देशाचे दुश्मन, ( भाग 25) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
मी तोंड पाहण्यास तयार नाही, असे त्यांनी रानड्यांच्या तोंडावर सांगितले. ४०-४२ वर्षे अविश्रांत प्रयत्न करून १८९० साली महात्मा जोतिराव कालवश झाले. जोतिरावांच्या मृत्यूची बातमी ऐकून ओंकारेश्वरापुढे महापूजा झाली असेल ! रस्तोरस्ती ब्राह्मणांकडून पेढे वाटले गेले असतील ! शाहू छत्रपती वारले ही बातमी ऐकून ज्या नराधमानी पेढे वाटावयास कमी केले नाही, त्यांनी जोतिरावांच्या मृत्यूसमयी धोतरे सोडून आनंदाने उड्या मारल्या असतील यात विशेष नाही ! नामर्दास प्रतिस्पर्ध्याच्या मरणाने आनंद होतो, मर्दाना प्रतिस्पध्र्थ्यांच्या मृत्यूने दु:ख होत असते ! टिळक वारले तेव्हा शाहू छत्रपतींना किती वाईट वाटले हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. तार धडकताच पुढले ताट फेकून 'शत्रूसुद्धा असाच असावा' हे त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, हे त्यांच्या मोठेपणाला शोभेसे होते. पण टिळक काही तेवढ्या मोठ्या योग्यतेचे नव्हते. जोतिरावांच्या मृत्यूसमयी टिळकांना हा मनाचा मोठेपणा आठवला नाही. आज टिळकही मेलेत, चिपळूणकरही मेलेत. मुडद्याच्या मरणाने मरणारे रोज अनेक मरत आहेत, सरणाचे सरपण मोलाचे जळले काय आणि गाडले काय, त्याची मातब्बरी जगाला नाही; पण महात्मा जोतिरावांसारखे धर्माकरिता मरणारे धर्मात्मे गेले तरी जगाला जिवंत करण्याचा उद्योग नुसत्या कीर्तनि व तत्त्वाने करीत असतात. जोतिराव हिंदू धर्माचे
हिंदू धर्मावर मिशनरी आग पाखडीत, ती जोतिरावांना सहन न होऊन ते ख्रिस्ती भटांवर तुटून पडत. भट ख्रिस्ती असो, नाहीतर हिंदू असो, तो जोतिरावांना खपत नसे. ब्राह्मणांच्या गुलामगिरीने हिंदू शेळपट, तेजोहीन व विस्कळीत बनलेत. राष्ट्रघातकी भटशाहीच्या तंत्राने हिंदू धर्माचे वाटोळे होईल म्हणून जोतिरावांनी आपल्या धर्मोद्धाराकरता वाहून घेतले. सत्यशोधक समाज निराळा धर्म नाही, निराळा पंथ नाही. तर हिंदू धर्माच्या उज्ज्वल तत्त्वांनी सर्व जगाला चकित करून सोडण्यास मोठ्या महत्त्वाकांक्षेने एक ठिकाणी जमलेल्या खऱ्या हिंदूंचा जमाव आहे. ब्राह्मण मूळचे इराणी आहेत, आणि आमच्या हिंदूत घुसून केवळ पोटासाठी आम्हाला लुबाडतात. इंग्रजी शिकलेली पिढीच्या पिढी ख्रिश्चन झाली. हे जोतिरावांना खपले नाही; स्वधर्माचा त्याग करणे म्हणजे हे महत्पाप आहे. पण स्वधर्मात भटांसारख्या लबाड लोकांना लुडबूड करू देणे हे त्याहूनही भयंकर पाप आहे...