लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B.
( साळवी साहेबांकडे सत्यनारायणाची कथा होती. मिस्टर आणि मिसेस साळवी ह्यांनी अगत्याने मला प्रसादासाठी बोलविले होते. म्हणुन मी संध्याकाळी 6 वाजता साळवीकडे गेलो. )
साळवी : या या ढोबळे साहेब, मला वाटले होते तुम्ही काही सत्यनारायणाला येणार नाही ?
मी : अस तुम्हाला का वाटले साळवी साहेब ?
साळवी : नाही म्हटलं तुमचे ते आपले अधार्मीक विचार वगैरे वगैरे.
मी : मी येणार नाही अस वाटल्यावर मला निमंत्रण तरी तुम्ही का दिले ? निमंत्रण न देता तुम्ही मला टाळू शकले असता.
साळवी : तसे नव्हे परिचयातल्या सर्वच लोकांना निमंत्रण देण जरूरीचेच तुम्हाला नसते दिले तर तुम्हाला एखाद्या वेळेस वाईटही वाटले असते. त्यातल्या त्यात आमच्या अप्पीच्या मेडीकलच्या प्रवेशाच्या वेळेस ओबीसीचे सर्टीफिकेट मिळवून देतांना आपण मला बरीच मदत केली होती. पण तुम्ही आले फार बर वाटल.
मी : तुम्ही एकीकडे मला बोलावताही आणि मी येणार नाही असे तुम्हास का वाटले ? ह्याचा अर्थ, तुम्ही एवढा निष्कर्ष निश्चित काढता की सत्यनारायण हा प्रकार मला काही आवडत नसेल, पण तरीही मी आलो, एवढ्याकरीता, की दोन व्यक्तिचे विचार जरी एक नसले, तरी त्यांनी एकदुसर्यांशी बोललेच पाहीजे. कमीतकमी माझ्या ह्या मताशी तरी तुम्ही सहमत असालच.
साळवी : निश्चितच.
मी : समाजातील सर्व वर्गात संवाद टिकुन राहणे ही लोकशाहीची पहीली अट आहे.
साळवी : सत्यनारायण कथेसंदर्भात आपला विरोध का ? सत्यनारायणाच्या कथेमुळे चार लोक गोळा होता. आपणच म्हटल्या प्रमाणे त्यांच्यात संवाद होतो. शेवटी माणूस हा सामाजीक प्राणी असल्यामुळे, मिळून मिसळून राहण्यासाठीचा भाग म्हणून तरी, ह्या सत्यनारायण कथेचा उपयोग होतोच.
ढोबळे : ह्यात संवाद होत नाही. एकजण कथा वाचतो आणि इतर मानाडोलावतात. अगदी मुळच वाईट वाटणार नसेल तर, ह्याबाबतची माझी भुमिका मांडतो.
साळवी : त्यात वाईट काय वाटायच. अगदीच पटल नाही तर, तुमच्या भुमिकेशी मी सहमत होणार नाही, एवढेच.
ढोबळे : ठीक आहे. आपण ह्यास काय म्हणतो ? सत्यनारायणाची
साळवी : कथा कथा.
ढोबळे : अगदी बरोबर, ही कथा आहे कथा म्हणजे काय ?
साळवी : कथा म्हणजे गोष्ट.
ढोबळे : बरोबर. आपण बर्याचदा कथा, गोष्टी ऐकतो, वाचतो, त्या खर्या असतात का ?
साळवी : नाही. कथा ह्या काल्पनीक असतात. पण सत्यनारायणाच्या कथेबद्दल म्हणत असाल तर हे खरे नाही.
ढोबळे : का रे ? हे लिखाण करणार्या लेखकान, त्याच्या साहित्यास स्वत:हुनच कथा असेच म्हंटले आहे. जरी अगदी ती सत्यनारायणाची असली तरी, निर्माता लेखक जेव्हा कथा म्हणतो, तर तुम्ही ह्या लेखानास काल्पनीक मानावयास का तयार नाही ? एका अर्थी ह्या कथेच्या लेखकाचे अस्तित्वच तुम्ही नाकारता.
साळवी : अहो पण ती धार्मीक कथा आहे.
ढोबळे : कथा ही धार्मीक असो, सामाजीक असो वा कौटुबीेंक. कथा ही कथाच आहे आणि काल्पनीकच आहे.
साळवी : ह्यात काल्पनीक असे काय आहे ?
ढोबळे : ठिक आहे, तुम्हीच आता ह्या कथेच्या विश्लेषणात स्वत:हुन शिरत आहात. मग सांगा, ह्या कथेत कलावतीनी प्रसाद खाल्ला नाही तर नौकेचे काय झाले ?
साळवी : कलावतीनी प्रसाद खाल्ला नाही तर नौका डूबली व तिनेप्रसाद खाल्ला तर नौका वर आली.
ढोबळे : बरोबर गाडगेबाबा नावाचे एक महान संत ह्या महाराष्ट्रात होऊन गेले, हे आपणास माहीत आहे का ?
साळवी : वा ! वा ! गाडगे महाराजांना ओळखत नाही, असा एखादाही व्यक्ती महाराष्ट्रात नसेल. आमच्या नागपूरच्या घरी गाडगे महाराजांचा फोटो आमच्या वडीलांनी लावला आहे.