अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
साळवी : निर्मीका संबंधीची भुमिका कोणाची होय.
मी : निर्मीकाची कल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी मांडली महात्मा फुलेच्या काळात ब्राह्मणवादी मंडळी होम हवन यज्ञ करून शुद्रातीशुद्रास देवाच्या वा धर्माच्या नावाने लुबाडत असत. ही लुबाडणुक थांबावी म्हणुन महात्मा फुल्यांनी निर्मीकाची कल्पना मांडली शुद्रातिशंद्र त्यावेळेस अशिक्षित असल्यामुळे भट-पुरोहित त्यांची फसवणूक व आर्थिक शोषण करीत असे. म्हणुन महात्मा फुलेंनी शुद्रातिशुद्रास सरळ निर्मीकाचीच भक्ती करण्यास सांगितले. फुले म्हणतात ‘तुम्ही निर्मीकाशी सरळ संबंध जोडा. निर्मीकाशी संबंध सोधतांना निर्मीकानेच निर्माण केलेल्या फुलांची पुष्पांजली स्वत: त्यास वाहा व ध्यान धरा. निर्मीकाने सर्व माणसांना सम-समान उत्पन्न केले आहे. समाजातील स्वार्थी लोकांनी ह्या सम-समान लोकांत वर्णावरून व जातीवरून भेद पाडले आहे. निर्मीकाने निर्माण केलेल्या व्यवस्थेत सर्वच लोक समान असतांना ब्राह्मण श्रेष्ठ व महार मांग कनिष्ठ हा भेद कसा ?’ तेव्हा महात्मा म्हणतात, ‘हा भेद ब्राम्हणांनीच स्वत: निर्माण करुन, वेगवेगळे यज्ञ-होमादी प्रकार निर्माण करून, भोळ्या भाबड्या जनतेची लुट सुरू केली व त्या व्यतिरिक्त ह्या लोकांच्या मनात असा भ्रम निर्माण करू की, देवाशी तुम्ही सरळ संधान बांधु शकत नाही, कारण की तुम्ही कनिष्ठ आहात आणि तसे करायचेच झाल्यास ब्राम्हणांना झोळ्या भरून दक्षिणा द्या व देवापासुन काय पाहिजे ते मागून घ्या.’ ह्या संदर्भात मनुस्मृतीत एक श्लोक आहे.
भूतानां प्राणिन: श्रेष्ठा: प्राणिनां बुध्दिजीविन: ।
बुध्दिमत्सु नरा: श्रेष्ठ नरेषु ब्राम्हणा: स्मृता: ॥
अर्थातच, या सर्व पंचमहाभौतीक वस्तुंमध्ये प्राणी (जिवंत वस्तू) श्रेष्ठ आहेत. प्राण्यांमध्ये बुद्धीचा वापर करून जगणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. बुद्धीजीवी प्राण्या मध्येही माणसे श्रेष्ठ आहेत, आणि माणसांमध्ये ब्राम्हण श्रेष्ठ आहेत.
