Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अज्ञानाचे बळी 

अज्ञानाचे बळी  -  लेखक -  प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे,  B.A., B.E., M.B.A., L.L.B


साळवी : म्हणजे एकुणच ब्राह्मणांला दान देणे दोघांनाही महागात पडल म्हणावे, नाही का ढोबळे साहेब ? आता अवताराचीच गोष्ट चालू आहे म्हणून सांगतो, कालच्याच पेपरमध्ये बातमी होती, की, विष्णुचा दहावा अवतार असलेल्या ‘कलकी’ नावाच्या अवताराला अंधश्रद्ा निर्मुलन समितीच्या अनिसच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली. कलकी महाराज उर्फ श्रीराम निवृत्ती मुंढे ह्याने मानसिक आजारी असलेल्या अभियंते श्री. जी. आर. साठे ह्यांना मेणबत्तीच चटके देऊन आजार दुरुस्त करतो असे सांगून, 6 लाख रूपयाने गंडंविले. हा मुंढे तर बहुजनसमाजाचा असला पाहिजे, ह्याने साठेला गंडविणे म्हणजे तर उलटी गंगा म्हणायची.

मी : कोण कुणाला फसवितो, ह्या पेक्षा फसवणूकीचा वाव असणारी व्यवस्थाच नष्ट करणे हे जरूरीचे, जखम झाली की मलम लावणे जरूरीचे आहे. अनिसचे कार्यकर्ते जखमीवर मलम लावायचे काम करतात. जखम झाली की मलम लावणे जरूरीचे हे निश्चित. पण वारंवार जखम का होते ह्यांचे कारण शोधणे, जरूरीचे आहे. अनिस मागील 20 - 25 वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. पण तरीही दिवसेंदिवस लोकांमधील अंधश्रद्धेचे प्रमाण बळावतच आहे. रोज एक ना एक नवा बाबा, बापू वा अवतार जन्म घेतच आहे. मागे अनिसच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे बंगाली बाबांचा जो सुळसुळाट झाला होता. तो पोलिसांच्या मदतीने फार मोठ्या प्रमाणात कमी झाला. मुंबई लोकलच्या प्रत्येक डब्यात बंगाली बाबांची जाहीरात असायची - ‘गृहकलह, क्लेष, संतानप्राप्ती, गुप्तव्याधीवर 100 टक्के उपाय. इलाज 24 तासांच्या आत’ बरेचसे  लोक ह्या जाहीरातीला बळी पडून ह्या बंगालीबाबाकडे जायचे. जेव्हा बंगालीबाबाच्या हातून एका लहान मुलाचा बळी चढविण्यात आल्याची घटना घडली, तेव्हा राज्यसरकार, पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व एकामागोमाग एक ‘बंगाली बाबांचा सुळसुळाट’ ह्या मथळ्याखाली महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रंनी अग्रलेख लिहीले.  वाचकांनी जबरदस्त प्रतिक्रीया दिल्या. बंगाली बाबांचे तसे पाहले तर थोरले बंधुच. बाबाबापू हे थोडे फार बर्‍यापैकी शिकलेले असतात. हे प्रचारक बाबा बापूंचा महीमा सांगताना, महाराजांच्या आर्शीवादाने तुमची सर्व दुखातून मुक्तता होईल असा प्रचार करतात. ‘होईल काही उपाय’, म्हणून आपल्यातील बरेच लोक ‘एकदा तरी महाराजांच्या आशिर्वादासाठी जातात आणी हळूहळू बापू महाराजांच्या चक्रव्युहात फसतात. बापू महाराजांचे दलाल ह्या भक्तीसंप्रदायातील मग काही श्रीमंत बकरी शोधत असतात. त्यांना विशेष अदबीने वागविण्यात येते. येथे  अशा लोकांना महाराजांच्या दर्शनासाठी विशेष व्ही. आय. पी. पासेस देण्यात येतात. महाराजांच्या आपण खास मर्जतील आहो, असा आभास निर्माण करून, आमच्यातील बर्‍याच महाभागांना अक्षरश: बेवफुक बनविण्यात येते. आज समाजात व देशात भ्रष्ट्राचार फार मोठ्या प्रमाणात फेलला आहे. एखादा कंत्राटदार पैसे कमविण्याच्या चक्करमध्ये हलक्या दर्जाचा माल वापरतो, तर एखादा अधिकारी दिवसेंदिवस वाढणार्‍या जीवनशैलीला साजेसे रहाता याव, म्हणून मोठमोठ्या रकमांचा भ्रष्टाचार करतो. पण त्याच सोबत कंत्रादार वृत्तपत्रात वाचतो, ‘अमुकतमूक बिल्डींग कोसळली कंत्राटदार  फरार ’ वा अधिकारी वाचतो, ‘आज अमूकअमूक अधिकार्‍याच्या घरावर धाड. 5 लाख नगद. आणि 3 लाखाचे सोने मिळाले अधिकारी गजाआड’ ह्यामुळे एका विचित्र द्विधा मानसिकतेत अडकलेले मोठमोठे व्यवसायी वा अधिकारी जेव्हा त्यांचेच मन त्यांना  त्यांना खात असते, त्यावर उपाय म्हणून, बापू बाबांना शरण जातात. मनात शांती निर्माण करण्याचा प्रयोग करतात. शांती प्राप्तीसाठी बाबाबापूंना मोठमोठ्या रकमा, भ्रष्टाचाराच्या पैशातून देतात. बाबा बापूंनाही हे कळत असत, पण ज्याप्रमाणे मांजर डोळे मिटून दूध पितेंना, असा समज करते की मला कोणी पहात नाही, त्याप्रमाणेच त्याच प्रवृत्तीतूनच हे बाबा बापू ह्या रकमांवर हाथ साफ करीत असतात. नागपूरच्या एका मोठ्या मैदानात असाच सत्संग सुरू होता बापू सांगत होते की, ‘मदीरापान मत किजीए. सच बोलीए’ ह्यावर नवीन आलेला एक भक्त उभा राहुन म्हणाला, ‘बापू दारू पिना नही चाहीए, ऐसा आप कह रहे है, मगर आपका यह सत्संगका पूरा खर्च जिसने उठाया है, वह आदमी नागपूरका दारूका बडा व्यपारी आहे.’ त्यावर बापुनीं त्याच्याकडे दुर्लक्ष केले. सत्संगानंतर ह्या भक्ताच्या कानाखाली, ह्या बापूंच्या शिष्यांनी वाजवीले. हे सागांयची वेगळी गरज नाही. ह्या बाबा बापू कुठेतरी अडकतो, तेव्हा आपल्याला ह्यांची धोखाधडी लक्षात येते. पण आपण लवकरच हे विसरतो आणि चंद्रस्वामीच्या ठिकाणी दुसरे बाबा बापू जन्म घेतात.

