Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

कवीच्या मुखातून आजचे जग बोलताहे

     बाबांनो, आजचे जग सर्वत्र कवीच्या मुखातून बोलू पाहत आहे. ही कीकरिता अत्यंत सुखद अशी घटना आहे.

     उत्तम काव्यनिर्मितीची अपेक्षा करणारा कवी उत्तम अभिरुचीसंपन्न हवाच. त्याशिवाय तो निर्मिती अवस्थेतील परमोच्च आनंदरसाचा आस्वाद घेणार तरी कसा?

     रुची ही सर्व प्राणिमात्रांना लागू आहे. अगदी गुराढोरांनासुद्धा, पण अभिरुची - तिचे बुद्धी - भावना आणि प्रतिभेशी नाते आहे.

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan      अभिरुची रुचीच्या पातळीवर आली, की मग तो आम्रफळाचा रसास्वाद ठरतो; काव्यरसाचा नव्हे; कधी-कधी किंवा बरेचदा परीक्षेचा अभ्यास म्हणून आपण जेव्हा केशवसुत ते मढेकर किंवा ज्ञानेश्वर ते तुकाराम अशा वाङ्मयविश्वाचा अभ्यास करतो, त्यावेळी तो अभ्यास बहुतकरून रुचीचा भाग असतो. तेव्हाही विद्यार्थी नीट अभ्यास करीत नसेल तर "त्याची अभ्यासात रुची नाही" असा शेरा आपण मारून जातो. पण तो पद्धतीचा अभ्यास टाळून अन्य कवींच्या काव्याचा अभ्यास करताकाव्यनिर्मिती करू लागला तर तो त्याच्या अभिरुचीचा भाग होतो.

     मनुष्य या निर्मितीला निर्मात्याने बुद्धी, भावना (सौंदर्यभावोस संवेदना आणि प्रतिभा बीजरूपात बहाल केलेली आहे. या बीजाला या आणि निष्ठेची ओल लाभली, की ते अंकुरायला लागतं. पण पुढे त्याचा वृक्षरूपात नीट विकास करावयाचा की नाही, ही ज्याच्या-त्याच प्रातिभसामर्थ्याची बाब आहे बाबांनो !


     बाबांनो, आमचे तुकोबाराय म्हणतात, 

     'कलियुगी कवित्व करिती पाषांड 
     कुशल हे भांड बहु झाले ।'

     असे आम्ही कुशल भांड आहोत. आमचं कवित्व तुकोबाच्या चपलेला लागलेल्या शेणामातीचीही बरोबरी करू शकत नाही.

     कवी नेणिवेच्या अथांग-खोल डोहात उडी मारून तळाशी जातो. तिथे तो एखादी नवी प्रतिमा पकडण्यासाठी आपले कसब पणाला लावतो. उदा. तो एका सुवर्ण मासोळीचा पिच्छा पुरवितो, अखेर ती मासोळी त्याच्या हाती लागते; पण त्याचवेळी त्याची प्रतिभापकड सामर्थ्यशाली नसेल तर ती प्रतिमा आपल्या अद्भुत किमयेने क्षणोक्षणी विविध रूपे धारण करून, पकड़ पाहणाऱ्यास भुलणभोवऱ्यात घेऊन जाते. मग संभ्रमावस्थेत कवी जाणिवेच्या पृष्ठावर येता-येता निर्मिती प्रक्रियेशी तादाम्य पावण्याचा प्रयत्न करतो. त्याला काहीसे निर्मिती फळ प्राप्त होतेही. पण त्याचे त्यालाही कळत नाही की पदरी काय पडले? कारण निर्मितीलाही त्या संभ्रमावस्थेची बाधा झालेली असते. म्हणूनच ती असंबद्ध वाटते.

