देशाचे दुश्मन, ( भाग 9) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
या जातीच्या अस्सल सैतानाने प्रतापसिंहावर संकट आणून त्यांना पदच्युत करविले, यावेळेचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे, मस्तक फिरवून सोडणारा आहे. ब्राह्मणेतरांची मुक्तता करणारा पहिला छत्रपती ब्राह्मणांनी कसा चोहोकडून छळला ! हा इतिहास वाचीत असता, ज्यांचे चित्त बेभान होणार नाही तो मनुष्यच नाही. केळकर - लेले- नातू - सांगलीकर - पटवर्धन वगैरे भटाधिपतींनी गोऱ्या साहेबांच्या तंबूपुढे दोन दोनशे भटे उभी करावीत आणि या सातारचा छत्रपती आमचा धर्म बुडवितो असा शंख करावयास लावावे. प्रतापसिंहाकरिता सर्वस्वाचा त्याग करणारा नेकजात कायस्थ बच्चा रंगोबापूजी गुप्ते याची कोणीकडे स्वामीनिष्ठा ! आणि नीच जात भटबाच्या नातूचा कोणीकडे राजद्रोह ! ब्राह्मण- ब्राह्मणेतरांच्या मनोरचनेचा हा भेद अवश्य लक्षात ठेवावा. ज्या ब्राह्मणाच्या मगरमिठीच्या गळपट्टीकरिता टिळक-चिपळूणकरांनी जन्मभर मनगट-मुखाचा संयोग केला. ब्राह्मणाच्या नासक्या अढीतून नातूसारखे इतके सडलेले आंबे निघालेत आणि त्यामुळे बहुतेक इतके डागाळलेत की आढीच्या आढी बाहेर टाकून दिल्याशिवाय हिंदू समाजाचे मानसिक आरोग्य नीट राहणार नाही हे इतिहास सिद्ध करीत आहे. या नातूच्यानंतर ब्राह्मणेतरांचा वैरी आणि ब्राह्मणांचा कैवारी विष्णूभट चिपळूणकर निघाला. बाळभट नातूच्या वेळी प्रतिस्पर्धी प्रतापसिंह होते, या विष्णूभटाच्या छाताडावर नाचायला सत्यशोधक समाजाचे आद्य प्रवर्तक