साळवी  : ह्याच काळात बाबाबापूच एवढे पिक कसे येत आहे ? हे पिक मागील दहा वर्षाच्या काळात फार मोठ्या संख्येने आल्यासारखे वाटते.
मी : मागील दहा वर्षाचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की 1990 ला व्ही. पी. सिंगानी मंडल आयोग लागू केला. मंडल आयोगामुळे बहुजन समाजातील लोकसंख्येने 52 टक्केअसलेल्या ओबीसी वर्गासाठी सरकारी, निमसरकरी क्षेत्रात नोकर्‍यासाठी आरक्षण लागू झाले. मंडल आयोगाने ओबीसींच्या विकासाचा दरवाजा उघडला. बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे अनुसूचीत जातीजमातीचे लोक आधीच देवासामेर टाळ पिटणे सोडून, चळवळीच्या मार्गाने, आपल्या अधिकारासाठी लढत होते. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे, आता ओबीसीच्यांही लक्षात येईल की टाळ पिटण्यामुळे नव्हे, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करून, आपले अधिकार मिळतात. हा ओबीसी वर्गही जर टाळ पिटणे सोडून, चळवळीस लागला तर, संपूर्ण ब्राम्हणी व्यवस्था ढासळून पडेल आणि ह्याच भितीनी ब्राह्मणवाद्यांनी हा ओबीसी समाज टाळ पिटत रहावा म्हणून ठिकठिकाणी अतिशय सुनियंत्रित पद्धतीने मोठमोठे पोस्टरबाज बाबा महाराज निर्माण केले. मनुवाद्यांपाशी संघटन आणि कार्यकर्ते तयारच असल्यामुळे ते हे कार्य सहज करू शकले. भोळ्या भाबड्या ओबीसी बांधवांना ‘हा बाबा चमत्कारी, दैवीक’, असे म्हणून कसेही करून सत्संग वा बैठकीस न्यावयास लागले, जेणेकरून तो चळवळीसाठी तयार होण्याऐवजी, टाळ पिटतच राहीला पाहीजे. पण तरीही मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे, ओबीसी म्हणून नोकरीस रूजू झालेला तरूण ओबीसी वर्ग, बुवाबाबांना सोडुन, बाबासाहेबांच्या मार्गाने जाऊ लागला. ह्यातुनच ‘ओबीसी सेवासंघाची’ निर्मीती झाली. तेव्हा हा वर्गच निर्माण होऊ नये म्हणून, मनुवाद्यांनी सरकारी निमसरकारी क्षेत्राचे फार फार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्याचे धोरण आखले. खाजगी क्षेत्रात आरक्षण नसते. खाजगीकरण म्हणजे बहुजनांचे आरक्षणाद्वारे निर्माण झालेले अधिकार नष्ट करण्याचे धोरण होय.