     पण प्रज्ञापकड सैल नसेल, प्रचंड मजबूत असेल, तर गवसलेली तरलरंगी नावीन्यरूप अशी वलयवती प्रतिमा त्या प्रज्ञावंताला प्रसन्न होते. मग ता स्वत: सोनमासोळीसह, समुद्र, पाणी, कोळी, नौका, जाळे, जिन्न, जलचर,  वाळू, शंखशिंपले, मोती, लाटा, किनारे, वादळवारा, समुद्रपक्षी, समुद्रारण्य आदी प्रतिमांचे समूहच्या समूहनिर्मितीला अधिक देखणेपण बहाल करण्यासाठी स्वसौंदर्यद्रव्य पणाला लावतात. यातूनच मग कसदार-दर्जेदार, स्थलकालनिरपेक्ष अशा थोर कलाकृतींचा जन्म होतो.


     म्हणून शब्दसृष्टीच्या वारकऱ्यांनी नेणिवेच्या डोहात सावधपणेच उडी घ्यायला हवी, कारण त्या डोहातील, तरल विश्वाचा तरलताल, कलावंताचे काय काय हाल करेल, हे कल्पनातीत आहे.

     कारण काव्यनिर्मिती हीसुद्धा योगसाधनाच आहे. आत्मखंट्याला बांधून असलेला माणूस सतत दुःखाला गोंजारीत असला की तो विश्वविन्मुख होणे आलेच. मग तो त्या कोषातल्या रेशीमकिड्याप्रमाणे गुदमरत राहतो. त्याच्या कोषाचीही तीच अवस्था. त्याभोवती रसिकांएवेजी प्रेक्षकांची गर्दी घुटमळते. समूहनिष्ठ दुःख प्रवाहगत असून, व्यक्तिनिष्ठ दुःख-कौतुक हे साचलेल्या पाण्यासारखे आहे.

     बाबानो, मनुष्य हा प्रगल्भ असा सामाजिक प्राणी आहे आणि त्याची जाणीव- नेणीव ही वैश्विक आहे, मग त्याचे विचार-आचार आणि उच्चारद्रव्य समाजभिन्न कसे राहील? वाङ्मय निर्मिक कितीही आत्ममग्न वा आत्मकैद असो किंवा त्याने कितीही स्वान्त सुखाय म्हणून घोषणा केलेली असो, एकदा का त्याने आपली निर्मिती रसिकास्वादाला रुजू केली की त्याची ती घोषणा निरर्थक ठरते.

     तळपत्या उन्हाच्या काहिलीने ल्हा-ल्हा झालेल्या मनुष्याला जेव्हा एखाद्या झाडाच्या सावलीचा गारवा लाभतो. त्यामुळे तो सुखावतो. सावलीचा गुणधर्मच मुळी आल्हादकता देणे हा; मग तो वृक्ष कल्पतरू असो वा विषवृक्ष ! वृक्ष आपला मूळ धर्म सोडत नाही; म्हणून कुणाचीही सावली छाटू नये, अगदी स्वत:चीसुद्धा ! विस्तारावं केव्हा अन् संकोचावं केव्हा, हे सावल्यांना कळत असतं.

     'वृक्ष कधी आपले 
     घाव मोजत नाही
     तो कु-हाडीला अन् त्यालाही 
     सावली देतो 
     जो कधी त्याला पाणी पाजत नाही.' 

     दैनंदिन जीवनातील उकाडा असा झाला की रसिक, सानि आसरा शोधतो. आल्हादानंद निर्माण करणे हा कलाकृतीचा धर्म करून रसिकामध्ये झटिती प्रत्ययाने पुन:निर्मितीची भावस्थिती हे कार्य उत्तम वाङ्मयकृतीकडून सहज येत असते. दाहक मा निर्माण झालेले साहित्यही आल्हादानंद निर्मितीचा धर्म सोडत आल्हादनंदाची भावनाच माझ्या अल्पमतीनुसार सौंदर्यभार कौरूप्यभावना मनुष्य योजना असून सौंदर्यभावना मात्र मूलत: निसर्गनिर्मित आहे. कारण पृथ्वीच मुळात आनंदमयी आहे. सर्व दुःखाचे कारण मनपा खुद्द आहे. हे आम्हा सर्वांना पटत असेलच. नाही का ?


     मनुष्यप्राण्याचे माणूसभान जसजसे वाढत गेले, तसतसा त्या संवादकलेचाही विकास होत गेला. ही संवादकला म्हणजे साहित्यक होय.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209