Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

संत तुकोबांचे वैकुंठ कुठले ? 

     आमचा बाप तुकोबा म्हणतो,
          तुका म्हणे असल जाती । जातीसाठी खाती माती।' 

     त्याचप्रमाणे

     ‘जात न पुछिए साधुकी । पूछ लिजीए ग्यान ।
      मोल तलवार का पड़ा रहने दो म्यान ।' 

     असे संत कबीरसाहेबांनीही म्हटलेले आहे. परंतु याच विवेकवंतांच्या पुणे- देहूत जगद्गुरू संत तुकोबारायांना जातीयवादाच्या निखाऱ्यांनी पोळून काढले. इथे साधूची जात आडवी आली. त्यांच्या सागरासारख्या अफाट ज्ञानाला जातीच्या उच्च- नीच तराजूत तोलण्यात आले. हा बहुजन ज्ञानी पुरुष अखेरपर्यंत हीनच वाटला. 

     छत्रपती शिवरायांचे खरे गुरू संत तुकारामच होते, याची खऱ्या इतिहासात नोंद आहे. शिवरायांविषयी तुकोबा म्हणतात, 

      'शिव तुझे नाव । ठेविले पवित्र। छत्रपती सूत्र। विश्वाचे तू।।'

 
     आमच्या डॉ. पंजाबराव देशमुखांचेही संत तुकाराम तर स्फूर्तिस्थानच होते. तसे ते आम्हा सर्वांचेही स्फूर्तिस्थान आहेच.

     संत तुकोबाराय ठासून सांगतात,

     'बरे झालो देवा कुणबी झालो. अन्यथा असतो दंभे मेलो', असो ! 

      Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan बाबांनो, गीतेवरील महान भाष्य 'भावार्थ दीपिका ' (ज्ञानेश्वरी नव्हे) रणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे काळीही सनातनवाद्यांनी असाच अघोरी कहर केला होता. त्यालाही बहिष्कृत केले होते. 

     जाती - व्यक्ती पडे बिंदुले- जेव्हा भाव होती मज मीनले, 

     जैसे लावण्यकण घातले - सागरावरी ।

     असे प्रतिपादन करणाऱ्या आणि सर्व जातीपातींना निर्भेद करणाऱ्या संत जानदेवांच्या मातापित्यालाही निर्दय लोकांनी जलदिव्यात संपविले. काय वाटलं असेल, त्या अनाथ बालकांना त्यावेळी ? अजून एक कहर, रेड्याच्या मखातून म्हणे वेद वदविले ! यावर काय ते मी खालील कवितेतूनच सांगतो, 

     'काल परवाचीच गोष्ट 
     ज्ञानेश्वरांचा वेदवेत्ता रेडा
     मला पहाटेला भेटला
     आणि खानदानी वात्सल्याने
     अंगाला येऊन खेटला 
     मी म्हणालो, "रेडेबुवा 
     या रामप्रहरी मुखातून ब्रह्मज्ञान काढा 
     ऐकवा एखादा वेदांचा पाढा” 
     तो म्हणाला, “बुढ्या फकिरा, ते सोडा 
     नुकतेच हे शेण पडले आहे, ते उचलाना 
     कामी तरी येईल 
     किमान टाकायला अंगणात सडा 
     अरे, गेली सातशे वर्षे 
     मी वेदच वदत आलो 
     स्मृती-पुराणांना 
     जिभेवर नाचवत आलो
     परंतु माणूस तर माणूस 
     निदान आमच्या हल्याच्या जातीतला 
     एकतरी दिसला का बदललेला? 
     नाही तर आमच्या क्षद्र शेणाचेच पहा 
     त्याचा सदा बोलबोला 
     त्याच्यासाठी पहाटेपासून
     बायकांचा कलबला 
     महात्म्य शेणाचे जाणोनी 
     वेद तया घरी भरे पाणी 
     शेण-गोमूत्र रसायनी 
     पंचामृते ते पवित्र 
     अरे, हे शेण ज्याला रुचले, त्यालाच पचले 
     त्यालाच दुनिया खांद्यांवर उचले

     तरी बरे की शेणाला सुगंध नाही
     नाहीतर घडले असते काहीबाही 
     कारण कोणी काय सुंगावे आणि 
     हुंगावे यास्तव कुणावरही निर्बंध नाही
 
     अरे, आमच्या शेणाच्या 
     गोवऱ्यादेखील होतात भल्या 
     मी वेदबोल्या असूनही 
     अखेर माझा होतो हल्या 
     घरातल्या कुणाचे दारात 
     पडून असेल प्रेत 
     तर लोक ते त्वरित 
     घाटावर नेऊन जाळतात
     मात्र दारात पडलेले दिसले शेण 
     की हक्काने भांडून सांभाळतात 
     हे विश्वचिंतेकरा फकिरा, 
     शेणाची महिमा अपरंपार आहे 
     शेण खाणाऱ्यांचेच इथे 
     सत्कारावर सत्कार आहे"

     मी म्हणालो, “रेडेबुवा 
     कशाला मनाला लावून घेता 
     अन् आपली जहाल तब्येत बिघडवता 
     खाऊ द्या ना खाणाऱ्यांना 
     किती खातात ते...! 
     आपल्याला सडा टाकायला 
     काही नुरणार नाही 
     तुमच्या म्हशीचे तुमच्याशिवाय 
     कुणीही उचलणार नाही.”

