Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

सहृदय रसिक आणि कलावंतांची कीर्ती

     सहृदय रसिक हा अव्यक्त कलावंतच असतो. तो साहित्यनिर्मात्याइतकाच महत्त्वाचा असतो. म्हणून साहित्यिकांनी आपल्या रसिकांशी सन्मानाने वागले पाहिजे. सहृदय रसिकांनी अस्सल कलाकृतीच्या केलेल्या आस्वादगौरवामुळेच कलावंताला कीर्ती लाभत असते. कलाकृतीचा गौरव हा पर्यायाने रसिकांच्या आस्वादाभिरुचीचाच गौरव असतो. पण जगाचे चित्र काही वेगळेच आहे. (

     “आम्ही चिंध्या पांघरून
     सोनं विकायला बसलो 
     गिहाईक कसं ते फिरकेना
     मग सोनं पांघरून
     चिंध्या विकत बसलो
     गर्दी पेलवता पेलवेना" 

     अस्सल कलाकृती नैसर्गिक रत्नासारखीच असली, तरी रत्नाला नंतर रत्वकौं विविध आयामांचे पैलू पाडून अधिक तेजस्वी करतो. संपूर्ण कलाकृती हो तरल संवेदनद्रव्य आणि नैसर्गिक उंचबळ यांच्या संयोगातून संस्कार सौदर्याचे विविध पैलू धारण करून जेव्हा निर्माण होते, तेव्हा तिच्या कायावाचा-मनाचे तेज काही औरच असते.

     भाषेचा शोध आणि बोलीचे मोल

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan      मानवाला शब्द तथा भाषेचा शोध लागण्यापूर्वी त्याच्यापाशी हावभावकृती हे संवादाचे माध्यम होते. पशुपक्षी, वृक्षवल्ली यांच्याशी निसर्गाचे जे संवादनाते आहे; या नात्याने आदिम मानवाला आकर्षित केले आणि तोही निसर्गाच्या घटकातील संवादांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यातूनच पुढे त्याच्या भावसंवादात आमूलाग्र बदल होत गेला. उद्गार, चीत्कार, हसणे, रडणे, नाचणे, गुणगुणणे या प्रयासांतूनच नंतर त्याला बोलण्यासाठी, ‘बोल', गवसला. या बोलाचीच पुढे 'बोली' झाली. तिला शब्दांचे सत्त्व लाभले. त्याच्या स्मृती जनुकात अनेक नवनव्या चराचर ज्ञानस्मृती गोळा होऊ लागल्या आणि याबरोबरच भाषेचाही उगम झाला. मौखिक बोल-बोलीच्या स्मृती संकेतांवरून भिन्न-भिन्न भाषा आणि लिपींचाही जन्म झाला. अक्षरांना शाईरूपी आई लाभली.

     बायबलमध्ये वचन अकरा XI १,९ मध्ये सांगितलंय की, पृथ्वीवर सर्वत्र एकच भाषा व बोली होती आणि बाबेल येथे सर्व पृथ्वीवरील भाषांचा घोटाळा होऊ लागला. म्हणून ईश्वराने निरनिराळ्या देशांत त्या फेकल्या.

     भाषेच्या उत्पत्तीसंबंधी मॅक्समूलरने ‘डीगंडांग' हा सिद्धांत मांडला. त्याच्या मते, प्रत्येक शब्दाला एक नाद असतो.

     तर भाषेची उत्पत्ती प्रेममूल असल्याचा सिद्धांत जेस्परसन यांनी मांडला. जगात भाषेचे ३ ते ६ वर्ग मानले जातात. त्यात १) आर्यन, २) सेमेटिक, ३) ट्युरेनियम, ४) मंगोलियन, ५) द्रवीड, ६) इतर मिश्र.
       तेलुगू, तामिळ, कन्नड, मराठी आणि गुजर या भाषा द्रवीड भाषेत मोडतात.  

     सिंध भागात आर्यांच्या  आगमनापूर्वी पैशाची -पाली-प्राकृत ह्या बोली होत्या,

     नवीन नवीन अर्थांची निष्पत्ती आणि तिला अनुरूप सुंदर रचना की दोहोंनी युक्त अशी प्रबंध संपत्ती, सृष्टीच्या प्रारंभापासून प्राकृत भाषांमधील झाली, अशी ग्वाही वाक्पतीराज देतो.

     शृंगाररसपूर्ण व युवतीजनांना प्रिय असे प्राकृतकाव्य श्रुतिगोचर असताना संस्कृत पढून काय करायचे असे कविराज जयवल्लभ म्हणतो, असो.

     १)महाराष्ट्री २) शौरसेनी ३) मागधी ४)अवन्तिका ५) पैशाची या प्राक बोली.

     'भावार्थ दीपिका' अर्थात 'श्री ज्ञानेश्वरी'च्याही पूर्वी इ.स.९८३ मधील म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात

     श्री चावुण्डराजे करवियले ।
     गंगराजे सुत्ताले करवियले ।। 

     असा उल्लेख आला आहे. हा मराठी भाषेचा प्रारंभ नमुना काय दर्शवितो? 
     ही भाषा प्राकृत मराठी बोलीची निशाणी आहे. गंग घराण्याच्या कर्नाटकी राजवटीत ही भाषा होती.

