Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बहुजन नायक कांशीराम

मनोगत

बापू राऊत

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर आंबेडकरवादी सामाजीक, धार्मिक व राजकीय चळवळ भरकटत चालली होती. नेते व संघटनाचे अमाप पीक महाराष्ट्रात व देशात आले होते व आताही येतेच आहे. डॉ. बाबासाहेबांचा सहवास लाभलेले एकेक नेते स्वत:च्या वेगवेगळ्या राहुट्या निर्माण करु लागले तर काहीजण पद व प्रतिष्ठा यासाठी काँग्रेस मध्ये जाऊ लागले होते. एकुणच आंबेडकरी चळवळ सैरभैर झाली होती. त्यामुळे काही नेत्याना आंबेडकरी चळवळीचे "विध्वंसक" अशी बिरुदावली लावण्यास आपल्याला काही कमीपणा वाटत नाही. संपूर्ण समाजावर वचक राहील तसेच प्रस्थापित राजकीय पक्ष ज्याला घाबरू शकतील असा नेता डॉ.बाबासाहेबानंतर देशात कोठेच निपजला नव्हता.बाबू जगजीवनराम पासन सुरु झालेली लाचारी आताच्या रामदास आठवले पर्यंत सुरु आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे सामाजीक व राजकीय भवितव्य हे काँग्रेसी, भाजपा व राष्ट्रवादी पक्षांच्या सामंतीक नेत्यावर अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सांगिलेला स्वाभिमान, आत्मविश्वास व कर्तुत्वदक्षतेचे गुण बुध्दधर्मपरिवर्तीत पुर्वीच्या हिंदु महार नेत्यांना व जनतेलाही घेता आले नाही. आजही ते चाचपडतच आहेत. 

