Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अज्ञानाचे बळी 

मी : म्हणजे ह्यात एकुणच असे म्हणता येईल की प्रत्येक धर्मशास्त्राच्या लेखकाने ह्याबाबत अकलेचे तारे तोडले आहेत. फक्त पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत नव्हे, तर इतरही बाबात, जेव्हा विविध धर्मात भिन्नता आहे, ह्याचा अर्थ, जेव्हा ह्या शास्त्रकारांना खरे सत्य सापडले नाही, तेव्हा त्यांनी. त्यांच्या परिने, अकलेचे तारे तोडीत, त्या त्या काळच्या लोकांच्या जिज्ञासेचे समाधान करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण विज्ञानाचे तसे नाही. विज्ञान ज्या गोष्टी बाबत संदिग्ध असते, तथे वैज्ञानीक सत्याच्या शोधात मग्न असतात. जेथे सत्यता पटली असते, तेव्हाच विज्ञान विधान करते. धर्मशास्त्राच्या लेखकाप्रमाणे कल्पनेच्या उड्या मारत, असत्याला सत्य पटविण्याचा आग्रह करीत नाही. स्वत:बद्दल व स्वत:संबधीत गोष्टीबद्दल प्रत्येक व्यक्तीलाच ‘मी’ पणा असतोच. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. ह्याच स्वभावामुळे जगातील सर्वच धर्मशास्त्रांनी, असे लिहीले होते की, सूर्य हा पृथ्वी भावेती फिरत असतो. ज्या पृथ्वीवर मी राहतो, त्या पृथ्वीच्या मी पणातून, पृथ्वी श्रेष्ठ व म्हणूनच तिच्या भोवतर सूर्य फिरत राहतो असे धर्मकारांनी सांगितले होते. पण गॅलीलीओने प्रयोगासहित हे स्पष्ट केले आहे की, एवढे वर्ष पृथ्वीबाबत बाळगलेला श्रेष्ठपणा हा खोटा आहे. खरे तर सूर्य नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ख्रिश्चन धर्मातील पोपांना हा त्यांच्या धर्मशास्त्राचा अपमान वाटला. गॅलीलीओने आपले विधान बदलावे म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. पण गॅलीलीओ सत्यापाशी पोहोचला होता. धर्मशास्त्र व पोपांना त्याने पराभूत केले होते. सत्यापासून तो हलणारा नव्हता. शेवटी धर्मशास्त्राने माघार घेतली. आजच्या विज्ञान युगात तर शेंबडा पोरगाही सांगतो की, ‘पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आजचे शेंबडे पोर कालच्या विख्यात धर्मशास्त्रकारांपेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहे.’ आणी साळवी साहेब ज्या साध्या वैज्ञानीक गोष्टी बद्दल माहीती आम्हास असायला पाहीजे, तेवढी उपलब्ध माहीती तर आम्ही घेण्याचा प्रयत्नही करीत नाही. उलटे ज्या बद्दल निव्वळ जिज्ञासा असते, त्याचा सत्या असत्याचा पडताळा झालेला नसतो, अशा विषयाबद्दलची माहीती, आम्ही एखादा बाबा महाराज सांगतो म्हणून, चिकीत्सा न करताच, मेंदूतसाठवून ठेवतो. तसे आम्ही साधारण माणस, आपली नोकरी, धंदा, मुलांचे शिक्षण, गृहकाम, वेळेचा सद्उपयोग ह्यासारख्या अती महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून, ज्या विषयाचे ना बुड माहीत ना शेंडा, अशा विषयाबाबत घेंटो गप्पा करीत असतो. ऑफीसच्या वेळातही देव आहे की नही ?  जग कसे निर्माण झाले अद्भुत शक्ती आहे का ? ह्यासारख्या अनेक विषयावर बहुतांशी भारतीय, तासनतास, ज्यातुन काहीच निष्पन्न होणार नाही., अशा चर्चा करीत असतात. भारतात कामाच्या वेळेत, असल्या विषयावर चर्चा करणारे लोक, फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय नुकसान करीत असतात. 

    ह्या संदर्भात बुध्दाची एक शिष्य बुध्दास म्हणाला, ‘तथागत, मी मागील दहा वर्षापासून आपल्या सेवेत आहे. आता मला हे सांगावे की, ही सृष्टी कशी निर्माण झाली ?’ बुध्द म्हणाला ‘तु आश्रमात आलास तेव्हा, मी तुला सांगितले होते का, की, ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुला देणार.’ शिष्य म्हणाला, ‘नाही, परंतू तथागत तुम्ही अतिशय बुद्धीमानी असल्यामुळे, मुद्दामच मी दहा वर्षाचा कालावधी आपल्या सोबत घालविला आणी आज ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास मागतोय ? ’ बुध्द म्हणाला, ‘तू आश्रमवासी होतांनाच जर हे असले प्रश्न, उपस्थित केले असते, तर मी तुला माझ्या आश्रमात प्रवेशही दिला नसता.’ नुकतेच दोन दिवस आधी ह्या आश्रमापाशी, एक घटना घडली होती. एक वेगाने येणारा बाण लागला व ती बेशुद्ध होऊन पडली, त्यावेळेस त्या आदिवासीनी काय केले ? शिष्य म्हणाला, ‘त्या आदिवासींनी ताबडतोब जवळच्या औषधी झाडाचा पाला तोडून, त्याचे औषध बनवून बाण जेथे लागला होता त्या जागेवर लावले, जेणेकरून ती लवकर शुद्धीवर यावी.’ बुध्द बोलला, ‘पण तरीही त्याने पत्नीला ओषध लाववण्या ऐवजी ज्या दिशेकडून बाण आला त्या दिशेकडे धावत जाऊन, त्याच्या पत्नीला बाण मारणार्‍याला पकडले असते व त्यास शिक्षा दिली आसती तर तू त्यास काये म्हटले असते ?’  शिष्य बोलला, ‘तथागत पण तो जर मारेकर्‍याचा शोध घ्यावयास गेला असता तर, तोपर्यंत त्याची पत्नी औषधाशिवाय गतप्राण झाली असती. बायकोचे प्राण वाचविणे ही त्याची प्राथमीकता होती. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठ तो धावला असता, तर मी त्यास मुर्खच म्हटले असते.’ बुध्द बोलला, ‘मग मी तरी तुला ह्याशिवाय दुसरे काय म्हणू. जगातून दु:खाचा नाश करणे ही माझी प्राथमिकता आहे. आणि जगात त्यामुळे तुझा प्रश्न माझ्या प्राथमिकतेत कधीच बसला नाही. शिष्याला बुध्दाचा सांगण्याचा मतितार्थ समजला व त्यानंतर त्यानी असा प्रश्न बुद्धास केला नाही.’



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209