देशाचे दुश्मन, ( भाग 26) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
ब्राह्मणांना अॅटलांटिक महासागरात फेकून द्या म्हणतात. जोतिरावांनी त्यांस हिंदू जनसागरात बुडविण्याचा प्रयत्न केला आहे. टिळक फक्त भट जातीकरिता धडपडून मेले. जोतिरावांचे कार्य अखिल हिंदूकरिता आहे. भगवान बुद्धाविषयी जसे ब्राह्मणांनी खोटे नाटे लिहून ठेवले आहे, त्याचप्रमाणे फुले यांच्याविषयी चिपळूणकरादि ब्रह्म-मुख -योनीसंभव भटांनी लिहून ठेवले आहे. बळीचे राज्य वामनाने भिक्षा मागून घेतले, तसेच शिवाजीचे राज्य भिक्षा मागून घेण्याकरता रामदास टपला होता. शिवाजी राजे कच्च्या गुरूचे चेले नव्हते; त्यांनी भटांनासुद्धा आपल्या चरणांवर लोटांगण घ्यावयास लावले. बळीच्या वेळी वामन शिवाजीच्या वेळी रामदास आणि शाहू महाराजांच्या वेळी टिळक ही तीन भटे तीन राजांना निरनिराळ्या वेळी तीन तऱ्हेने फसवायला गेली. बळीपेक्षा शिवाजी महाराज जास्त शहाणे व सावध झाले होते. शिवाजी महाराजांपेक्षा शाहू महाराजांनी तर या देशबुडव्या भटांना पुरे ओळखले होते. कै. दास तर शाहू महाराजांच्याही पुढे जाऊन ब्राह्मणांच्या लेखीबाळी महारांच्या गळा अडकवू पाहात होते. या सर्व विवेचनावरून टिळकांना देशभक्त म्हणायला कोणताही शिवाजीचा मराठा तयार होणार नाही. ब्राह्मणेतर लोकहो ! 'हे पुस्तक निव्वळ शिव्यांनी भरलेले आहे.' असे ब्राह्मण तुम्हाला सांगतील, पण त्यांना लागलीच उत्तर द्या, तुमची पुराणे वाचा, त्यातल्या शिव्या जाळा मग या पुस्तकाला दोष द्या!' संत तुकारामांच्या अभंगात सुद्धा कडक भाषा व शिव्या आहेत. वास्तविक 'शिव्या' या शब्दाची व्याख्या करणेच अवघड आहे! टिळकांना नीच म्हणणे ही शिवी नाही. हे त्यांचे यथोचित शब्दातले वर्णन आहे. सर्पाला सर्प म्हणायचे नाही तर म्हणायचे तरी काय ? भटांना विनवून सांगणे आणि सर्पाशी समेट हा एकजिनसी मूर्खपणा आहे. नामर्द लोक भेकडपणाने उघड- उघड कोणतीही खरी गोष्ट बोलायला भितात, तेवढा भेकडपणा प्रस्तुत लेखकाला माहित नाही. ब्राह्मण स्त्रियांविषयी 'भटीण, बोडकी' असले शब्द आम्ही वापरलेत याबद्दल ब्राह्मण लोक रुष्ट होतील हे आम्ही जाणून आहोत. ब्राह्मण लोक ब्राह्मणेतरांच्या स्त्रियांना ग्रंथोग्रंथी शब्दोशब्दी कोणत्या शब्दाने संबोधतात, याचा त्यांनी प्रथम स्वतःशी विचार करावा ! बोडक्या बाईला 'केशवपन केलेली विधवा' म्हणावे असा भाषाशास्त्राचा सोवळा सिद्धांत ब्राह्मण लोक पुढे करतील पण एवढे आढेवेढे स्वतः घेऊन लोकांनाही घेवविण्याचा आग्रह करण्याऐवजी ब्राह्मणांनी हे विधवा-मुंडी मुंडनच बंद केले तर चालणार नाही काय ? काय गलिच्छ लोक आहेत ! घरात विधवा भावजयीला न्हाव्याच्या हातून तासून घ्यायची आणि देवळात परपुरुषस्पर्शाने पातिव्रत्य बिघडते असे तोंडाने कबूल करावयाचे, या भटासारख्या त्रिलोक तर्कट 'मुके मुजूर' लोकांशी जोतिरावांनी नरम शब्दांत गरम चहा पित जर वादविवाद केला असता तर काही एक कार्य झाले नसते. आपण सत्यशोधक कडक भाषेत भडक सत्याच्या जोरावर बेधडक भटांवर हल्ला चढवितो, म्हणूनच ब्राह्मण वटनी येत चालले आहेत. आपल्या कडकपणातच आपला विजय आहे. शहाण्यांच्या चुका सरळ शब्दांत मऊ मऊ लिहून दाखविता येतील; पण ब्राह्मणांसारख्या ब्रह्मांड टोणप्यांना सरळ सांगून पटणारच नाही. त्यांचे कान धरून डोके गदगद हालवून त्यांच्यातही ही 'राष्ट्रघातकी भिक्षुकशाही' नष्ट केली पाहिजे. ब्राह्मणांना आम्हाला सोडून द्यायचे नाही, त्यांना देशाच्या कार्याला लावायचे आहे; त्यांच्यातला 'स्वार्थ' काढावयाचा आहे आणि याच सद्हेतूने आम्ही आमच्या ह्या उनाडटप्पू बंधूला किंचित टाकून बोलत असतो.
यांनी वर्ध्याला 'आम्ही इंजेक्शन द्यावयाला आलोत' असे शब्द उच्चारले ते अगदी योग्य आहेत. बायकांच्या केसांचा दोर करून स्वर्गाला चढणाऱ्या भटांना नुसते औषध पाजून त्यांची तब्येत लवकर सुधारणार नाही. लोक म्हणतीलही, असली सुई शरीरात टोचू नका, पण त्या इंजेक्शनच्या सुईबरोबर गेलेले औषध रक्तात लवकर मिसळते आणि लवकर गुण येतो. औषध पाजण्यापेक्षा इंजेक्शनची टोचाटोची जास्त गुणकारक आहे. कै. महात्मा जोतिरावांनी