Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

गाढव लोळी घेणारच

देशाचे दुश्मन, ( भाग 21) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर

    आणि गाढवाला साबण लावणारा गाढव ठरणारच ! हातात वर्तमानपत्रे आहेत, चार भिकार पुस्तककर्ते अभिप्रायाच्या उष्ट्या तुकड्यासाठी पगडीच्या झिरमुळ्या झेलून आहेत, तोपर्यंत हे 'लोकमान्य' त्वाचे ढोंगधत्तुरे टिकतील; पण समाज जागा झाला तर या 'टिळक महाराज' उतमाताच्या देशद्रोही बीजाला क्रोधाच्या संतप्त यज्ञात भस्मसात केल्याखेरीज राहणार नाहीत.

    चित्पावन भटांत आज दिनतागायत औषधालासुद्धा एकही साधुपुरुष झाला नाही. चित्पावन जातीत शंभर देशद्रोही बाळाजीपंत दाखविता येतील पण एकही तुकाराम दाखविता यावयाचा नाही. चित्पावन जातीतच असले राष्ट्रद्रोही किडे का निपजावेत, हा मोठमोठ्या समाजशास्त्रवेत्यांचा प्रश्न आहे, पण 'चित्पावनात देशद्रोही शेकडा नव्याण्णव सापडतील' हा मात्र अनुभव आहे. ऐतिहासिक सत्य आहे. टिळकासारखा चित्पावन भट म्हणजे कोबऱ्याची विषारी अवलाद. चित्पावनाची जात म्हणजे

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

फड्या निवडुंगाची जात !

    दुसऱ्याला उपयोगी पडण्याऐवजी पायात रुतवायची, कुंपणाला लावावी तर शेत खाऊन टाकावयाची. शिवकालापासून महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी म्हणून 'दुष्कृत्ये' घडली आहेत, ती बहुतेक चित्पावन भटांकडूनच. चित्पावन माय-भगिणींच्या उदरी

'तुकाराम, शिवाजी बाजीप्रभू'

    असल्या तोडीचे नरेंद्र जन्मूच नयेत, यात काही ईश्वरी संकेत आहे देव जाणे! जनक रामकृष्णापासून शाहू छत्रपतींपर्यंत जर मातृभूमीच्या सच्च्या पुत्राची यादी काढली तर त्यात एकही चित्पावन सापडावयाचा नाही. तेच स्वामीद्रोह, बलात्कार, व्यभिचार, फंड गुंडगिरी वगैरे सद्गुण (?) मंडित लोकांची यादी काढली तर त्यात बहुतेक



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209