अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
ढोबळे : मग ह्याच गाडगेमहाराजांनी आपल्या किर्तनातून ह्या सत्यनारायण कथेबद्दल, एक प्रश्न वारंवार केला आहे. गाडगे महाराज म्हणायचे, ‘अरे जर सत्यनारायण कथा केल्यानी, कलावतीची नौका तरंगायला लागत असेल, तर दुसर्या महायुद्धाच्या काळात हिरं - जवाहरांनी भरलेल्या इंग्रजांच्या कितीतरी नौका अरबी समुद्रात डूबल्या आहेत. ह्या डूबलेल्या नौका काढण्यासाठी कोणी एखादा, भट पूजारी तयार असेल, तर मी देतो एक लाख रुपये दक्षिणा. एकदा का अशी कथा केली व करोडा रुपयांच्या हिरे - जवाहराच्या नौका वर आल्या तर हा देश जगातला सर्वात श्रीमंत देश बनेल. आहे का कोणी बाबा महाराज कथा करायला ? अरे लोक हो, आशा कथा केल्यानी कधी नौका तरंगतात का ? तुम्हाला डोक बिक आहे की नाही ?’ अशाप्रकारे गाडगेमहाराज समाज प्रबोधनाचे कार्य करायचे आणि त्याचमुळे होऊ शकते की तुमच्या वडिलांनी आदराने गाडगे महाराजांचा फोटो घरात लावला. आज गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्यासारख्या संतांचा समाजात वनवा निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच समाजात अंधश्रद्धेचे बळ वाढत आहे.
साळवी : तर ही सत्यनारायणाची कथा कशी सुरु झाली ?
ढोबळे : पेशवाईमध्ये, पेशवे ब्राह्मणांना फार मोठमोठ्या रक्कमेच्या दक्षिणा देत. 1818 ला पेशवाई नष्ट झाली. ब्राह्मणांना मिळणार्या दक्षिणाही बंद झाल्या. त्यांच्या समोर पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ह्याचवेळेस 1822 च्या दरम्यान ब्राह्मणांनी सत्यनारायणाची कथा लिहली व ही कथा भोळ्या भाबड्या बहुजन समाजाच्या माथी मारली. ही कथा केल्यावर तुमचे अमुक अरिष्ट टळले, तमूक ग्रह दोष टळतील असा प्रचार करून, बहुजनांकडून कथेच्या माध्यमातून दक्षिणा लाटण्याचे काम सुरू केले. त्यावेळेस बहुजन मागासलेले व इंग्रजांचे गुलाम होते. म्हणून त्याकाळात ही प्रथा आपण समजूही शको. परंतु महात्मा फुलेंच्या समग्र शिक्षण क्रांतीनंतरही, आज 100 वर्षानी सुशिक्षीत बहुजन समाज हाच उपक्रम राबवितो, ह्याचे मला आश्चर्य वाटते. आमच्यातील कित्येक डॉक्टर, इंजीनीयर, उच्चशिक्षितही, ही कथा झाल्यावर चार वर्ग पास ब्राह्मणाच्या सपत्नीक पाया पडतात, तेव्हा असे वटते की फुले, शाहु, आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीनंतरही आज हा बहुजन समाज जणू ब्राह्मणी व्यवस्थेच्या पायावर आपले मस्तकच नव्हे तर एकुणच अस्त्वि आजही गुलाम ठेवत आहे. समाज जीवनातील प्रत्येक क्षेत्रातून जन्माधारीत ब्राम्हण वा तत्सम जातीला दिले जाणारे श्रेष्ठत्व आम्ही अमान्य करायला पाहिजे. पण गुणकर्मानुसार असणारे श्रेष्ठत्व आम्ही मान्य केले पाहजे. उदाहरणार्थ सचिन तेंडूलकर हा भारतासाठी उत्कृष्ठ क्रिकेटपटू आहे. जागतीक दर्जाचा श्रेष्ठ फलंदाज आहे. त्यामुळे त्याला चार सॅल्युट मारायला माझी हरकत नाही. पण सत्यनारायण कथेच्या निमीत्ताने ब्राम्हणातील चौथा वर्ग नापास जो पुरोहीत आहे, त्याचा पाया पडणे बंद झाले पाहिजे. स्पर्धेच्या युगात चकाकरणारा सचिन अदर्श ठरू शकतो पण परंपरावादी ब्राम्हणी व्यवस्थेतील सत्यनारायणी ब्राम्हण हा निश्चितच पाया पडण्यायोग्य नाही. ब्राम्हण वा तत्सम समाजातील जी हुशार व अभ्यासु मंडळी आहे, ती आज अमेरिकेच्या सिलीकॉन वॅलीमध्ये कॉम्प्युटर इंजिनीयर म्हणुन कार्यरत आहेत, तर त्यांच्यातील की बुद्धीचे, परंपरावादी मागासलेले ब्राम्हण पोटपाण्यासाठी सत्यनारायणी व्यवसाय करतात. त्यांच्या पाया कशाला पडता ? आदर्शच मानायचे झाल्यास ब्राह्मणातील अमेरिकेतील त्या युवकांकडे बघा ज्यांनी दिवसरात्र एक करून अभ्यासाशी सातत्याने मैत्री केली आणि जीवनात डॉक्टर, इंजिनीयर झालेत.