बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
राम हा बहुजन शंबुकाचा खुनी. सितेला लांछन लावनारा. शुर्पनखा या बहुजन महिलेचे नाक, कान व स्तन कापणारा अशा या अन्यायी राजाची प्रसंशा गांधीजी करतात व असे राज्य या देशात प्रस्थापित करण्याची इच्छा जाहीर करतात. रामराज्य म्हणजे ब्राम्हणाच्या हिताला बाधा पोहोचविनार्या सर्व शत्रूचा नायनाट करणारे राज्य. जातीसंस्था व वर्णव्यवस्था याला मजबूत करणारे राज्य. बहुजनाला शिक्षणाची दारे बंद करणारे व ब्राम्हणाचा शब्द प्रमाण मानणारे राज्य. सदासर्वदा वेदाला प्रमाण मानणारे. स्त्रियांचा सन्मान न होणारे राज्य.शंबुक हा शुद्र होता.आणी शुद्र म्हणजे आजचे मराठे, तेली, माळी, कुनबी व धनगर असे सतरापगड जातीचे लोक होत. या समुहातील कोणत्या तरी जातीचा तो असेल. शुद्राला शिक्षा घेण्याचा व ऐकण्याचा अधिकार नव्हता पण शिक्षण घेण्याची व ज्ञानी बनण्याची हिंमत शंबुक या शुद्राने केली. हा ब्राम्हणाच्या एकाधिकार शाहीवरचा घाला होता. ते ब्राम्हणाच्या दृष्टीकोनातून होत असलेले पाप होते. ब्राम्हणानी कट रचला व बनावट कथा रचून रामाजवळ विदित केली. शंबुकाच्या विद्या घेण्याच्या लालसेमुळे ब्राम्हण मुलाचा मृत्यु झाला अशी तक्रार त्यांनी रामाकडे केली. शंबुकाने राजाच्या कर्तव्याची जाणीव रामाला करुन दिली. राम व प्रजा यातील सहानुबंध समजाऊन सांगितले पण ब्राम्हणप्रेमाची गुंगी चढलेल्या रामाला ते समजणे कठीणच होते. क्षणाचाही विचार न करता शंबुकाचा वध रामाने केला. अशा या रामराज्याची तळी गांधीजीनी उचलली.
राम हा बुद्धीवादी व विचारवंत नसल्यामुळे तो ब्राम्हण कारभारी जे जे सांगत तो ते करीत व ऐकीत होता. ब्राम्हणांनी शंबुकाचा वध करावयास सांगितले. रामाने शंबुकाला ठार मारण्याचे नीच कार्य केले. राम हा क्षत्रिय होता. म्हणजे बहुजन होता. बहुजनांच्या हातातून बहुजनाचा खुन ब्राम्हणानी करवून घेतला. असे अत्याचाराचे राज्य गांधीजीना हवे होते. गांधी स्वत: वर्णव्यवस्थेचे समर्थक होते. जातीव्यवस्था ही परमेश्वराची देण आहे असे ते मानत. वर्णव्यवस्थेने नेमुन दिलेली कामे प्रत्येकाने चोखपणे पार पाडणे हे इतिकर्तव्यच होय. त्याचाच एक भाग म्हणुन त्यानी भंगी-मेहतर या लोकसमुहाला हरीजन हे नाव दिले. हरीजन म्हणजे देवाची माणसे. मलमुत्र वाहून नेणार्या समुहाला देवाची माणसे असे संबोधून तेच घाणेरडे काम करण्यास गांधीजीने प्रोत्साहन दिले. अशा मलमुत्र वाहुन नेणार्या समुहाला देवाची लेकरे संबोधणार्या गांधीजीने स्वत:सकट इतर लोक समुह हे कोणत्या सैतानाची लेकरे आहेत हे गांधीजीने मरेपर्यंत सांगीतले नाही. ज्या रामराज्याची तळी गांधीजीनी उचलली त्याच देव ब्राम्हणाच्या वंशजानी (नथुराम गोडसे) गांधीजीचा खुन केला. गांधीजीच्या खुनाला ब्राम्हणाचा संघपरीवार "गांधीजीचा वध" असे संबोधतात. एखाद्या महापाप्याचा समाजाला उपद्रव होत असल्यास समाज मान्यतेने एखाद्याची हत्या झाली त्यास वध असे म्हणतात.