kashiram Bahujan Nayak     आंबेडकरी चळवळीच्या अशा भांबावलेल्या अवस्थेत 1978 मध्ये कांशीरामजींचा महाराष्ट्रात उदय झाला. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन संघर्षविहीन संघटना काढली तिचे नाव होते बामसेफ. कांशीरामजींना प्रथम बघण्याचा योग मला नागपुरला 1992 साली आला. तेव्हा मी नागपुर विद्यापीठाच्या संख्याशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होतो. माझे राहणे धरमपेठेतील नागपूर विद्यापीठाच्या वस्तीगृहात होते. त्या काळात कांशीरामजी यांचे केवळ नाव माहीत होते व ते बहुजन समाज पक्ष चालवतात एवढीच माहिती होती. नागपुरच्या भिंती मात्र हत्ती या चिन्हाने व बहुजन समाज पक्षाच्या नावाने नेहमी रंगलेल्या असायच्या. त्यामुळे बहुजन समाज पार्टीला नागपूरातील ल. स. रोकडे नावाचे गृहस्थ नागपूर पत्रिकेमध्ये लेख लिहताना बहुजन समाज पक्षाला केवळ भिंतीवरची पार्टी असे संबोधित असत. परंतु तीच पार्टी आज देशात तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी बनली असून देशाचे प्रमुख राजकीय पक्ष बसपाचा चढता आलेख बघुन घाबरायला लागले आहेत.एकदा नागपूरच्या रामनगर परिसरात मा.कांशीरामजी यांची सभा होती. कांशीरामजीच्या सायकल रॅलीचे रुपांतर सभेत करण्यात आले होते. मी त्या सभेला माझ्या वस्तीगृहाच्या मित्रासोबत हजर होतो. सभेत कांशीरामजीवर फुलांच्या हाराचा वर्षाव न होता केवळ नोटांचे हार त्यांच्या गळ्यात पडत होते. ते बघून मी अचंबितच झालो. कांशीरामजींची एवढी मोहिनी की लोकांनी लाखो रुपयांचे हार त्यांच्या गळ्यात घालावे ? सभेत कांशीरामजी सुध्दा लोकांना आवाहन करीत होते. ते म्हणत, फुलांच्या हारानी चळवळ चालत नाही तर ती नोटांनी चालत असते. आंबेडकर चळवळ पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाने नोट द्यायची तयारी ठेवली पाहीजे. कांशीरामजीच्या आवाहनाला लोक भरपूर प्रतिसाद देत होते. त्या नंतरच्या काळात कांशीरामजी यांची चळवळ सारखी फोफावत चालली होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, पंजाब व मध्य प्रदेशात या पक्षाचे आमदार व खासदार सुध्दा निवडून येऊ लागले. पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यताही मिळाली.कांशीरामजीनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की बसपा हा राजकीय पक्ष कमी व सामाजिक चळवळ अधिक असेल. त्यामूळे आंबेडकरी समाजातील तरुण व बुद्धिजीवी या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले. त्यापैकी बऱ्याच जणानी मिशनरी कार्यकर्ता म्हणुन स्वत:ला बहुजन समाज पक्षाच्या चळवळीत झोकन दिले. तर काही जन आपल्या सरकारी नोकऱ्यावर पाणी सोडत कांशीरामजींची साथ द्यायला तयार झालेत. त्यामुळे बहुजन समाज पक्षाची ख्याती ही मिशनरी लोकांचा पक्ष अशी झाली. बहुजन समाज पक्ष हा राजकीय पक्ष असल्यामुळे कांशीरामजीच्या हयातीतच या पक्षाच्या चढ उताराला सुरुवात झाली होती तसे असले तरी पक्षाची मतसंख्या सतत वाढत होती. कांग्रेसला सापनाथ व भाजपाला नागनाथ संबोधनाऱ्या कांशीरामजीनी या पक्षासोबतच निवडणूकीमध्ये गठबंधन व सोबतच सत्तेत्त भागिदारी केली. कांशीरामंजीच्या या कृत्यावर आंबेडकरी समाज नाराज होता तरीही ते डगमगले नाहीत. ते म्हणत, बहुजन समाजाच्या भल्यासाठी मी कोणाचीही साथ घेऊ शकतो.माझे उद्देश साध्य झाले की मी युती तोडूही शकतो त्यासाठी कुणी माझ्यावर सर्वात मोठा संधीसाधु पणाचा आरोप केला तरी तो मला मान्यच असेल. कांशीरामजीच्या प्रत्येक कृतीने आंबेडकरी जनतेचा गैरसमज दुर होत होता. कांशीरामजी म्हणतात, जिस बाप का बेटा लायक होता है, उसी बाप की इज्जत बढ़ती है और नालायक औलाद अपने बाप और खानदान की हज्जत मिटटी में मिला देता है.रिपब्लिकन पक्ष व त्यांच्या नेत्यावर नजर टाकली तर वरील बाबीचा प्रत्यय येतो. कांशीराम यांचा मुख्य संकल्प सामाजीक परिवर्तनाचा व आर्थिक रुपातरांचा होता. परंतु हे साकार करण्यासाठी राजकीय सत्तेची नितांत गरज आहे असे त्याना वाटत असे म्हणुन त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या आदेशाला कार्यान्वीत न करणाया शोषित समाजात शासक बनण्याची आकांक्षा निर्माण केली. कांशीरामजींच्या इशाऱ्यानेच बहुजन समाजात सत्तेत भागीदारी नव्हे तर सत्ताच हातात घेण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली.त्यांनी डॉ.बाबासाहेबांचा जातीविनाश कार्यक्रम काही काळापुरता बाजुला ठेवीत जाती चेतना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामागे त्यांचा तर्क होता की, जसजशा जाती चेतना वाढतील तसतशा परंपरागत शासक जाती या राजकीय दृष्ट्या दुर्बल होतील व त्यांची जागा खालच्या जाती घेतील. Kanshi Ram Ji redefined the rules of Indian politics.He developed the concept that the unstable government at centre is beneficial for Bhaujan Samaj, as you can derive maximum advantages to deprived section. Therefore, he used say frequently, "I want Mazboor (weak) Government at centre and not Majboot (strong) till we reach to the centre. Kanshi Ram Ji always acknowledge the contribution of Buddhists (Ex-Mahar) for supporting Dr.Babasaheb in his war against Manuwadi.He said, I have learnt two thing from them, one how to run the movement, I learn from Dr.Babasaheb and second how not to run the movement from his followers in Maharashtra. कांशीरामजींच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुध्दीवादी व विचारवंत याना सोडले तर बहुतांशी विचारवंतानी फारसे उचलून धरले नाही.याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडियाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करता येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या सत्तेचे पद आपल्याला उपभोगता येणार नाही या भीतीने काही तथाकथीत आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासुन दूर राहिले.व्यक्तीगत लाभासाठी सत्ताधाऱ्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे ही आता नित्याची बाब झाली आहे. एव्हाना दलितांना मिळणारे आरक्षण, सामाजिक न्यायाचा एजंडा संपवण्याच्या काँग्रेसच्या प्रक्रियेला कडाडून विरोध झाला असता. आय. आय. टी / आय. आय. एम. क्षेत्रात आरक्षण संपविण्याच्या बिलाविरुध्द दलित संसद सदस्यानी संसद डोक्यावर घेतली असती. परंतु असे न होता राज्यसभेत बिल पास झाले. मायावतीच्या विरोधामुळे या बिलाला लोकसभेत मागे घ्यावे लागले. याचा अर्थ तुमचा नेता खंबीर असेल व या नेत्याच्या मागे जनतेचा पूर्ण पाठिंबा राहिला तर आपण आपले हक्क अबाधित ठेऊन सत्तेचा वाटा आपल्याकडे वळवू शकणे सहज शक्य आहे. जातीय व धर्मवादी पक्ष सत्तेत येतील या भीतीने सतत मालगुजारशाही, घराणेशाही,खऱ्या जातीवादी व धर्मवादी कांग्रेसला दलितांनी मतदान करणे हे पंग व लाचार मानसिकतेचे लक्षण आहे. काँग्रेस पक्ष हा या देशातून गरीबांच्या चळवळी नष्ट करण्याच्या पाठीमागे लागला आहे व जे चळवळी चालवितात त्यांच्यावर नक्षलवादाचा शिक्का मारला जात आहे. पुरोगामी व क्रांतीकारी साहित्यावर बंदी आणण्यात येत आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारी उपक्रम बंद पाडून आरक्षण संपविण्याची प्रक्रिया केव्हाच सुरु करण्यात आली. काँग्रेसच्या राज्यातच मुजोर धार्मिक उथ्थानाला सुरुवात झाली असून देश काँग्रेसी भांडवलदाराच्या घशात घालण्याचे प्रयत्न जोरकस पणे चालु आहेत. दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्याना बगल देण्याचे प्रयत्न जानीवापूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत आम्ही आंबेडकरवादी कधीपर्यंत विघटीत राहायचे ? संपूर्ण समाजाचा विकास बघायचा की केवळ दोन चार नेत्यांचा व त्यांच्या कार्यकत्यांचा ? संपूर्ण आंबेडकरवाद्यांचा एकच नेता व एक पक्ष या भूमिकेकडे आम्ही कधी पाहणार आहोत ? आजच्या परिस्थितीत दलितांना सत्तास्थानी बघू इच्छिणाऱ्या कांशीरामजींच्या तत्वावर चालणेच इष्ट राहील. 