साळवी : म्हणजेच आपण खाजगीकरणाचा विरोध करायला पाहीजे. व खाजगी क्षेत्रातही लोकसंख्यानिहाय आरक्षणाची मागणी केली पाहीजे. तरीही बाबा बापू ह्याच देशात सहजरित्या निर्माण होण्यामागची कारणे काय ?

मी : बाबा बापूच्या निर्मीतीसाठी देशातील स्थिती कारणीभूत आहे. ज्याप्रमाणे सफरचंदाचे उत्पन्न आपल्या महाराष्ट्रात होत नाही पण तेच काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणात होते ह्यास कारण आहे महाराष्ट्र व काश्मीरमधील भौगोलीक स्थितीचा फरक. आपल्या देशात ऐवढे बापूबुवा निर्माण होतात अमेरिका आणि युरोपियन देशात वैज्ञानीक निर्माण होतात. ह्यास कारण आहे. सामाजीक व्यवस्थेतील फरक. आम्ही आजही आमच्या पुरातन ब्राम्हणवादी सामाजीक स्थितीचे बळी आहोत तर अमेरिकेने वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारून स्वत:चा विकास करून घेतला.

साळवी : ह्यास ब्राम्हणवादी स्थिती आपण कसे म्हणता ?

brahminism vs Bahujan मी : आताच आपण बीडच्या मुंढे उर्फ कलकी अवताराला तुरूंगात डांबल्याचे सांगीतले, ह्या मुंढेला ‘अवतार’  बनून लोकांना लूटायची कल्पना काआली ? व बराच काळ तो त्यात यशस्वी  राहून लाखो रूपये कसा कमवू शकला ? ह्याचे कारण आहे ‘अवतार’  ही कल्पना. अवतार ही कल्पना ब्राम्हणवादी साहीत्यातील आहे. ब्राम्हणवादी साहीत्यात लिहीले आहे की, विषणुचा दहावा अवतार ‘कलकी’ हा कलयुगात जन्म घेणार आहे. झाले, ह्या मुंडेनी हीच कल्पना अंगीकारून, स्वत:स ‘कलकी’ चा अवतार घोषीत केले आणि लोकांनाही आधीच माहीती आहे की, ह्या कलयुगातच विष्णुचा दहावा अवतार ‘कलकी’ जन्म घेणार आहे, म्हणून लोकांनाही त्याला दहावा अवतार मानून, पुजन सुरू केले. अनिसच्या कार्यकर्त्याच्या पोलीस तक्रारारी मुळे महाराष्ट्रातील हा दहावा अवतार पकडला गेला. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असे कित्येक कलकी आजही, भारतातल्या विविध राज्यात, लोकांची फसवणूक करीत बिनदास्त नव्हे; तर मोठ्या सन्मानाने फिरत  आहे. त्यामुळे एखाद दुसरा कलकी तुरूंगात डांबल्यामुळे, लोकांमध्ये हा संदेश जातो की,हा अमुकतमुक बाबा नकली अवतार होता. ह्याचाच अर्थ असली अवताराचा जन्म व्हायचा आहे. ह्या संकल्पनेत अजून एखाद्या नविन बाबाला कलकी बनायचे रान मोकळे राहते. त्यामुळे ‘अवतार’ ह्या ब्राम्हणवादी कल्पनेवरच आम्ही हमला केला पाहिजे, असे मला माझ्या अनिसमध्ये काम करणार्‍या मित्रांना सांगावासे वाटते. ‘अवतार’  नावाचा ब्राम्हणवादी विचारच समाजातुन नष्ट झाला तर अवतार