महात्मा फुलेच्या काळात बहुजनसमाज हा अशिक्षीत, अज्ञानी होता, म्हणुन त्यावेळेस, त्यांनी योजलेला निर्मीकाचा हा उपाय आम्ही समजू शकतो. ‘’विद्येविना मती गेली.....’ असा निष्कर्ष काढणार्या महात्मा फुलेनी बहुजन समाजात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. पण आज तर बहुजन समाज अशिक्षीत व अज्ञानी नाही. तरी निर्मीकाशी संपर्क साधण्यास त्यास एखाद्या बाबा महाराजांची गरज भासावी ह्याचे कोडे मला पडते. ह्यास कारण आहे ही बहुजनसमाजातील बहुतांशी लोकांस, आपल्या अगदी शंभर वर्षांच्या इतिहासाचा विसर पडला आहे. ज्यास आपल्या इतिहासाचा विसर पडतो, त्यास आपल्या इतिहासाच्या जीवनात पुन्हा जावे लागते, हे अटळ सत्य, बहुजन समाज सहजा सहजी विसरला. आज तर आम्ही सुशिक्षित व ज्ञानी आहोत. आमच्या विकासामागे फुले , शाहू आंबेडकरांची दिडशे वर्षाची सातत्याची लढाई आहे. मग ज्यानी ही लढाई लढली व आम्हास हे चांगले दिवस प्राप्त करून दिले. त्या महापुरूषांनी लढलेल्या लढाईतून मिळालेली फळे चाखण्यात आम्ही एवढे मुशगुल आहोत, की आम्हास हाही विसर पडला आहे, की निर्मीतीसाठी, एक ही बीज आपल्यापाशी राहणार नाही, तेव्हा लक्षात येइ्रल की शेवटच्या फळासोबत शेवटची बीजही आम्ही खाऊन टाकली आहे. फळाच्या पुन:निर्मींतीसाठी पाहीजे असलेली बीजही संपुष्टात आले, तर पुन्हा फळाची निर्मीती होऊ शकणार नाही फुले, शाहु आंबेडकरांच्या फळांचे बीज त्यांच्या साहीत्यात आजही साठवून आहेत. त्या बीजांनाही अंकुरण्यासाठी आपल्या डोक्यात थोडी जागा द्या. साळवी साहेब तुम्ही मागासलेले हिंदु आहात तुमच मी समजु शकतो. पण डॉ. आंबेडकरांच्या नवविचाराने निर्माण झालेल्या समाजातील, एक माझ्या ओळखीचा अधिकारी, अशाच एका महाराजांच्या चालीसाच रोज ऑफीसच्या वेळात पठन करीत असतो. विचारल्यावर म्हणतो, ‘आमचे महाराज अवतार आहेत.’ बाबासाहेबांनी सातिले होत, ‘मागील हजरो वर्षापासुन कुठला तरी अवतार जन्म घेईल व तुम्हा बहुजनसमाजाचा उद्धार करेल, ह्या विचारान तुम्ही दिवसरात्र नामस्मरण व टाळ पिटत असता पण मी तुम्हाला निष्ठेनी सांगतो. आता कुठलाच अवतार जो मागील दोन हजार वर्षात तुमच्या नामास्मरणामुळे जन्मला नाही तो येणारे हजारो वर्ष ही जन्मणार नाही. तुम्हीच तुमचे उद्धार कर्ते बना अत्त दिप भव:’ बाबासाहेब आपल्या भाषणात बहुजन समाजाला पुढे म्हणत, ‘आणि एखादा अवतार जन्म घेईल, तरी तो तुच्यासाठी नव्हे, तुमच्या शत्रुसाठीच. बळी नावाचा महान राजा ह्या बहुजनसमाजात होऊन गेला. हा राजा महापराक्रमी व दानी होता. त्याच्या राज्यात सुकाळ होता. सर्वांना समान वागणुक होती. ह्या राजाची जर हात्या केली असेल तर ती ‘वामन’ नावाच्या अवतारानी. अवतार हे सुद्धा आमच्या कल्याणासाठी नव्हे तर आमच्या नाशासाठीच जन्म घेतात. म्हणुन आसल्या कुठल्याच अवताराची पुजा करू नका.’ बाबासाहेबांचा हा संदेश त्यांचेच अनुयायी जेव्हा पध्दतशीरपणे फक्त, आज आपण चांगल्या नोकरीवर आहोत., म्हणुन विसरतांना दिसतात, तेव्हा मला त्यांची दया येते. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा पराभव त्यांचेच अनुययाी करीत असतांना पाहुन डोळे पानावतात.
