Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

क्रिमीलेअर पूर्णतः बंद व्हायलाच हवे

     मंडल विरोधी कमंडलुतील विषमतेचे ब्रह्मजल नकळत प्राशून मतिभ्रम झालेल्या आमच्याच काही भोळ्या बहुजनांनीही आरक्षणाला विरोध करण्याकरिता मिडिया गाजवला, यासारखी भैताळ घटना ती कोणती ?

     घटनादत्त हक्कालाही 
     धक्का तुम्ही लावता 
     घटनेचीही रस्त्यावर 
     अब्रू घ्यायला धावता ? 

      गुणवत्तेचं बुजगावणे हे अखेर बुजगावणच आहे. बहुजनांजवळ गुणवत्तेची वाण आहे, असे म्हणणं म्हणजे मानुषतेचा अवमान करणं होय. महात्मा फुल्यांनी 'गुलामगिरी' ग्रंथात महाकवी होमरच्या ओळी दिलेल्या आहेत. त्याचा मराठी अनुवाद असा, "ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशीच त्याचे अर्धे सद्गुण आणि बौद्धिक कौशल्य हिरावले जाते.” ओबीसींनी, वरच्यांची धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक गुलामगिरी झुगारल्याशिवाय त्यांचा उद्धार नाही, हे मी पुनः पुन्हा सांगेनच.

     क्रिमीलेअर पूर्णत: बंद झालेच पाहिजे, अजून क्रिमीलेअरचा प्रश्न नीट सुटलेला नाही. आमचा मित्र प्रदीप ढोबळे, आमचे गणगणे, देवरे, खेडेकर, ना. उल्हासदादा पवार, ॲड. जनार्दन पाटील, इक्बाल अन्सारी, अली अजीझी, सुनील सरदार, अशोक यादव, सुरेश नरके, रमेश कोरे, महेंद्र धावडे त्यासाठी प्रयत्नरत आहेत. प्रा. श्रावण देवरे यांनी ओबीसींसाठी सुचविलेला ४२ कलमी कार्यक्रम ओबीसींनी अंमलात आणला तर परिवर्तनाच्या दिशेने ती मोठी आगेकूच राहील. 

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan 'बाबांनो,
     तो बाबासाहेब नावाचा 
     महामानव आला नसता 
     तर आमच्या आसवांचे पीक 
     असेच गेले असते वाया 
     ठाऊक नाही अजून किती युगे 
     फाटक्या पदरातच 
     हुंदकत राहिल्या आमच्या
     आया-बाया 
     साता समुद्राचा धाक होता वस्तीवर
     ढोबरभर पाण्यासाठी
     जीव गहाण होता डोबीवर 

बाबांनो,

     आमचे फुले-आंबेडकर आले नसते
     तर आमच्या देहाच्या सालींचे नगारे 
     असेच वाजत राहिले असते सालोनसाल 
     अन् कुत्रेही माजून गेले असते
     खाता-खाता आमचे हाल 

बाबांनो,

     ही दोघी मोठी माणसं आलीत 
     म्हणून आम्ही माणसात आलो 
     हजारो वर्षे धुळीत दबून होतो.
     आता आता कणसात आलो.' 

     सांगा राजेहो, आमची प्रगती देशाच्याच प्रगतीचा भाग होईल ना ! मग दुःस्वास सोडा अन् तुमच्याबरोबर चालू द्या आमचाही गावठी घोडा. बाबांनो, आपल्या दोघांची मंजिल एकच ; भारत प्रगत राष्ट्र करण्याची. मग रस्त्यावर येऊन विवेकाला घायाळ करणारी आंदोलनं करू नका- उलटपक्षी गरिबीत असलेल्या गरिबांना जोडा- त्यांच्याहीसाठी ठोस आरक्षण मागा- आम्हीही, तुमच्यासोबत असू. अरे कसले मुसलमान, ख्रिश्चन घेऊन बसलात, तेही तर आपल्याच रक्तमांसाचे आहेत. त्यांनाही आपण आपल्याबरोबर नाही घ्यायचे तर कोणी घ्यायचे? पाकिस्तान आणि बांगला देशातील मुसलमान आणि इतर भाईबंदही आपलेच आहेत. त्यांचे आपले रक्त एक आहे. जिनोम साम्य आहे. दोन भावांमध्ये फाळणीच्या रेषेने भौगोलिक फाळणी केली म्हणून रक्तनात्याची फाळणी होत नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणतोय की, 

     'मीही असतो हिन्दुस्तानी मुसलमान 
     तर माझ्या बंधूइतके प्रिय असते 
     मलाही पाकिस्तान 
     एकाची दोन घरं झालीत, 
     म्हणून रक्त बदलत नाही. 
     फसलचे शेत बदलले म्हणून 
     पिकांची नस्लं बदलत नाही 

     तरीही राष्ट्र अस्मितेला 
     जेव्हा नख लागते, 
     तेव्हा औजार बनावे लागते 
     आस्थेला आस्थेपुरते ठेवून 
     'सारे जहाँ से' ते 'वन्देमातरम्' म्हणावे लागते.' 

     मूळ भारतीय वंशाचे लोक भिन्न धर्मांत असले, तरी त्या सर्वांचे रक्त एक आहे. ज्या मिशनऱ्यांनीही इथे येऊन येथल्या दुःखितांची सेवा केली आणि करत आहेत, तेही आम्हाला प्रातः वंदनीय आहेत. मदर टेरेसा ही इसाई लोकांचीच 'माय' नाही, तर ती आम्हा सर्वांची 'माय' आहे. दुःखितांच्या सेवेचे सोंग रचून मेवा खाणाऱ्या येथल्या तथाकथित आनंदभोगीपेक्षा प्रचंड खस्ता खाऊन-वंचितांची तनमनधनाने सेवा करणारे खरे सेवक. आम्हीतरी  ओळखायला हवे.

     'दुसऱ्याच्या अंगावरील, जखमांची खपली काढून स्वत:च्या अंगाला चिकटवल्या तर त्यावरही माशा बसत असतात, परंत त्या कुंथणाऱ्यांच्या व्यथा मात्र खोट्या असतात. जखमांचा, करणारे हे सौदागर रोज सोन्याची पीतांबर नेसतात आणि हे  सत्य बरळणाऱ्या जबानीला छाटण्यासाठी जल्लादाना पोसतात.'

     बाबांनो, हे साहित्य संमेलन, माघारी राहिलेल्या; आपल्याच इतर मागे पडलेल्यांचे म्हणजे आमचे आणि ते तुमचेही. तुम्ही कुठेही असाल तिथं आमचं म्हणणं-आमचं मागणं तुम्हापर्यंत पोहचेल. तुम्ही आमच्यासाठी खात्रीने विचार कराल अशी आम्हास खात्री आहे. कारण तुम्ही आमचे पुढारलेले बंधू-भगिनी. बाबारे, संधी मिळाली तर एकलव्य घडतो- मग त्याचा अंगठाच का नडतो तुम्हा बाबांनो? बाबांनो, पांडवांना त्यांचा हक्क नाकारला म्हणून तर महाभारत घडले. महाभारत, रामायण एकदा घडले तेच पुरे. हे पुन्हा पुन: घडले तर कर्णाची अतोनात उपेक्षा आणि सीतेचा वनवास पुन्हा- पुन: भारतवर्षाला बघावा लागेल. 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209