     “अरे माझ्या वेड्या फकिरा, 
     विषय शेणाचा थट्टेचा नाही 
     सडा शेणाचाच टाकता येतो
     शेण खाणाऱ्यांच्या विष्ठेचा नाही" - 

     संत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठात पाठविले. अगदी बालभारतीपासून एम.ए.पर्यंत हेच शिकवले जात आहे ना बाबांनो?

     न लगे वैकुंठ मोक्ष सायुजता 
     सुख वाटे घेता जन्म ऐसे 
     सांडुनि सुखाचा वाटा । 
     मुक्ती मागे तो करंटा'


     असं ब्रह्मांड ज्ञान प्राप्त झालेले संत तुकोबा वैकुठी जातीलच कोसे ? ज्यांनी भूलोकीचे वैकंठ मानले ते कल्पनेतल्या स्वगोत उड्डाणे  भरतील कशाला  ?   दिवंगत जनसारस्वत सुदाम सावरकर याना तर खूनच झाला सप्रमाण सिद्ध केले आहे.

     डॉ. श.रा. वाळिंबे या विद्वानाच्या शब्दांत प्राकृत भाषेत अध्यात्मा निरूपण करण्याच्या उपरोधाबद्दल या कर्मठ ब्राह्मणांनी तुकारामासारख्या लोकोत्तर महात्म्याला धारेवर धरले आणि त्याचा छळ केला. संत बहिणाबाईंनी मारू पाहे घात चिंतुनीया' असे नमूद करून ठेवले आहे.


     तद्वतच 'माउली'च्या १९५६ च्या दीपोत्सव पुष्पात (पृष्ठ - ३१) म्हटले आहे. 

     'तुका गेला वैकुंठाशी । कुणी कुणी पाहिला 
     नांदुकी झाडाखाली । जोडा रेशमी राहिला.'

     (संदर्भ - संत तुकाराम वैकुंठगमन की खून?' ले. - सुदाम सावरकर)


     संत तुकारामाचा खूनच करण्यात आला हे आता लपून राहिलेले नाही. या सत्याशी जे थोर विद्वान सहमत आहेत, त्यात श्री. ना. बनहट्टी, दयानंद पोतदार, इंदुभूषण भिंगारे, डॉ. वि.भि. कोलते, वीर उत्तमराव मोहिते, सुदाम सावरकर, अलीकडचे प्रा. गौतम निकम, विठ्ठल लांजेवार ही मंडळी प्रामख्याने आहे. एवढेच नव्हे, तर खुद्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही 'मेला की मारला कळेना, म्हणती वैकुंठी गेला । कितीतरी वेळा । घात ऐसा सुजनांचा। आमुच्याने झाला।' असे स्पष्ट नमूद करून 'घात झाला' म्हटले आहे यावरून काय सत्यबोध होतो? वैकुंठ काय फक्त तुकोबांसाठीच रिकामे होते? समकालीन संत व वैकुंठस्वामी रामकृष्णांसाठी नव्हते? अरे, इतकं खोटं रचून तुम्ही सुटू शकत नाही.

     एवढे विस्ताराने संत तुकोबांबद्दल सांगणे एवढ्यासाठीच की आज है संमेलन ज्या फुलेनगरीत शब्द गजराने गाजत आहे, तिथे शब्दसम्राट आमचा बाप संत तुकाराम यांच्या कपोलकल्पित वैकुंठागमनाविषयी नव्यांना सत्य कळावे आणि तेच अभ्यासक्रमातन शिकविले जावे अशी आमची धारणा आहे.' 

     पण हे करताना संत तुकारामाचे काळी काही नाठाळांमुळे ते घडले. त्यासाठी आजच्या निरापराधांना वेठीस धरता येत नाही. पण पुण्याच्या 'मनोहारी मनोयुवा' मे-जून २००६ च्याच अंकात वि.श्री. मराळकरांनी संत तुकारामाच्या अकस्मात गुप्त होण्याविषयीच्या संशोधनात भाषा दुर्गंधीचा प्रयोग केला, तसेच २१ फेब्रुवारी २००६ च्या बारावीच्या पेपरात काय घडले ते जाणता ना? हे असे वारंवार होत असेल तर... जय संभाजी होणारच, असो! तुकोबा 'बोले तैसे चालें होते.' आताचे संत कसे आहेत ते सांगणे न लगे!

     आमच्या मां साहेब जिजाऊबद्दलही अखेरी गरळ ओकलेच. मग आम्ही काय करावं. हाती घ्यावे अवजारा की - पैजारा ? सांगा बाबांनो, सहदेव - भाडळीसारख्या मनुवृत्तींनी पुन्हा डोके वर काढू नये, असं तुम्हालाही वाटतं का नाही?


     ओबीसी बहुजन हे बहुत करून हिंदूच आहेत ना! मग तुमचा त्यांच्याविषयी हा दुःस्वास, द्वेष अजून किती काळ चालणार? याच जाचापायी हिंदू बहुजनांमधील कितीतरी लोक मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध झालेत. तरीही ही तुमची मनुवृत्ती, काहीच कसा धडा घेत नाही बाबांनो?

      'मग गर्व से कहो हिंदू है' हा नारा कशासाठी आणि कुणासाठी ? 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209