देशाचे दुश्मन, ( भाग 27) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
दिली, त्यावेळी बरेच भोळे ब्राह्मणेतरही त्यांना माथेफिरू म्हणाले, पण जोतिरावांनी असले कडक 'इंजेक्शन' दिले नसते, तर 'पुण्याच्या सदाशिव पेठेच्या रस्त्याने महाराने जाऊ नये' असले कायदे करण्यापर्यंत पाळी गेली असती. समरांगणावर उभे राहिल्यावर समोरच्या शिपायाला ठार केला तर त्याची बायको विधवा होईल, त्याची कच्ची बच्ची उपाशी मरतील याचा विचार सैनिकांनी करून चालत नसतो. सैनिकाने फक्त आपले कर्तव्य बजावाचे असते; आपण जोतिरावांचे सैनिक आहोत, शाहू राजाने पाठविलेले बिनीवरले स्वार आहोत, आपल्या लिहिण्याने ब्राह्मणांना वाईट वाटेल, कदाचित ब्राह्मण माय माऊली आपल्यावर रागावतील याचा विचार आपण करून चालणार नाही. ब्राह्मणेतरांना सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हेच आपले ध्येय आहे. ते बजावीत असता, नामर्द लोकांच्या तेजोहीन उपदेशाचा कधीही विचार करू नये. पहिल्या लोकांना सत्याकरता मरावे लागते असा धडाका सत्यशोधकांनी, हिंदूंनी सारखा सुरू ठेविला तर पुराणातील आपली नालस्ती जळलेलीच आपण पाहू. महात्मा जोतिरावांचा भव्य पुतळा हिंदू धर्माचे पुनरुज्जीवनाचे स्मारक म्हणून उभारलेला पाहावयाचा असेल तर हिंदूनो, असाच नेट धरून हे ब्राह्मण्य उलथून पाडा. हजारो वर्षांची ब्राह्मण गुलामगिरी नाहीशी करणाऱ्यांवर जगातले कोणतेही प्रबल राष्ट्र दडपशाही करू शकणार नाही व राजकीय दास्यातून मुक्त व्हायला, 'ब्राह्मण्य' घालविणे याशिवाय दुसरा उपाय नाही. 'मी कोणाचाही गुलाम नाही' हे वाक्य हिंदूंचे भूषण झाले पाहिजे, म्हणून पहिली गळ्याला लागलेली ही ब्राह्मणी गुलामगिरी फेका आणि एकजात व्हा. जातीभेदाची साखळी मोठे-मोठे घण घालून तोडून टाका! सर्व हिंदू सारखे त्यात कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. सर्वांचे रक्त मांस एक होऊ द्या! चार वर्ण ही शुद्ध लबाडी आहे. ब्राह्मणेतरांना गुलामगिरीत डांबण्याचे हे अमिष आहे. हिंदूत भेदाभेद नाही. हिंदू हा एकच वर्ण. हिंदूने हिंदूशी रोटी-बेटी व्यवहार केला तरी तो अधर्म नाही. उलट हिंदूत जो धार्मिक भेद पाडील तो धर्म नसून ब्राह्मणी कावा समजावा. जो हिंदू म्हणवून घेत असेल, तो युरोपियन असो, आफ्रिकन असो, तो आमचा स्वधर्मीय ! स्वधर्माकरिता, स्वधर्माच्या जयजयकाराकरिता आजन्म झगडणे हा आपला बाणा ठरू द्या ! ब्राह्मणी लोक हे आपल्या धर्माचे वाटोळे करण्याकरिता आलेले आपले वैरी आहेत. ही जोतिरावांची शिकवण आपण विसरू नका. आपण जर भटांच्या नादाने आपआपसात चार पायऱ्या आणि चार वर्ण असले भेद पाडून आपसात लठ्ठालठ्ठी करीत बसलो तर आपला प्यारा धर्म नामशेष होईल. स्वतंत्र वृत्तीच्या पाच लोकांवर कोणालाही जुलूम करता येत नाही. मग आपण वीस कोट आहोत. आपण सगळे मूळचे एकच आहोत. आताही एकच आहोत. पण या भटांनी आपल्यात हे वर्णत्वाचे पिलू सोडून आपल्याला विस्कळीत दशेत आणले आहे. हिंदुस्थानात जोवर ब्राह्मण्य आहे, तोपर्यंत इंग्रज जरी गेले तरी दुसरे कोणी येतील किंवा हेच सुधारलेले ब्राह्मण सत्ताधीश म्हणून पुन्हा पेशवाई माजवतील. इंग्रज सरकार धर्माविषयी उदासीन आहे. अशा संधीचा फायदा घेऊन ब्राह्मण्य निकालात काढूया. आमचे