अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
राजेश : काका तुमचा ज्योतीष शास्त्रावर विश्वास आहे का ?
मी : राजेश हा प्रश्न तू मध्येच का उपस्थित केलास ?
राजेश : तसे नव्हे काका ? आता परवाच वृत्तपत्रात वाचल की सरकार अभ्यसक्रमात ज्योतीषशास्त्र हा विषय आणणार. त्यामुळे आमची तर फार मोठी पंचाईत होईल ना ?
मी : ती कशी.
राजेश : बघा काका, भूगोल विषयाचा पेपर असला तर लिहावे लागेल, सूर्य हा तारा आहे आणि ज्योतीष शास्त्रात लिहावा लागेल, हा ग्रह आहे. त्याव्यतिरिक्त ज्योतीषशास्त्रानुसार, चंद्र हा ग्रह आहे, उपग्रह नाही आणि भारातभर अस्तित्वातच नसलेले राहु आणि केतू ग्रह ज्योतिषशास्त्र विषयासाठी वेगळे पाठ करावे लागतील. आणी भूगोलात राहु - केतू ग्रह म्हणून लिहीले, तर मार्क्स कटतील. एकुणच सगळा गोंधळात गोंधळ.
मी : सरकार हे सर्व कशापायी करत आहे हे मला कळत नाही. पण आपण जर फुले शाहु आंबेडकरांचे विचार व कृती समजून घेतली तर ज्योतीषशास्त्राच्या नावावर समाजात दांभिकता फैलविणार्यांचे मनसुबे आपण सहज उधळून काढू शकतो. शाहु महाराजांच्याच जीवनातील एक प्रसग आठवतो. शाहु महाराजांकडे दक्षिणेकडून एक महान ब्राम्हण ज्योतीषी आला आणि महाराजांना सांगु लागला की महाराज मी जोतिषशास्त्रात खुप पारांगत आहो आणी आपले भविष्य मी सांगू शकतो. महाराजांनी आपल्या एका शिपायाला सांगुन ह्या ज्योतीषाचार्यानी आपल्या स्वागतगृहात सोय केली व दुसर्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. महाराज संध्याकाळचे शिकारीला जायच्या आधी आपल्या एका विश्वासु शिपायास सांगुन गेले की, अरे तो स्वागतगृहात असलेल्या ज्योतीष आहे ना त्याला चांगला बडवून काढ. महाराजांनी सांगीतल्याप्रमाणे ह्या विश्वासु शिपायाने त्या ज्योतीषी बुवाला चांगले बदडून काढून, त्याच्या चेहर्याचा नक्शा बदलून टाकला. तो जोतीषी काकुळतीने शिपायास म्हणत होता, ‘अरे मी राजज्योतीषी आहे. महाराजांनीच मला हया स्वागतगहात पाहुणा म्हणुन ठेवलेले आहे’ पण त्या ज्योतीष्याचे म्हणने ऐेकेल, तर तो महाराजांचा विश्वासु शिपाई कसला. त्या शिपायाने त्या ज्योतीष्यास स्वागतगृहात शिरलेला चोर समजून बदडून काढले. दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे हा ज्योतीषी राजदरबारात महाराजांसमोर उपस्थित झाला आणि महाराजांना शिपायाची तक्रारार करत म्हणू लागला की ‘महाराज मी राजज्योतीषी आहे, हे सांगीतल्यावरही, आपला शिपाई मला मारत होता. ह्यास शिक्षा करा.’ महाराज हसले आणि त्या ज्योतीषास म्हणाले, ‘अरे काही तासातच तुला महाभयंकर मार पडणार आहे, हे तुला तुझ्या ज्योतीषशास्त्राच्या आधारे कळले नाही का ? काही तासानंतरचे तुझे भविष्य तुला कळत नाही, तर माझे जीवनभरचे भविष्य तु कसे सांगणार.’ महाराजांनी त्या ज्योतीषास एक अतिथी म्हणून काही सुवर्णमुद्रा देऊन आपल्या राज्यातून बाहेर निघुन जाण्याचा हुकूम दिला. ज्योतीषी फरार झाला. शाहु महाराजांचा ज्योतीषशास्त्रा संबंधीचा योग्य दृष्टीकोन ह्यातून व्यक्त होतो.
