देशाचे दुश्मन, ( भाग 23) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
झाला, त्यावेळी त्यांनी जामीन होण्यास जोतिराव तयार झाले होते. आपल्या शत्रूलाही संकटाच्यावेळी उपयोगी पडणारे जोतिरावांचे श्रेष्ठत्व हजारो चिपळूणकरांनी अनंत कालपर्यंत दोन्ही हातांनी ठोकली, तरी किंचितही कमी होणार नाही. हरीदास पुराणिकांनी नाडलेली गरीब ब्राह्मण विधवा असो, नाहीतर लाखो टक्याने आपल्यावर गालीप्रदान करणारा टिळक असो, संकटाच्या वेळी सहाय्य करणे हे जोतिरावांचे ब्रीद होते. जोतिरावांच्या स्मारकाला ब्राह्मण लोक विरोध करतात, त्याचे मूळ कारण हा मागचा इतिहास ! पहिला राजकारणी पुरुष अद्वितीय व पहिला कर्तबगार सुधारक, एकनिष्ठ देशसेवक आणि स्वार्थत्यागाचा मूर्तिमंत अवतार अशा पुरुषोत्तम जोतिरावांचा
तर त्या पुतळ्याकडे पाहून ब्राह्मणेतर जागे होतील, ब्राह्मणांच्या पोटावर पाय येईल. टिळकांचा बोलबाला देशोधडी जाईल, म्हणून सर्वांचे पुतळे बसवा आणि फुले यांचा पुतळा बसवू नका, असा ब्राह्मण लोक हट्ट धरीत राहणार ! ज्याला मत्स्य पुराणाला स्मरून शास्त्रोक्त वागायचे आहे, असे आमच्यातले काही धर्मषंढ फुले यांचे स्मारक करू नका असे म्हणणारच. पण शेवटी या सर्व भटांची आणि त्यांच्या खरकट्यावर जगणाऱ्या आमच्या दोन घरभेद्यांची नाचक्की होऊन जोतिरावांचा यशः शुभ्र पुतळा पुण्यात काय पण जेथे हिंदूंची वस्ती आहे, अशा अनेक ठिकाणी उभा राहणार.
ज्या पुणे म्युन्सिपालिटीपुढे आज फुले यांचे स्मारक करण्याचा प्रश्न येऊन पडला आहे, त्याच या म्युन्सिपालिटीने फुले यांच्या घरावरून मैल्याच्या उघड्या पाट्या नेवाव्यात आणि दारात ओतावयास लावाव्यात. १९२१ साली जर सत्यशोधकाच्या दारापुढे मैला टाकण्यास ही भटे भीत नव्हती, तर तेव्हा त्यांनी पुण्याचे शेतखाने डोक्यावर घेतले असतील यात नवल नाही. कै. नारायण मेघाजी लोखंडे व महात्मा फुले यांनी टिळकांची मुलाखत घेऊन सक्तीच्या शिक्षणाविषयी त्यांचे मत विचारले, त्यावेळी 'तुमचे तुम्ही पाहून घ्या, तुम्ही लोक शिकाल तर शेतकी बुडवाल' असे टिळकांनी साफ उत्तर दिले. त्यावेळचे टिळकांचे मत शेवटपर्यंत तसेच निर्लेप होते. हे पुण्यातील सक्तीच्या शिक्षणाच्या चळवळीच्या वेळी, अथणीच्या व्याख्यानात, मुंबईच्या अस्पृश्यांच्या सभेत जे जे प्रकार घडले त्यावरून पुन्हा सिद्ध होत आहे, ब्राह्मणेतरांनी शिकू नये, ही टिळकांच्या मनातील गाठ होती. उघडपणे असे प्रतिपादन केल्यास वेड्याच्या इस्पितळात जावयाची पाळी येईल म्हणून अप्रत्यक्षपणे आडपडद्याने हेच मत टिळक प्रतिपादित. त्यांच्या