देशाचे दुश्मन, ( भाग 24) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
सूक्ष्म निरीक्षण करणारास टिळकांच्या मताचा ब्राह्मण मासला ओळीओळीने खच्चून भरलेला दिसेल. गीतारहस्य प्रसिद्ध झाले त्यावेळी त्या ग्रंथावर इतकी टीका झाली आहे आणि त्याचा फोलपणा इतक्या लोकांनी सिद्ध करून दिला आहे की, त्याचे सविस्तर वर्णन करीत बसलो असता गीतारहस्याएवढाच ग्रंथ लिहावा लागेल. मुंबईच्या गिरणी मजूरांच्या संबंधी भांडवलवाल्यांनी जेव्हा मस्तवालशाही सुरू केली तेव्हा टिळकांनी भांडवलवाल्यांची बाजू उचलली आणि लोखंडे यांनी आपल्या 'दिनबंधू' तून कसल्याही द्रव्यलोभाला बळी न पडता मजुरांची सेवा बजावली. फंडगुंडगिरीचे प्रवर्तक टिळक काही तरी मलिदा मिळाल्याशिवाय भांडवलवाल्यांची बाजू उचलणार नाहीत. त्यावेळेच्या 'दिनबंधु' पत्राचे उतारे स्थलसंकोचास्तव देता येत नाहीत, पण जोतिरावांच्या सविस्तर चरित्रात ते प्रसिद्ध करण्याचे आम्ही आश्वासन देतो. जोतिरावांची तत्त्वनिष्ठुरता अगदी शंभर नंबरी होती; त्यांना तोंडाने एक बोलून कृतीने भलतेच करणारा मनुष्य बिलकुल आवडत नसे. पुनर्विवाहाची चळवळ करून प्रत्यक्ष न्या. रानडे यांनीसुद्धा जेव्हा पुन्हा लग्न केले, तेव्हा जोतिराव, रानडे यांच्यावर इतके घसरले की, असल्या