राजेश : ज्योतीषशास्त्र हे खोट आहे असे जर तुमचे म्हणने असेल तर मग आजही हजारोच्या संख्येनेलोक ज्योतीष्याकडे का जतात ? आणि काका बर्याच लोकांना अनुभव आहे की त्यांना कुणीतरी सांगीतलेले भविष्य बरोबर निघाले.
मी : अगदी बरोबर, तू काय बोललास बर्याच लोकांचा, सर्व लोकांचा नाही. म्हणजेच हे 100 टक्के वैज्ञानीक शास्त्र नाही. विज्ञानाचा नियम हा 100 टक्के सारखाच असतो. न्युटननी गुरूत्वाकर्षनाचा सिद्धांत मांडला. कुठलीही वस्तु खालीच पडते. हे जेवढे सत्य भारतभुमीवर आहे तेवढेच, सत्य अमेरिकन भुमीवर पण आहे. ज्योतीषशास्त्राचे असे आहे का ?
राजेश : नाही. मी आधीच सांगीतले. माझ्या ओळखीतील सर्वच नव्हे, काही लोकांना भविष्य खरे सांगितल्याची प्रचीती आली आहे. आता आमच्या मनीषा वहीनचेच घ्या. त्यांना एका रस्त्यावर फिरणार्या जोतीषाने सांगीतले होते की, मुलगा होणार. आणि मुलगाच झाला.
मी : समोरचे मी सांगतो. त्यानंतर तो ज्योतीषी तुमच्याकडे पुन्हा आला असणार 100-200 रू. दक्षिणा दिली असणार.
राजेश : 100-200 रू. कसले वहिनीने दादाला गळ घालून त्या ज्योतीषास चांगले 500 रू. द्यावायास सांगीतले आणि दादानीही बिनदास्त दिले.
मी : अरे असाच एक ज्योतीषी आमच्या शेजारच्या वहीनीकडेही आला होता. त्यांनाही ह्या ज्योतीषान सागीतले की मुलगा होणार. पण त्यांना तुलगी झाली आणि तो ज्योतीषीही पुन्हा तिकउे फिरकला नाही. मी अंधश्रद्धा निर्मूलनासबंधी नेहमीच बोलतो, म्हणून पडवळ वहिनी हे मला सांगीतले की, भाऊजी तुमच म्हणनं खर आहे. ज्योतीष वगैरे काही नसत. पण तेच त्यांना मुलगा झाला असता तर, त्यांचा ज्योतीषावरचा विश्वास अधिकच वाढला असता. आणि तो ज्योतीषी ही येऊन वहिनीकडून तुमच्यासारखेच 400 - 500 रू. उकळून गेला असता. अरे भविष्य सांगणे, हा त्या ज्योतीष्याचा पोटपाण्याचा व्यवसाय आहे. एखाद्या बाईला बाळ होणार असेल तर, निश्चितच एकतर तो मुलगा असणार किंवा मुलगी हेच होणार. आजही आमच्या समाजात स्त्री पुरूष विषमता एवढी भिषण आहे की बाळ होणार्या स्त्रीलासुद्धा आपल्या पोटी पुत्रच व्हावा अशी इच्छा असते. कालची मनुवादी व्यवस्था झिडकारून आज डॉ. आंबडकरांची संवैधानीक वयवस्था आपण अंगीकारत असल्यामुळे हळूहळू स्त्री परूष विषमता कमी होत आहे. पण तरीही ब्राम्हण मनुवादी व्यवस्था व बाबासाहेबांच्या राज्यघटनेद्वारे मांडलेल्या संवैधानीक व्यवस्था ह्याचा संर्घष समाजात सुरूच आहे. बाबा बुवा साधू ह्यांचे अवडंबर घेऊन, बाबासाहेबांनी निर्मीलेल्या लोकशाहीवादी संसदेला शह देण्यासाठी धर्मसंसद निर्माण करणारे टगे, आजही फार मोकळ्या रितीने बाबासाहेबांनी घटनेत मांडलेल्या, अभिव्यक्ती स्वातंत्रच्या नावाखाली एकुणच देशात विषमतावादी मनुवादी विचार पेरतच आहे. समाजातील सर्व धर्माच्या व जातीच्या बुद्धीवादी लोकांनी एकत्र येऊन ह्या टग्यांची सोय लावणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा हा देश पुन्हा एकदा विभाजनाच्या वाटे वर तरी पोहोचेल वा गुलाम तरी होईल.
