Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

'हिंदू' शब्दाची उत्पत्ती

     स्वा. सावरकरांनीही हिंदू धर्माविषयी स्पष्टच  म्हटले आहे की, हिंदू धर्माचा कोणीही धर्म संस्थापक नाही आणि तसा कोणताही धर्मग्रंथ नाही.

    हिंदू ही संज्ञा आक्रमक मोगलांनी त्यांच्या आक्रमणांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यासाठी सर्वप्रथम वापरली. हिंदूचा फासी अर्थ 'काला चोर वा काला दुश्मन' असा सांगितलेला आहे. उत्तरेकडून मोगल इथे प्रवेशताना त्यांचा प्रथम मुकाबला हिंदी किंवा तत्सम भाषा बोलणाऱ्या भारतीयांशी झाल्यामुळे त्यांनी भाषेवरून आपल्या प्रतिस्पर्ध्याला हिंदू संबोधले. सिंधुचा अपभ्रंश हिंदू तर अजिबात नाही. 

प्रोटेस्टंट हिंद बना  !

    ओबीसी वर्गातील सर्व धर्म-जातींच्या बांधवांनो आणि भगिनींनो, आम्ही रक्ताने परस्परांचे खरे रक्त नातेवाईक आहोत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींच्या संशोधनानुसार इथे एकही वर्ण शुद्ध नाही; तरीही वर्णवर्चस्व अन् जातीभेद जात नाहीत. धार्मिक अंधश्रद्धा जाता जात नाहीत. उलट त्या जाऊ नयेत म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात. म्हणूनच शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या पुरोगामी समाजचिंतकाला हिंदुत्व त्यागून शिवधर्म निर्माण करावा लागतो.

    याला पूरक अजून एक होणे आहे; ते झाले तर ती आजच्या युगाची क्रांती आणि उद्याची उज्ज्वल पहाट ठरेल. अंधश्रद्धेने बरबटलेला धर्म कधीही माणसाला उन्नत करू शकत नाही. अशा धर्माचा असर अफूच्या गोळीसारखा होतो हे मार्क्सने उगाच म्हटलेले नाही. आम्ही आजही बुवाबाजी आणि अतयं धर्मव्यवहारात इतके गुंतून आहोत की, आपले काय नुकसान होतेय याचेही भान आम्हास राहिले नाही. कारण तेच, सद्सद्विवेकाचा अभाव - म्हणूनच तर महात्मा फुल्यांना सांगावे लागले - 'विद्येविना मती गेली'. आणि म्हणूनच एवढे अनर्थ आजही घडत आहे. त्यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म' अमलात आला असता तर हा भारत, जगाचा मार्गपथक झाला, आणि भारताचे तुकडे झाले नसते.

    म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. बहुजन हिंदूंनी वर्णव मठाधिपती-शंकराचार्यवादी उच्च-नीच भेदांचे, आंधळ्या श्रद्धांचे ब्राहा हिंदुत्व झुगारून प्रोटेस्टंट हिंदत्व अर्थात विज्ञाननिष्ठ असे नवे बहजन स्वीकारावे, सर्व सनातन वृत्तींना मूठमाती द्यावा.  त्यासाठी 'बहिप' बहुजन हिंदू परिषद स्थापन होणे ही काळाची गरज आहे. 

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan     अंधश्रद्धेमुळे बहुजन कुठे पोचतील याचा नेम नाही. सत्यनारायणापासून ते समुद्राचे  पाणी गोड होणे, गणपती बाप्पांचे दध पिणे हे बघून २१ व्या शतकाच्या प्रारंभपर्वात माणूस आदिम वाटतो. त्याच्या अशा अविद्येमुळे भारताचे दिवंगत उपपंतप्रध श्री. बाबू जगजीवनराम यांच्या हस्ते स्वरूपानंदांच्या पुतळ्याचे अनावर साल्यावर तो निर्जीव पतळा बाटला म्हणून त्याला वैदिक मडळींनी पंचा आंघोळी घालून शुद्ध केले होते हे आपल्या लक्षात असेलच ना बाबांनो !

   बाबांनो, बडव्यांनी केला । विठू मांडलिक 
   दुःखी पुंडलिक । पंढरीत 
   तीर्थकुंडी यांच्या । लघवीची घाण 
   तरी यांची शान । गाभाऱ्यात ।' 
   असं होऊ नये ना बाबांनो ! 

   बाबांनो, खुद्द आपल्या शिवरायांनीही कधी जातीभेद-धर्मभेद पाळले नाहीत. शिवरायांना इथे हिंदवी स्वराज्य हवे होते. फक्त हिंदूंचे नाही. हिंदवी अर्थात हिंदुस्तानी लोकांचे - भारतीयांचे - मग त्यात सर्व धर्मपंथांचे लोक आलेत. म्हणूनच मागचा इतिहास डोळसपणे अभ्यासणे अत्यावश्यक आहे.

   बाबांनो, आपला उदार राजा शिवाजीही चुकीचा सांगण्यात आला. त्यांना 'गो-ब्राह्मण प्रतिपालका पुरतेच भासविण्यात आले. पण शिवबा कधीही इस्लाम विरुद्ध नव्हते. ते या देशावर आक्रमण करून आमच्या सर्वस्वाचा राखरांगोळी करायला निघालेल्या परकीय आक्रमकांविरुद्ध होते, हे आपण जाणताच ना बाबांनो ! 

    'कुणी मोहमदाचा । कुणी कैलासावासी । 
   काबा आणि काशी । स्वर्गातही कुणी खिस्तवासी । 
   कुणी बुद्धवासी। स्वर्गाचेही निवासी। एक नाही' 

   आता थोडं साहित्य - कला - काव्य यांविषयी बोलू या! 

   देशाच्या पंतप्रधान-राष्ट्रपतींपेक्षा एक अस्सल कवी - लेखक कधीही उणा नसतो, उलट त्याहन अधिक मोलाचा असतो. म्हणूनच चर्चिलने एकदाचे 'इंग्लंड देईन, पण शेक्सपिअर देणार नाही' असे बजावले होते. चिलीचे नागरिक आपल्या अध्यक्षांपेक्षा नोबेल पुरस्काराने सन्मानित त्यांचा लाडका स्पॅनिश कवी पाब्लो नेरुदालाच अधिक महत्त्व द्यायचे...

   आम्ही जाणतो-साहित्यिकांनी संतापत्व त्यागून थोडेजरी संतत्व धारण केले तरी त्यांच्या निर्मितीचं सोनं होतं.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209