वामनानी पाताळात पाठविल्यावर बळीराजा हा पाताळाचा सम्राट झाला. त्याच्या समतावदी विचारधारेमुळे समानता निर्माण झाली. एकदा कृष्ण व कर्ण पाताळात बळीराजास भेटावयास गेले. कृष्णाने कर्णाचा परिचय करून देताना बळी राजास सांगितले की ‘हा कर्ण पृथ्वीवरील पराक्रमी व महादानी राजा आहे. ह्यान स्वत:ची कवचकुंडले सुद्धा ब्राह्मणाला दान केली.’ बळीराजाने हे सर्व ऐकून कर्णाकडे दुर्लक्ष करून, कृष्णाशी आपली चर्चा सुरूच ठेवली ह्यावर कर्णाला अतिशय राग आला व तो त्यांच्या चर्चेत मध्येच शिरकाव करीत बळीराजाला चिडून बोलला, ‘महोदय, कृष्णाने माझा एवढा महादनी म्हणून परिचय करून दिल्यावरही तुम्ही माझी प्रशंसा तर केलीच नाही, वरून मला दुर्लक्षित करीत आहात., हे बरे नव्हे. हा माझ्यासारख्या पाहुण्या व्यक्तीचा मी अपमान समजतो.’ कृष्ण मनोमनी हसायला लागला व बळीराजाकडे उत्तराच्या प्रतिक्षेत पाहावयास लागला. बळीराजा कर्णाला म्हणाला, ‘महोदय, तुमच्या दानी प्रवृत्तीबद्दल मी का म्हणून तुमची प्रशंसा करावी ?’ दान देणे हे आमच्या राज्यात गुन्हा केल्यासारखे मानले जाते. माझ्या राज्यात एवढी समानता व संपन्नता आहे की, एक व्यक्तीला, दुसर्या व्यक्तीला दान देण्याची गरजच पडत नाही. दान वा भिक्षा मागण्याची पाळी कुणावर येऊच नये. अशी सामाजीक व्यवस्था ह्या राज्यात मी निर्माण केली आहे. माझे राज्य हे समतावादी राज्य आहे. आणि दानाचीच बात बोलत असाल, तर तुम्ही कवचकुंडले दान एका भिक्षुकाला दिलीत आणि भिक्षुकाने षडंत्रान तुमच्याकडून हे दान घेऊन, खर म्हणजे लढाईत तुमच्या मृत्युची सोय लावली. कृष्णाने बहुधा माझ्याबद्दल तुम्हाला सांगीतले नसेल, असे वाटते. मी ही पृथ्वीतलावरील महादानी म्हणून ओळखला जातो. मी वामन नावाच्या भिक्षुकाला तीन पाय जमीन देण्याचे कबुल करून, एका षडयंत्राचा शिकार झालो. ह्या वामनाने एक पाय जमीनीवर व दुसरा पाय आकाशात ठेऊन, तिसरा पायासाठीजागा मागीतली, तिसरा पाय ठेवण्यासाठी माझ्या डोक्यावर त्याने पाय ठेवला आणि मी पाताळात गाडला गेलो आजही पृथ्वीतलावर माझ्या दानाला सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. आजही आपल्या देशासाठी लढतांना एखादा सैनिक मारला गेला तर त्याच्या मृत्यूला बली-दान असे संबोधून आज कुठल्या परस्थितीत आहे, हे पाहण्यासाठी वर्षातुन एकदा मी पृथ्वीतलावर डोकावत असतो. तो दिवस ओनम म्हणन साजरा केला जातो. खेड्यापाड्यात राहणारे शेतकरी व कामगार तेथे आजही माझ्या राज्याची वाट पहात म्हणातात की - ‘इड पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ महाबलीच्या ह्या वक्तव्यानंतर कर्ण सद्गतीत होऊन बळीच्या पायावर पडून म्हणाला, ‘मी चुकलो, मी चुकलो, मला आपला इतिहास आधी कळला असता, तर मी कवचकुंडले कधीच दान केली नसती व आज पृथ्वीतलाचा सम्राट बनून आपल्या इच्छेत असलेले समतावादी राज्य निर्माण केले असते.’ एका कोळ्याच्या घरी मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे कोळी म्हणून माझा सदानकदा अपमान होत आला. द्रोणाचार्याने मला शुद्रकोळी म्हणून शिक्षण देण्यास नकार दिला, तर द्रोपदीने मी शुद्र म्हणून, स्वयंवर मंडपातून, अपमानीत करून, हुसकावून लावले कनिष्ठ जातीच्या मानसिकतेतून कुठेतरी आपण श्रेष्ठ दिसाव, ह्या अनुषंगान मी दानी बनायच्या अहंकारात स्वत:ची श्रेष्ठी मिरवावयास लागलो. त्याच माझ्या वृत्तीचा फायदा घेत भिक्षुकाने माझ्याकडून कवचकुडंले काढून घेतली अर्जुनाचा प्राणघाती बाण लागल्यावर मलाही असे वाटले, ‘तर मी कवचकुंडले दिली नसती तर ,.......... पण वेळ निघून गेली होती.’