देशमुख : आज भारत स्वतंत्र आहे आणि तरी सुद्धा बहुजन स्वतंत्र नाहीत असे आपण कसे म्हणता ?
मी : हे समजणे तेवढे सोपे नाही. आणि मी सामाजीक स्वातंत्र्याबद्दल बोलतोय. मी आपणास समजविण्याचा प्रयत्न करतो.
देशमुख : निश्चित.
मी : आम्ही जेव्हा ब्रिटीशांचे गुलाम होतो, तेव्हा आमचे स्वातंत्र सेनानी ब्रिटीशांकडून आपल्या अधिकाराची मागणी करीत होते. खरे की खोटे ?
देशमुख : खरे.
मी : ह्यात मालक कोण?
देशमुख : ब्रिटीश सरकार.
मी : गुलाम कोण ?
देशमुख : भारतीय जनता.
मी : गुलाम काय करतो ?
देशमुख : आपल्या अधिकाराची मागणी करतो.
मी : मालक काय करतो?
देशमुख : ते अधिकार द्यावे की न द्यावे ह्याबद्दल निर्णय करतो.
मी : मग आज स्थिती ह्यापेक्षा काय वेगळी आहे ? आजही ओबीसी सेवासंघ, महाराष्ट्र ओबीसी संघटना, ओबीसी एकता मंच, ओबीसी क्रांती दल, महात्मा फुले समता परिषद ह्यासारख्या ओबीसीच्या संघटना ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, क्रिमीलेयर काढून टाकण्यात यावा, ह्यासारख्या मागण्या करतात, खरे की नाही ?
देशमुख : खरे.
मी : ५२ टक्के ओबीसी समाजातील एकतरी सज्ञानी असा गृहस्थ असेल का ज्याला स्वत:चा विकास नकोय ?
देशमुख : नाही.
मी : मग ओबीसीच्या संख्या ५२ टक्के असताना आणि ह्या देशात लोकशाही असतांना ओबीसींना आपल्या हक्कासाठी मागणी करावी लागते ह्यावरून आपणास काय वाटते ?
देशमुख : ओबीसी हे सामाजिक गुलामच आहेत. अजून त्यांना निर्णयप्रक्रियेत योग्य स्थान नाही.
मी : मंडल आयोग कोणाच्या विकासाठी होता ?
देशमुख : ओबीसींच्या.
मी : मंडल आयोगाला राष्ट्रीय स्तरावर बराच विरोध झाला. हे मानता का ?
देशमुख : निश्चितच. सांसद घेरण्यापासून तर जाळपोळीपर्यंत व आत्मदहनापर्यंत सर्वप्रकारचे विरोध झालेत.
मी : हा विरोध करणारे ओबीसी असतील का ?
देशमुख : निश्चितच नाही. ओबीसी जनता स्वत:च्याच विकासाचा कसा बरे विरोध करेल. पण काही ओबीसींनी ह्याचा विरोध केला होता. कारण काही पाताळयंत्री संघटनांनी असा प्रचार केला होता की मंडल आरक्षण हे सुद्धा दलित आदिवासी करिताच आहे. ओबीसींना दलिताविरुद्ध भडकविण्याचा हा काही स्वार्थी संघटनांचा उद्देश होता. पण त्यात ते. सफल झाले नाही. सत्य परिस्थिती समोर आल्यावर कुठल्याच ओबीसींनी ह्याचा विरोध केला नाही.
मी : मग ह्या मंडल आयोगाचा दलित, आदिवासींनी विरोध केला काय ?
देशमुख : निश्चितच नाही. दलित आदिवासी स्वत: आरक्षणाचा अधिकार बजावीत असताना ते ओबीसीच्या आरक्षणाला कसे विरोध करतील. त्यांनी तर मंडल आयोगाचे भव्य स्वागत केले. ठिकठिकाणी आनंद मोर्चे व प्रदर्शने केलीत.
मी : मंडल आयोगाला मुस्लीम, खिश्चन, सीख, जैन ह्यासारख्या इतर धर्माकडून विरोध झाला का ?
देशमख : नाही. मस्लीम, ख्रिश्चनाबद्दल असे वत्तपत्रात काही नव्हते.
मी : मंडल आयोगाला विरोध करणारे हे दलित, आदिवासी, ओबीसी व अन्य धर्मीय नाहीत हेही एक सत्य आहे व मंडल आयोगाला प्रचंड विरोध झाला हेही एक सत्य आहे तर मंडल आयोगाला प्रचंड विरोध करणारे कोण ?
देशमुख : ढोबळेसाहेब कोडे सुटले. भारतीय जनता वजा इतर धर्मीय वजा दलीत वजा आदिवासी वजा ओबीसी म्हणजेच हिंदु ब्राम्हणवादी व तत्सम उच्च जाती ह्याच विरोध करीत होत्या.