राजाराम मोहनरॉय यांनी ब्रिटीश सरकारला सतीविरूद्धच्या कायदा पास करायला भाग पाडले. महात्मा फुले ह्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. महात्मा फुलेना कळले होते की मुलगा शिक्षित झाला तर तो तेवढाच शिक्षित होतो, पण मुलगी शिक्षित झाली तर पुर्ण घर शिक्षित होते. महात्मा फुले, न्यामुर्ती रानडे, आगरकर, शाहु महाराज ह्यासारख्या सुधारणावद्यांनी विधवाविवाह, बालविवाह ह्यासारख्या एकुणच स्त्रीजातीला जाचक असणार्या प्रथाविरूद्ध रान उठवून, समाजजागरण करून स्त्रीचा समाजात सन्मान पुरूषा एवढाच असावा असे कार्य केले. डॉ. आंबेडकरांनी तर ह्यावर हिंदु कोड बिल लिहुन काढले. टप्याटप्याने हे हिंदू कोड बिल सरकारने संसदेद्वारा पास करून, अंमलात आणले. स्त्रीयांनाही आपल्या वडीलांच्या वारसातील हिस्सा मिळणे सुरू झाले. एक पत्नी विवाह, मुल दत्तक घेतांना स्त्रीला समान अधिकार व त्याचा सोबत स्त्रीयांसाठी पुरूषांपेक्षा काही जास्तच चांगल्या तरतूदी करुन, ह्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती मोडीत काढून, समतावदी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला.
फुले आंबडकरांनी केलेल्या कार्यामुळेच आज स्त्रीला समाजात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. म्हणूनच आपल्या पतीशी वेळप्रसंगी वाद होऊनही ह्या प्रतीकांची स्थापना स्त्रीयांनी आपल्या घरात केली पाहिजे, पण चित्र वेगळेच आहे. बाळाला जन्म देणारी स्त्रीही मुलगाच व्हावा, असा अट्टहास धरते,. मग बिचारा पोटभरू ज्योतीषी मुलगा होईल., असे सांगून त्या घरी, मुलगा झाल्याची खात्री करुन दक्षिणेसाठी प्रगट होतो. मुलगी होईल असे म्हटले तर, पोटभरू ज्योतीषाला माहीत असते, की ही बाई, आताचा शिधा सुद्धा देणार नाही. म्हणून मुलगी होईल असे साधारणत: तो म्हणतच नाही. पुरूषप्रधान संस्कृतीत आपल्याला मुलगाच व्हावा, ह्या समाजमनामुळे ज्योतीषांचे चांगलेच फावते. आणि ज्योतीष हे 100 टक्के खर नसते, हे जाणूनच, आज बरेचस सुशिक्षीत कुटूंबे, मुल होण्याच्या आधी, गर्भजल परिक्षण करतात. परिक्षणात मुलगी आढळल्यास अॅबॉर्शनही करतात. ह्यावरून हेच सिद्ध होते की विषमतावादी समाजमन हेच ज्योतीष लोकांना पोसण्याचे काम करीत असे.