     प्रथम सामाजीक लढा की राजकीय लढा यावर आंबेडकरी विचारवंत, राजकीय, सामाजीक व धार्मिक संघटना यांच्यात एकवाक्यता मुळीच दिसत नाही. काहींच्या मते अगोदर सामाजीक संघर्ष व नंतरच राजकीय संघर्ष, तर काहींच्या मते प्रथम राजकीय व नंतर सामाजीक संघर्ष अशा द्विधा मनस्थितीत सापडलेले दिसतात.माझ्या मते सामाजीक व राजकीय हे दोन्ही लढे एकाच वेळेस व एकमेकांच्या साथीने लढवले गेले पाहिजे. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे पुर्वीचा सैनिक लढाईच्या मैदानात शत्रुविरुध्द लढताना एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल घेऊन प्रतिकार करीत असे व तलवारीने शत्रुला मारण्याचा तर दुसऱ्या हातातील ढालीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असे. मानवतेच्या व समतेच्या लढाईचेसुध्दा असेच आहे. सामाजीक व राजकीय लढा म्हणजे तलवार व ढाल आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी या दोहोचीही गरज असते.आपल्या क्रांतीकारी लढाईतील ते दोन्ही हात आहेत. या दोन हातांना एकत्र करुनच आपल्याला डॉ .बाबासाहेब व मा.कांशीराम यांच्या स्वप्नातील भारत घडवावा लागेल.

बापू राऊत



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209