बनण्याचे धाडसच कोणी ढोंगी व्यक्ती करणार नाही. आणि ह्या ‘अवतारवादी’  कल्पनेवर प्रहार करतांना बाबासाहेब आपल्या काळातील बहुजन समाजाला सांगतात - ‘अरे हजारो वर्ष ज्याचा जप करून तो तुमच्या उद्धारासाठी अवतार पैदा झाला नाहीय तो अवतार सोर ही पैदा होणार नाही. मुळातच ब्राम्हणवादी व्यवस्था ’ नष्ट करायची असेल तर; समाजाला फुले आंबेडकरी विचार फैलविणे, हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. पण आज आम्ही आमच्या देशात काय बघतो आहे ? टि.व्ही. चे कोणतेही चॅनेल लावा, अर्ध्या चॅनेलवर बाबांचे प्रवर्चन, किर्तन, संदेश, दर्शन साधना वा स्तवन चालू आहे ; नाहीतर कुठल्या तरी पुराणातील धार्मीक गोष्टी सिरीयलद्वारा दाखविल्या जातात. ‘पुराणातील वांगी पुराणात’ आपण एकविसाव्या शतकाध्ये प्रवेश केला आहे, ह्याचे साधे भानही आम्हाला नाही. असेच एकदा टि.व्हीचे चॅनेल बघत होतो. रामायणातील एक प्रसंग चालू होता. राम लक्ष्मण व परशुरामाची काहीतरी वादवादी चालू होती. राम आणि लक्ष्मण वैतागून परशुरामाची बोलत होते. एवढ्यात रामाला साक्षात्कार होतो की, अरे, ही व्यक्ती तर परशुराम, ब्राम्हण. राम म्हणजे क्षत्रिय. वर्णव्यवस्थे नुसार खालच्या वर्णाच्या माणसाने, म्हणजेच रामाने वरच्या वर्णाच्या व्यक्तीशी म्हणजेच परशुरामशी सभ्यच व वाकुनच बोलले पाहिजे, हा मनुस्मृतीचा नियम आहे. राम ताबडतोब वाकुन परशुरामास नमस्कार करन माफी मागतो, व ज्या मुद्यावर त्यांची वदावादी चालू असते, तो मुद्दा महत्वाचा होतो. आता आम्ही संवैधानीक, समता, स्वातंत्र्य व बंधुतेची जी व्यवस्था मान्य केली आहे; त्याच्यानुसार खर तर मुद्दा वा चर्चेचा विषय, हा महत्वाचा आहे; व्यक्ती तर सर्वच समान आहेत. पण हे सर्व विषमतावादी धार्मीक मनोरंजन टि.व्ही.  सीरीयलद्वारे दाखवुन, आम्ही आमच्या भावी पिढींना काय देत आहो ? ह्याचे कोनालाच भान नाही. सामाजीक प्रबोधनाचे कार्य पुर्णपणे थांबले आहे. आज आमच्यात प्रबोधनकार ठाकरे नाहीत. पण आज आम्हाला फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार समाजात फैलविण्यासाठी हजारो प्रबोधनकारांची गरज आहे. प्रबोनकार ठाकरेचे ‘देवळाचा धर्म की धर्माचे देऊळ’ ह्यासारखे प्रबोधनपर पुस्तक लिहीणारे लेखक दुर्मिळच झाले आहे. टिव्ही सारख्या वैज्ञानीक शोधाचा उपयोग भारतात अतिशय अवैज्ञानीकरित्या व अधंश्रद्धा व अज्ञान फैलविण्यासाठी केला जातो. भारतात टिव्ही ला खर्‍या अर्थाने इडियट बॉक्स ही ओळख मिळवून देण्याचे श्रेय ह्या बाबाबुवांना द्यावे लागेल.

    महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने प्रदर्शित छत्रपती राजर्षि शाहु महाराज ही एक सिरीयल तेवढी पहाण्यायोग्य आहे. ह्या सिरीयलमध्ये दाखविले आहे की शाहु महाराजांना शुद्र समजून, जेव्हा ब्राह्मण त्यांना वेदान्त संस्कार करण्याचे नाकरतो, तेव्हा शाहु त्या ब्राम्हणाला आपल्या राजदरबारातून नोकरीवरून काढून टाकतात. त्यामुळे राजवाड्यात होणारी पूजा बंद पडते. महाराजांची पत्नी महाराजांना विचारते, ‘आता पूजेचे कसे ?’  महाराज म्हणतात, ‘देवाची पूजा करायला, ब्राम्हणाची काय गरज आहे ? ’ काय आम्ही स्वत:च देवाची पूजा करू शकत नाही ? एवढे दिवस ब्राम्हण तुमच्या समक्षच पुजा करायचा, त्यामुळे एकणुच पूजेचे मंत-तंत्र तुम्हाला पाठ झालेच असतील. तेच मंत्र आता आठवून देवासमोर म्हणा.’ महाराजांची पत्नी म्हणते, ‘अहो तो ब्राम्हण संस्कृत मध्ये काय बोलायचा, हे मला कळतच नव्हते.’  महाराज मग एका दुसर्‍या ब्राम्हणाला मराठीत पुजा करायला व मत्सपुराणाचे पठण करण्यासाठी बोलवितात. पठन करतांना हा ब्राम्हण म्हणतो - ‘ब्राम्हणाला आपण शय्यादान द्यावे’  ह्यावर चिडून राणीसाहेब त्या ब्राम्हणाला अक्राळविक्राळ शिव्या मारते व पळवून लावते. महाराज तेथेच बसले असतात व राणीसहेबांच्या ह्या आविर्भाला पाहून हसायला लागतात. राणीसाहेब म्हणतात, ‘तुम्ही राजे, तुमच्यासमोर तो ब्राम्हण तुमच्या पत्नीला शय्यादान करावे म्हणतो आणि तुम्ही हसता.’  महाराज म्हणतात - ‘ह्या पोथी पुराणात आपल्याबद्दल काय लिहिले आहे, हे अपणास कळावे, हाच माझा उद्देश होता. तो सफल झाला, म्हणून हसतोय.’  राणीसाहेबांना आपली चूक कळते व त्या मनोमनी विचार करतात, देवाची पूजा करायला हवी, कुठल्या शास्त्राची व कुठल्या ब्राम्हणाची साथ. मनापासून जे पूजले  ते देवापर्यंत थेट जातच. माणगावच्या परिषदेत शाहु महाराजांनी ह्या देशाच्या मागासलेल्या बहुजनसमाजाला जो राष्ट्रीय नेता समर्पित केला त्या डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचे विचार तर अधिकच क्रांतीकारी होते. बाबासाहेब म्हणायचे, ‘ईश्वर आहे काय ?....  गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटायचे आहे, त्यांनीच ईश्वराच बुजगावणे उभे केले आहे’ 
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209