Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

कांशीरामजीची सामाजिक वाटचाल

बहुजन नायक कांशीराम -  बापू राऊत 

     सन 1964 मध्ये आपली नोकरी सोडल्यानंतर मा.कांशीरामजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गंभीरपणे अभ्यास करणे चालू केले. 18 मार्च 1956 ला बाबासाहेबांनी रामलिला मैदान,आग्रा येथे भाषण करताना माझ्या समाजातील शिकल्या सवरल्या नोकरदार लोकांनी धोका दिला. सरकारी कर्मचारी स्वार्थी झालेत ते आपल्या समाजापासून अलग होऊन आपला स्वत:चा नवीन वर्ग निर्माण केला,ते आपल्या गरीब समाजाकडेही बघायला तयार नाहीत असे विधान केले होते. या वाक्याचा कांशीरामजीवर परिणाम होऊन ते विचारप्रविण झाले. कांशीरामजींना वाटले, बाबासाहेबांच्या या वाक्याचा जसा माझ्या मनावर परिणाम झाला तसा तो इतंरावरही निश्चितच झाला असावा. त्यांनी ठरविले, की आपण अशा समाजाची निर्मिती करायची की, जो समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर बहुजन महापुरुषांच्या विचाराचा प्रसार व प्रचार सर्वदूर करेल व तो कधीही लालसे साठी स्वत:ला विकणार नाही. 

kanshiram founder of BAMCEF and Dalit Shoshit Samaj Sangharsh Samiti     कांशीरामजींनी बाबासाहेबांच्या वाक्याचा प्रभाव झालेल्या व्यक्तीना हेरुन बाबासाहेबांनी सांगितलेल्या समाजऋणाची परतफेड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जागृत करण्याची मोहिम आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत हाती घेतली. मा कांशीरामजींना सहकार्य व त्यांच्या खांद्याला खांदा लाउन कार्य करणाऱ्या मंडळीत श्रीयुत. डि. के खापर्डे, डि. पी. थोरात, नामदेव कांबळे, नामदेव चव्हाण, मधु परिहार, लक्ष्मण तांबे, एम. बी. भगत, कृपासागर मेश्राम, पी. ई. अल्हाट, एस वाय कांबळे, दादन काकडे, बी. ए. दलाल, एल. डी. शिंदे, उत्तम निकाळजे दिना भाना, मनोहर आटे, डॉ. अमिताभ, तेजसिंग झल्ली, मा. गंगावणे आणि कृष्णा उबाळे यांची नावे प्रामुख्याने येतात. कांशीरामजी व त्यांच्या सहकार्यांच्या कार्याची सुरुवात मुख्य:ता पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक व दिल्ली येथून झाली. आपल्या सहकार्यासोबत शिक्षित दलित कर्मचाऱ्यांना जागृत करण्यासाठी भारत भ्रमन केले. त्या काळात आपल्या प्रकृतीची काळजी न घेता ते सतत फिरत असत.एकदा असेच मुंबईत मंत्रालयातील दलित बहुजन कर्मचाऱ्यासाठी त्यांनी कॅडर कॅम्प घेतला, कॅडर कॅम्प सायंकाळी संपल्यानंतर प्रत्येक जण कांशीरामजी सोबत हात मिळवून घरी निघून गेलेत. त्यापैकी एकाला कल्याण ला जायचे असल्यामुळे कांशीरामजी बरोबर व्हि. टी. स्टेशन पर्यंत सोबत केली. त्याने कांशीरामजींना विचारले, आपण कुठे थांबणार आहात ? तेव्हा कांशीरामजींनी उत्तर दिले, रेल्वे स्टेशन पर, जहा जगह मिलेगी वहा सो जाऊंगा और कल हमेशा की तरह अपने काम में लग जाउंगा !. जुने कार्यकर्ते सांगतात, कांशीरामजी समोर दिसले की, दलित कर्मचारी हे कांशीरामजी चळवळीसाठी पैसे मागतील व चळवळीच्या गोष्टी सांगतील म्हणून दुरुनच सटकून जात असत. अशा कठीण अवस्थेत कांशीरामजींनी बहुजन चळवळ उभी केली.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर राजकीय, सामाजीक व धार्मिक आघाड्यावर जातीव्यवस्था अंताच्या चळवळीला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभुमीवर नव्याने विचार करणाऱ्या दलित बुध्दिजीवी लोकांकडून दिली गेलेली सकारात्मक व कृतिशील प्रतिक्रिया म्हणजे "बामसेफ" होय. बामसेफ या संघटनेच्या निर्मितीची खलबते मुख्यत: पुणे येथे झाली. सन 1971 साली एस. सी / एस. टी एम्लाईज वेलफेअर असोसिएशन ची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवर संघटना काढावयाची म्हणून 6 डिसेंबर 1973 साली ऑल इंडिया बॅकवर्ड अॅन्ड मायनॉरिटी एम्पलाईज फेडरेशन ( बामसेफ ) चे प्रारुप तयार केले. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महामंत्रच बामसेफ चे ध्येय वाक्य होते. बामसेफ हा शिक्षीत कर्मचाऱ्यांचा संघ असला तरी तो त्यांच्या दैनदिनी समस्यांसाठी नव्हता. ( BAMSEF is an organization "of" educated employees "by" the educated employees but " not for the educated employees ). बामसेफ एक प्रकारचे पिडीत व शोषित समाजाची बुध्दी, प्रतिभा तथा वित्तिय बँक आहे की, जे बहुजन समाजाच्या सामाजीक परिवर्तन व आर्थिक मुक्ती च्या मिशन ला गती देण्यासाठी संघर्षरत राहील हा बामसेफचा मुख्य गाभा होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय स्वप्न साकार करण्यासाठी प्रथम अराजकीय मुळे मजबुत करण्याचा चंग बामसेफने आखला होता. त्यामुळे समाजात समर्थ लीडरशीप निर्मितीची प्रक्रिया बामसेफ च्या माध्यमातून सुरु झाली असे म्हणता येईल. 
 
