत्ताशा दिसल्याबरोबर ! तत्कालीन पंतप्रधान मा. व्ही. पी. सिंगांनी आपलं पंतप्रधानपद वेठीस लावून मंडल आयोग या देशात ७ ऑगस्ट १९९० मध्ये लागू केला. २७ टक्के आरक्षण केंद्र व राज्यात घटनेतील कलम नं. ३४० नुसार लागू झाले आणि आजच्या घडीला मा. ना. अर्जुनसिंगांनी प्रायव्हेट सेक्टर्ससमध्येही ओबीसींना आरक्षणाचे दरवाजे मोकळे करताच आमची थोडी झोपमोड झाली आणि एखादी घटना घडल्यावर वेटाळातील लोक जसे 'काय झाले ? या पृच्छेने एकत्र येतात तसे आम्ही थोडेफार लोक एकत्र आलो. पण हे एकत्र येणं केवळ आरक्षणाच्या लालीपॉपमुळे असेल तर मग मात्र प्रश्नच आहे.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209