हक्क आम्ही मिळवू. इंग्रज आणि आम्ही भांडू पण मध्ये ही ब्राह्मणांची लुडबूड नको. त्यांना आमच्या नावावर काही एक करण्याचा हक्क नाही. आम्ही हक्क मिळवू, चालवू किंवा घालवू काय वाट्टेल ते करू. ब्राह्मणांनी भलत्या उठाठेवीत पडू नये. हे ब्राह्मण हे आमचे कैवारी नव्हेत, आमच्या देशाचे दुश्मन आहेत, हे ब्राह्मणेतरांनी विसरू नये. एवढे ब्राह्मण्य मेले आणि आपण रक्तमांसाने, देवाधर्माने हिता चित्ताने एक झालो तर जगातल्या कोणत्याही राष्ट्राबरोबर कोणत्याही संस्कृतीबरोबर कोणत्याही महाशक्तीबरोबर तोललो जात असता, शेरास सव्वाशेर होत. आपल्या राष्ट्र मंदिराचा पाया ब्राह्मण्याचा बळी दिल्याशिवाय पक्का होणार नाही. देशाचा दुश्मन ते आपले दुश्मन, धर्माचे दुश्मन ते आपले दुश्मन. हे दुश्मन दुसरे कोणी नसून जीर्ण मतांची राळ फेकणारे ब्राह्मण होत. ब्राह्मण लोकांना हिंदुस्थानचे वाटोळे होवो नाहीतर गाठोळे होवो याची पर्वा नाही. ते फक्त त्यांच्या वर्णश्रेष्ठत्वाची पर्वा करणार ! आपल्याला तसे म्हणून चालणार नाही. देश आपला आहे. धर्म आपला आहे. आपल्या धर्माला दुसऱ्याने त्रास दिला तर आपल्याच हृदयाला धक्का बसतो. आपल्याला आपल्या देशाकरिता मेलेच पाहिजे. आपण एकजीव झालो नाही तर वेगवेगळे फाडून आपल्याला नाहीसे करणे कोणालाही अवघड नाही. चार पायऱ्या पाडण्याचा भट प्रयत्न करतात, तो स्वार्थाकरता, पण आपण असल्या भेद पाडण्याकरताच आपल्यात घुसलेल्या या दुश्मनांना हाकलले पाहिजे. कोणालाही जन्मत: कनिष्ठ ठरविण्याचा अधिकार नाही. कोणताही मनुष्य जन्माने नीच ठरत नाही. कृतीने ठरत असतो. ब्राह्मण लोक कृतीने नीच ठरले आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरा नीच समाज जगात सापडणार नाही. सर्पाशी सहकार्य करा तो तुमचा फक्त जीव घेऊन एकट्याचा नाश करेल ! पण ब्राह्मणांशी सहकार्य कराल तर तो तुमच्या पिढ्यानपिढ्या हीन ठरवून तुमचा वंश गुलाम बनवील. जो ब्राह्मण 'ब्राह्मण' म्हणवून न घेता 'हिंदू' या नावाखाली आपल्यात समानतेने मिसळून जाईल, रक्तमांसाने एक होईल, तोच आपला समजावा. नुसती तोंडी पोपटपंची लढवून वेळेवर जात दाखविणारे भटोपाध्याय दुश्मन समजून त्यांच्यापासून दूर राहावे. कौन्सिले, नोकऱ्या, स्थानिक स्वराज्य, सार्वजनिक संस्था यांतून भटांची आमूलाग्र हकालपट्टी करून सर्व आपलेसे करून टाका. गांजा ओढणाऱ्या, दारू पिणाऱ्या, माड्या चढणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा देणे पाप आहे. ब्राह्मणाला जेवू घालणे म्हणजे देशाची संपत्ती फुकट खाऊन पोळ पोसण्यात व्यर्थ घालविणे हा मूर्खपणा आहे... भटांच्या हातून लग्ने लावणे म्हणजे शुभकार्यात अपशकुनी भट पाडून पुढच्या गुलाम संततीची जन्मपत्रिका लिहिण्यासारखेच महापाप आहे. ब्राह्मणाचे सकाळी तोंड पाहणे हे अशुभ आहे. ज्या कार्यात भट पडला त्या कार्याचा विध्वंस झाला पाहिजे... भटाला ज्याने ओसरी दिली त्याच्या घरादाराचे वाटोळे झालेच पाहिजे. भटांना ज्या देशात गुरूपद मिळाले तो देश परतंत्र झालाच पाहिजे. ही जोतिरावांची शिकवण लक्षात ठेवून या दुश्मन भटांना आपल्यातून बहिष्कृत करा. दुश्मन ओळखला आहे. आता त्याला नेस्तनाबूत करणे आपल्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.