Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

स्त्रीला समान सन्मान कुठे ? 

     स्त्रीला वस्तू समजून द्रौपदीला जुगारात लावणारे, सीतेला कुठल्यातरी कर्णोकर्णी पसरलेल्या अफवेच्या आधारे वनवास घडविणारे हे दोन्ही पौराणिक इतिहास आणि त्यावर आधारलेली महाकाव्ये आहेत तेवढी पुरे !

     स्त्रीला अपवित्र लेखनारे साधु-महंत वाढतच आहेत. मागे गुरू मां सरस्वती या हिंदुधर्मातील संन्यासिनीला हरिद्वारच्या योगशक्ती दिव्यधाम या संस्थेने ‘पर्वताचार्य' या वैदिक उपाधीसह पट्टाभिषेक करण्याची घोषणा करताच साधमहंतांच्या पोटात जबरदस्त गडबड झाली. त्यांनी "स्त्री' ही मुळात अपवित्र दर्शविली म्हणून तिला ‘पर्वताचार्य' या उपाधीने कधीही सन्मानित करता येत नाही', असा धर्मादेश फर्मावला. कारण तिला गरुचरित्रच वाचायला अधिकार नाही, तर आचार्य अर्थात गुरुस्थान ती प्राप्त करेल कशी ?

     जिथे स्त्रीचा अवमान होतो तो देश कधीही महान होऊ शकत नाही. बाबांनो।

     'साऱ्या शंका-कुशंकांची स
     स्त्रीलाच का शिक्षा 
     तिलाच का वारंवार 
     पास कराव्या लागतात 
     पुरुष विद्यापीठाच्या
     अनेक अग्निपरीक्षा। 

     पुरुषप्रधान संस्कृती आजही मुजोर आहे. स्त्रियांना आजही पुरुषांशी बरोबरी नाही. पुरुष कसाही वागला तरी तो पुरुषच असा हेका कोठवर ? यावर मी एक मजेदार भारूड ऐकवतो. दाजी आपल्या मेव्हणीला चिडवतो

     'उ बाई ऊ डोकशातली ऊ 
     शम्पोने धू नाही तर साबणाने धू' 
     का बरं दाजी तुम्ही हटकता मला?
     आधी जाऊन हटका बरं आपल्या बायकोला 
     तिच्यासंगे झोपली होती 
     बाधी झाली मला 
     आता कोणाची ऊ !' 
     त्यावर मोठी बहीण उत्तरते 
      'धाकटे गे बहिणे, आता काय सांगू  तुला 
      जेव्हा - जेव्हा नवरा माझा 
      बाहेरगावी गेला 
      तेव्हा- तेव्हा नव्या उवा 
      संग घेऊन आला 
      आता सांग बरं तूच'
 
      - तर हा असा पुरुषप्रपंच आहे.


 
Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan      बाबांनो, आर्य इराणमार्गे भारतात आले असे खुद्द आपल्या लोकमान्य टिळकांनीच सिद्ध केले आहे. सिंधू संस्कृतीची निर्मिती आर्यांमुळे झालेली नाही. उलट आर्य येण्यापूर्वी येथली मूळ सिंधू संस्कृती या भारतवर्षात होती. मध्य प्रदेशाच्या मालवा भागातील पहाडगंज येथेही याचे पुरावे सापडले आहेत. आर्य येण्यापूर्वी येथे 'मातृ देवो भव' अशी मातृप्रधान संस्कृती होती. आर्यांनी ही संस्कृती नष्ट करून तिथे पितृप्रधान संस्कृती लादली. म्हणून येथील मूळ स्त्री आणि आजचीही स्त्री पुरुषांच्या तुलनेत दुय्यमच. काय तर म्हणे ती धर्मपत्नी; आर्यांच्या आचारसंहितानुसार आजही स्त्री दस्युवंशाची, अश्म संस्कृतीची; म्हणून तिला आजही गुरुचरित्रच वाचनाचा अधिकार नाही; म्हणूनच तर थोर आर्य संत तुलसीदास नमूद करून गेले... .. 

     'ढोर गवार पशु और नारी, ये सब ताडनके अधिकारी

     बाबांनो, येथपर्यंतच आपले पूर्वज थांबले नाहीत, तर त्यांनी पती निधनानंतर तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले. बाबांनो आपल्या मातेला आपल्यासमोर पित्याच्या चितेवर चढवताना तिच्या, तुमच्या-माझ्यासारख्या मुलांना काय वाटले असेल? किंवा तिची काय स्थिती झाली असेल? याचा विचार करताना बाबांनो, डोकं काम करत नाही. पार कवटी सरकन जाते. बरं झालं इथं, इंग्रज आले. त्यांनी राममोहन रॉय समजून घेतला आणि ही आसरी प्रथा
कायद्याने बंद पाडली. बाबांनो, कायद्यानेच माणसाचे माणूसपण बऱ्याच अंशी सांभाळले. कायद्यालाच आमचे माघारलेपण बघून कळवळा आलातसा आरक्षणविषयी तुम्हालाही येऊ द्या बाबांनो !


     स्त्री, शूद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता- मग वेदवाक्य कानावर पडण दरच - आणि ते चुकून पडले तर तप्त शिश्याचा रस कानात....

     बाबांनो. कुत्र्याहूनही निपत्तर जिणे ज्यांच्या वाट्याला आले त्याच्या वाट्याला कधी नव्हे ते आलेले आरक्षणाचे ताट हिसक नका. आम्ही परके नाहीत ;  आम्ही तुमचेच आहोत हे विसरू नका ! बाबांनो. आम्हा सा तकोबाचे वारकरी. आमचं सरळसोट वागणं !


     'भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी देऊ काठी' 
     याचाच अर्थ आमच्या पद्धतीनं असा
     आम्ही अडलेल्यांना अंगावरचे 
     अर्धे धोतर देतो 
     मात्र चढलेल्यांचे अवघे धोतर 
     सोडून घरी नेतो... 

     ओबीसी समाजाला 
     ललकारता कशाला? 
     जरी तो झोपलेला 
     अवजार आहे उशाला ! 
     आम्ही तुमचाही विचार करतो बाबांनो, 
     पुढारलेल्या गरिबांनाही
     आरक्षण लागू करा
     माघारलेल्या बांधवांचा
     विरोध मात्र बंद करा !...
 
     खालच्या जातीचे म्हणून 
     आजवर आम्हा नागवले 
     सांगा कधी वरच्यांनी 
     आम्हा समान वागवले?
     आजही वरचे लोक 
     जातीयवाद पाळतात 
     खालच्यांना जिथे-तिथे 
     नाक मुरडून टाळतात 
     किती काळ चालणार 
     उच्च - नीचचा तमाशा?
     अरे आपण माणसं आहोत 
     की प्रेतावरच्या माशा? 
     ज्यांचे घरचे सर्वच 
     पगार मिळवतात मस्त 
     तेच होताहेत अधिक 
     आरक्षण भयाने त्रस्त 
     आरक्षणामुळे खालचा 
     नोकरपेशात उरला आहे 
     आरक्षण बंद होताच 
     वरच्यांचा डाव ठरला आहे 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209