     दण्डीला ग्राम्यभाषा अर्थात प्राकृत बोलीचे फार वावडे होते. माधुर्यता ही ग्राम्यभाषेत असूच शकत नाही, असे त्याचे मत होते.

     या उलट माडखोलकर म्हणतात, "ग्रांथिक भाषा ही नदीला बंधारा बांधून अडविलेल्या पाण्याच्या साठ्यासारखी आहे. ह्या धरणाचे स्वरूप विशाल असेल तरी नदीच्या जिवंत प्रवाही पाण्यासारखे नाही."

     तर आपला मुद्दा बोलीच्या संदर्भात आहे. विदर्भाच्या वाणीच्या हरड्याइतकीच वैदर्भीय बोलीभाषा मोठी गोड आहे. अशा या विदर्भान मराठीचे बीज वैभव महानुभवी साहित्यातून अंकरित केले, ते 'रिद्धपूर । मराठीचे आद्यकेंद्रच आहे, हे कोण नाकारेल? बोलीचे सामर्थ्य हे प्रमाण भाषेहून अधिक असते. कारण बोलीतून प्रमाण भाषेचा जन्म होतो.

     पुनश्च एकदा दिवंगत थोर साहित्यिक ग, त्रं. माडखोलकरांचे म्हणणे आपण बघू या. ते आपल्या 'जीवन साहित्य' या लेखातून संस्कृत पंडितांची मराठीविषयीची मानसिकता या शब्दांतून मांडतात. "मराठी ही बोली, बोलूनचालून अपभ्रष्ट: सामान्य लोकांच्या जिव्हादोषांमुळे विकृत होत-होत त्यातून) उत्क्रांत झालेली बोली. तिला देवळात थारा नव्हता, सभेत आसरा नव्हता. आणि देवगिरीच्या सिंहासनावर जरी महाराष्ट्रीय सम्राट अधिष्ठित झालेले होते, तरीही दरबारात निवारा नव्हता. गीर्वाणवाणीच्या मागे, धर्म, संस्कृती आणि परंपरा ही जणू छत्रचामरे ढाळीत अवनम्र झालेली; तर मराठीच्या मागे भ्रष्ट पतितांचा आणि स्त्री-शूद्रांचा घोळका सहानुभूतीच्या अपेक्षेने ताटकळत उभा; अशी मराठी भाषेची अवस्था होती. म्हणूनच पंडितगिरीने केलेली ही बहुजन समाजाच्या भाषेची हेळणा पाहून वैतागलेल्या एकनाथ महाराजांनीच त्वेषाने विचारले होते,

     संस्कृतवाणी देवे केली
     प्राकृत तरी चोरापासोनि जाली?' 

     माडखोलकर पुढे म्हणतात, “वाङ्मय भ्रष्ट होते ते सामान्यांच्या संसर्गामुळे नव्हे, तर असामान्यांच्या मानसिक अवनतीचे प्रतिबिंब त्यात उमटते म्हणून."

     खरे तर प्राकृत हीच संस्कृतची जननी आहे, हे आता लपून राहिलेले नाही

     कारण प्राकृत म्हणजे अपरिपक्व आणि संस्कृत म्हणजे पक्क ! मग उत्क्रांतीचा प्रवास अपरिपक्वतेकडूनच होईल ना! की पक्वतेकडून ?

     बाबांनो, जनभाषेचं फार मोठं महत्त्व आहे. आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जनभाषेचा गौरव करताना म्हणतात -
       'वेदशास्त्र पढे हो पर जनभाषा नही जानोगे 
     उसके बिन नही समाज सुधरे, क्या कहना यह मानोगे'
 
     असेल तर असू द्या तुमची रांगडी, ओबडधोबड भाषा. तिच्यात मनातलं सत्त्व झरझर झरू द्या. त्यांना ती ग्राम्य वाटते म्हणून त्याचा संकोच बाळगू नका. जगातलं श्रेष्ठ वाङ्मय बोलीतूनच प्रसवलं आहे. प्रमाण भाषेच्या  परिमाणातून नाही. होते हे प्रमाण भाषेत क्रियापद तर मग व्हते, हे बोलीतले कसे काय प्रमाण झाले ?

     आपल्या संततकोबाची. संत गाडगेबाबांची भाषा को गाडगेबाबांच्या कीर्तनातला एक नमुना  बघा.   -  

     'तुम्ही घरी गणपती आनता की हाई ? 
     'आनतो? 
     'त्याले मखरात बशीवता का न्हाई?' 
     'बशीवतोऽ' 
     'त्याले निवेद दाखविते का न्हाई?' 
     'दाखवितो.' 
     'मग पाच-सात, दहा दिस उलटले का त्याले 
     डोईवर, बशिवता का न्हाई?' 
     'हो ' 
     मंग त्याले कोठं लांबवता....?'
     'हिरीवर' 

     अरे, ज्याले मोरया मोरया करत घरी आनता; त्याचा गजर करता, त्याच्या आरत्या करता; त्याले निवेद दावता, मग त्यालेच कावून मोरयामोरया करत पाण्यात बुडवून मारता? असं माणसाचं केलं तर तुमच्यावर खटला भरून फौजदारी व्हईल का न्हाई ? ( 'तेली समाजक्रांती पाक्षिक' )  



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209