Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

पहिला पुनर्विवाह

देशाचे दुश्मन, ( भाग 20) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर

     घडवून आणला. यावेळी टिळकांच्या मताचे मिरासी पुण्याची भटे यांनी गाढवाचे लग्न लावून, वरात काढून आपली जात दाखवली. जोतिरावांच्या चळवळीच्या दणदणाटाने सरकार जागे झाले आणि असा कोणता हा धैर्यशाली पुरुष आहे, याचा गौरव करावा अशी सरकारास इच्छा झाली. परकीय, परधर्मीय इंग्रजांनी जोतिरावांना शाबासकी द्यावी आणि स्वकीय म्हणविणाऱ्या भटांना त्यांच्यावर शेणमार करावा, हे त्या काळी जसे चालू होते तसेच पण थोड्या फरकाने आजही चालू आहे. परकीय प्रिन्स ऑफ वेल्स शिवछत्रपतींच्या पुढे मुजरा करतात आणि ही आमची भटे-भिक्षुके त्याचवेळी डोक्याला धोत्रे बांधून सुतक्यासारखे मुद्दाम फिरतात, हे पुण्याच्या मोजून लाख माणसांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. १८५२ साली पुण्याच्या विश्रामबागेत सरकारने दरबार भरवला आणि जोतिरावांना दोनशे रुपयांची शाल अर्पण करून

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

त्यांचा गौरव केला.

     इंग्रजांनी ही सत्यशोधकांच्या प्राणावर भर संकटाच्या वेळी जी संरक्षक शाल घातली, त्यामुळे कोट्यवधी अस्पृश्य, ब्राह्मणेतर इंग्रजांचे ऋणी आहेत. ज्याला पेशव्यांनी हत्तीच्या पायाला बांधले असते, त्याला इंग्रज शाल अर्पण करतात हे चिपळूणकराला खपले नाही. म्हणून तो इंग्रजांवर उपसला आणि टिळकांनी पुढे तोच गाळ उपसला ! इंग्रजांनी पेशवाईसारखा पर्वतीला रमणा मांडून ब्राह्मण्य सांभाळले असते, तर टिळक-चिपळूणकरांनी विरोध तर राहूद्याच पण इंग्रज हे ईश्वराचे अकरावे अवतार आहेत, असे पुराण लिहून त्यांची देवळे बांधली असती. सध्याच पहा की, ब्राह्मणेतर देवळात शिरू पाहताच ही भटे इंग्रजांच्या बुटात तोंड पाहून गंध लावायला तयार होतात. ब्राह्मणेतरांनी गणपतीची भक्ती आपल्या मताने करू लागताच हे इंग्रज बुटाच्या नालाला खिळा व्हायला चुकत नाहीत. ब्राह्मणेतरांनी सर्व राजकारण ताब्यात घेतले आणि उदार इंग्रज जाऊ लागले तर हीच भटे इंग्रज नाही तर दुसरा कोणी बोलवायला कमी करणार नाहीत. यांना पारतंत्र्याची चीड नसून फक्त स्वजातीची चाड आहे. टिळक-चिपळूणकर यांच्या पुतळ्याच्या उदाहरणावरून तरी काय हेच सिद्ध होत आहे. एखादा दुष्ट ब्राह्मण सच्चा म्हणून मोठा बनवायचा आणि तो तुमच्या आमच्या माथी मारायचा. सर्व जनतेकरता जर टिळक इंग्रजांशी भांडले असते तर प्रश्न वेगळा होता. पण तात्या, भाऊ करताच कौन्सिल पाहिजे असे जो भर सभेत बोलायला दचकत नाही, तो पुन्हा सर्व जनतेकरता धडपडत होता म्हणणे ब्राह्मणांना शोभेल, पण या 'म्हणविण्याने' ब्राह्मणेतरांची मस्तके सात्त्विक संतापाने तडकत आहेत याची वाट काय ? ब्राह्मण जातीने आपल्या आदिअंताचा नीट विचार करूनच टिळकांना लोकमान्य म्हणावे. लोक म्हणजे गल्लोगल्ली दर्भे उडवीत चालणारी उघडी बोडकी चार भटे नव्हत किंवा पगडीच्या झिरमिळ्या उडवणारे चार वकील नव्हेत. 'लोक' या सदरात अखिल हिंदी जनतेचा समावेश होतो. आज जनता जागी होत आहे, आणि टिळकांनी भरलेले पापाचे सात रांजण तिव्हाट्यावर मांडत आहेत. 'टिळक' नाव उच्चारताच कोट्यवधी ब्राह्मणेतरांच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या चढत आहेत. 'टिळक' शब्दाने 'फंड गुंडगिरी' भिक्षुकशाही वगैरे टिळकांच्या चरित्रातल्या हलकट मनोवृत्तीच्या आठवणी जनतेला होत आहेत. या टिळकांनी आपल्याकडून फंडाच्या नावाखाली लाखो रुपये उपटून

"तात्या, आण्णा भाऊंच्या "

     घशात कोंबले, हे जनता-जनार्दन कसे विसरेल ? लोक अज्ञान होते तोपर्यंत टिळकांना लोकमान्य ठरविण्याचे अंगारे-धुपारे माजले. लोक अज्ञान होते तेव्हा इंग्रज सरकारच्या ‘तार-पोस्ट-रेल्वे’ इत्यादी 'देशसेवे' बद्दलही गुण गात होतेच. सुज्ञ समाजात टिळकांना एखाद्या इंग्रजी शिकलेल्या जिर्णमतवादी भिक्षुकापेक्षा जास्त किंमत, जास्त भाव येईल असे दिसत नाही. नोकरशाही जशी 'डायर, ओडवायर' ला पोटाशी धरते, तसेच भिक्षुकशाही टिळकांना पोटाशी धरून लोकमान्य ठरविण्याचे जडीबुटी माजवीत आहेत. ज्याला भरसभेत हलकटपणाबद्दल

अंड्यांचा, जोड्याचा मार

    बसला, ज्याच्या पुतळ्याला काढून टाका असे लोक लीलेने लिहितात, ज्याला 'नकटा' म्हणणे आज जनतेची करमणूक झाली आहे, त्या टिळकाला लोकमान्य म्हणणे आणि मुमताज बेगमला 'सती सावित्री' म्हणणे ही एकाच मूर्खपणाची दोन उदाहरणे आहेत. नेहमी 'टिळकांना 'लोकमान्य' म्हणून जनतेची दिशाभूल करता येईल असा भटांचा अदमास असेल तर तो साफ चुकीचा आहे. गाढवाला रोज कस्तुरीने माखला किंवा साबणाने घासला तरी हुक्की येताच ते उकिरड्यावर जाऊन



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209