देशाचे दुश्मन, ( भाग 7) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
आहे, असे म्हणायला पाहिजे. पण त्यांना दुसऱ्याला नसते दोष लावता येतात; स्वतःच्या जातीतले गडबडगुंडे कधीही दिसणार नाहीत; ज्यांनी राज्य कमविले, त्यांच्यावर उलटून पडून या संशयीत उत्पत्तीच्या आणि अशुद्ध बीजाच्या पेशव्यांनी छत्रपतीला कैदेत टाकले; त्यांनी लिहिणे, पुसणे सुद्धा शिकू नये म्हणून बंदोबस्त केला. मनुच्या काळी शूद्राला छळणारे, हे सर्व समाजाच्या मिश्र रक्ताने ब्राह्मण मादीच्या कुशीत जन्मलेले पेशवे पुन्हा मनुपेक्षाही निर्दय तऱ्हेने ब्राह्मणेतरांना छळू लागले. प्रभू जातीवर ग्रामण्यांची संकटे ओढवून अनेकांच्या गर्दनेवर सुऱ्या फिरवल्या! पेशव्यांच्या मायबहिणी दिवसाढवळ्या ढालगजपणा करून, त्यांचे शुद्धबीजत्व बुधवार चौकात मांडू लागल्या आणि याबद्दल जो नावे ठेवील त्यालाच हीन ठरविण्याचा पेशवे प्रयत्न करू लागले. प्रभूची जात म्हणजे भयंकर निर्भिड आणि तडफदार ! त्यांच्या तोंडून पेशवाईचे बींग पेशव्यांच्या तोंडावर उच्चारले जाणे अगदी त्रिकाल शक्य ! असल्या निर्भिड आणि सत्यन्वेषी प्रभूंचा पाडाव करणे हेच पेशव्यांचे कार्य ठरले. त्यांची परंपरा ही अजून त्यांचे सुहेर सुतके राखून आहेत. छत्रपतीचा शक बंद केला. छत्रपतींचा छळ आरंभिला. हे एकनिष्ठ प्रभूंना कधीही खपणार नाही, हे पेशवे जाणून होते. आडदांड मराठ्यांना नामोहरम करण्यात पेशव्यांच्या वाटेतला एक मोठा काटा, म्हणजे
त्यामुळे प्रभू जातीवर पेशव्यांनी जी आग पाखडली तिथून ते प्रभू होते म्हणून निभावले; इतरांची छाती नाही. आज घटकेला व्यभिचारोत्पन्न भट जातीतला राजवाड्यासारखा ब्राह्मण जर अजून प्रभूंच्या नावाने खडे फोडतो ! यावरून पूर्वीच्या त्यांच्या द्वेषाचा बोध होणे फारसे अवघड नाही. वेद उच्चारला, सोवळे नेसला, म्हणून सातारा जिल्ह्यात भिलवडी मुक्कामी ब्राह्मणांनी