     बामसेफ चा जन्म जाहीरपणे दिल्ली येथील बोट क्ल्बवर 6 डिसेंबर 1978 रोजी झाला. दलित, अल्पसंख्यांक, ब्राम्हणी व्याख्येतील शुद्र आणि शोषीत समाजाला ब्राम्हणी वेढ्यातून मुक्त करणे व प्रगतीचा मार्ग दाखविणे हे या संघटनेचे मुख्य कार्य समजले जाते. बामसेफ या संघटनेचे कार्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेसारखे असावे असेही ठरविण्यात आले. मा. कांशीरामजींनी लिहलेली " बामसेफ -एक परिचय"हि छोटी पुस्तिका नजरेखालून घातली म्हणजे त्यांच्या चाणक्य दृष्टीची जाणीव होते. बामसेफची संकल्पना, तीचे ध्येय,उद्दिष्टे व तीच्या जाळ्याची माहीती समजण्यासाठी प्रत्येकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. 
 
     बामसेफ संघटना सरकारी कर्मचाऱ्यांची असल्यामुळे संघटनेवर अनेक बंधने येत होती. त्यांच्यावर सतत नागरी सेवा शर्ती अधिनियमाच्या टांगत्या ओझ्यामुळे हि संघटना रस्त्यावरचा संघर्ष करु शकत नव्हती. एका बाजूस गैर राजकीय मुळे भक्कम करायची व त्याचबरोबर मर्यादित राजकीय कृती करायची असे कांशीरामजीना सतत वाटत होते. या राजकीय कृती साठी त्यानी राजकीय फ्रंट काढण्याचे ठरविले. त्यातुनच दलित शोषित समाज संघर्ष समिती ( डीएसफोर )चा जन्म 6 डिसेंबर 1981 ला झाला. मर्यादित राजकीय कृतीसाठी या संघटनेला स्थापित करावे लागले. डीएसफोर हे एक पूर्णता आंदोलनकारी संघटन असून ते पुर्णतया राजकीय पक्ष बणवण्या अगोदरचा राजकीय तालमी साठी निर्माण केलेली संघटना होती असेही डीएसफोर चे वर्णन करता येईल. या संघटनेच्या माध्यमातून 1982-1983 च्या कालावधी मध्ये दिल्ली महानगर, हरीयाणा व जम्मु काश्मीर या राज्यात निवडणुका लढविण्यात आल्या. यात यश मिळाले नसले तरी कांशीरामजीच्या नेतृत्वात दलितांची एक राजकीय शक्ती उदय पावत आहे असा संदेश दलित व शोषित समाजापर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209