अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
मी : फुले - शाहु आंबेडकरांची लढाई ही ह्या बडवेशाही विरूद्ध होती. प्रबोधनकार ठाकरेनी ‘ब्राम्हणशाही विरद्धचे बंड’ हा ग्रंथ लिहीला. हातात भाकरी खाणारे व खापरीने पाणी पिणारे महान संत श्री. गाडगेबाबा ह्यांनीहीभोळ्या भाबड्या जनतेला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी गावोगाव फिरून किर्तन केली. असेच एकदा पंढरपरला एक भटजी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भोळ्याभाबड्या जनतेला पितृश्राद्धाच्या नावाने लुबाडीत होता. गाडगेमहाराज ह्या भटजीपाशी गेले आणि म्हणाले, ‘अहो भटजी,, माझा बापही मेला आहे. त्याचे श्राद्ध करायचे आहे.’ भटजी म्हणाला - ‘श्राद्धासाठी पैसे लागतील आहेत का तुझ्यापाशी पैसे’ बाबा बोलले ‘मी गरीब माणस, पण भटजी हे अन्न जे तुम्ही इकडे तिकडे फेकतात ते कुठ जात.’ भटजी म्हणाला, ‘हे श्राद्ध करणार्यांच्या आईबापांना स्वर्गात मिळत.’ लागलीच गाडगेबाबा हया भटजीपासुन थोड्या अंतरावर बसून नदीतील पाणी इकडेतिकडे उडवु लागले आणि मुद्दामूनच जास्त पाणी ह भटजीच्या अंगावर फेकू लागले. भटजी म्हणाला, ‘अरे मुर्खा, हे पाणी असे इकेतिकडे का फेकतोस तुला दिसत नाही, तुझ्या फेकलेल्या पाण्यामुळे माझा शर्ट आणि धेातर ओले होत आहे ?’ गाडगेबाबा म्हणाले, ‘अस कस तुच धोतर ओले होतय ? मी तर पाणी माझ्या अमरावतीच्या शेतात टाकतोय झाडांसाठी.’ भटजी म्हणाले, ‘अरे मुर्खा, तु येथून पाणी फेकतोस ते अमरावतीपर्यंत कसे जाणार ?’ बाबा म्हणाले , ‘भटजी, तुम्ही फेकलेला निवद, जर स्वर्गापर्यंत लोकांच्या मायबापास्नी पोहोचू शकतो तर, अमरावती तर स्वर्गापेक्षा लय जवळच आहे. मी फेकलेल पाणी तिथपर्यंत जात नसेल का ?’ ज्या भटजीने थोड्यावेळा आधी मुर्ख म्हटले होते, त्यास आता स्वत:च्या महा मुर्खपणा लक्षात आला होता. त्यांनी आसपासच्या लोकांडून माहीती घेताच त्याला कळले, की हे महापुरूष, म्हणजे गाडगेबाबा होय. लागलीच भटजीने बांबांच पाय पकडले व आपण भोळ्याभाबड्या जनतेेला लुबाडतोय हे कबुल केले. बाबांनी अशाप्रकारे भटजीचा धार्मीक भष्ट्राचार चव्हाट्यावर आणला. गाडगे महाराजां प्रमाणेच संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ही म्हणतात
तिर्थ धोंडापाणी । देव रोकडा सज्जनी ॥
म्हणजेच तिर्थक्षेत्री धोंड्याला हळदकुंकू वाहीले की झाला देव. आणि तिर्थाला महाराज पाणी म्हणतात. खरा देव तर, रोकडा म्हणजेच पूर्णत: सज्जन माणसातच वास करीत असतो. संत रोहिदास म्हणतात.
‘मन चंगा, तो कठोतीमें गंगा’
म्हणजेच जर तुमचे मन मजबुत असेल तर वाटीतले पाणी सुद्धा गंगाजलच आहे. संत कबीर ही आपल्या दोह्यात म्हणता.
जत्रा मे फत्रा बिठाया । तिरथ बनाया पानी ॥
दुनिया भई दिवानी । पैस की धुलधनी ॥
जत्रेत काय तर फत्रा म्हणजेच फत्तर, दगड बसविलेला आहे. आणि साध्या पाण्याला तिर्थ म्हटले आहे. वेडे झालेले लोक ह्यासच देव व तिर्थ समजून आपल्या पैशाची धुळधान करतात. तर संत नामदेव म्हणतात.
धर्माचीया पायी वेडा झाला हा समाज ।
देव आणि धर्म ही भटाची उपज ॥
हा समाज धर्माच्या नावान पागल झालला आहे पण त्यास हे माहित नाही की देव आणी धर्म ही भट लोकांची निर्मीती आहे. जेणे करून त्याद्वारे ते बहुजनसमाजास लुटू शकतील.
गाडगेबाबाांच्या शैलीतच बहुजन समाजाला प्रबोधन करणारे माझे मीत्र प्रबोधनकार श्री. संजय दळवी नेहमी सांगतात, भटजीची पोर ही हुशार का ? आणी आपली पोर नापास का होतात ? अरे लेकहो आपल्या पोटच्या पोराच्या पॅटेला ठिगळ लावून चालवतात पण सत्यनारायण करता. भटजीला दक्षीणा आणी बदाम खारका देता. हेच बदाम खारीक भटजीचे पोर कुटूरकुटूर खातात आणि आमची मुल त्यांच्याकडे टुकूरटुकर बघतात. आता आम्ही हे बंद करायला हवे.
साळवी : तुम्ही देव नाही असे म्हणता मग ही सृष्टीचा कोणी निर्माण केली. ह्याची उत्तरे आहेत का तुमच्या विज्ञानापाशी. ह्या सृष्टीचा निर्माण कर्ता देवच आहे.
मी : देवाबद्दलची तुमची व्याख्याच मुळात स्पष्ट नाही. काहीतरी अस्पष्ट कल्पनेतुन देवाच्या संकल्पनेबद्दल बोलता. मग राम, कृष्ण ह्यांनी सृष्टी तर निर्माण केली नाही मग ते निश्चीतच देव नाही तुमच्याच व्याखेनुसार.
मी : तुम्ही ह्यांना देवमानस का मानता ?
साळवी : कारण त्यांच जीवन आदर्शमय आहे. वउीलांच्या आज्ञेवरून रामाने 14 वर्षाचा वनवास भोगला. एवढा आदर्श पुत्र जगाच्या पाठीवर कोठेच नाही.
मी : रामाने अशी कोणती चुक केली होती की त्याची शिक्षा म्हणून त्यास 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला.
साळवी : चुक त्यांनी केली नव्हती. चुक त्याच्या पोराला भरताला राजा बनवायाचे होते. आपल्या पोरासाठी मरोत दुसर्यांची पोर अश्या विचारांची ती स्वार्थी बाई होती. राहिला दशरथ, ह्यांनी तीन बायका केल्या होत्या. त्याच्या प्रचार कालपर्यंत आम्हाला सुसह्य होता पण आजच्या स्वातंत्र्य भारतात तीन बायका करणारा हिंदु दशरथ तुरूंगात असतो. वारंवार रामायणाच्या ह्या कथेला जनमानसात बिंबावून आम्ही काय साधणार आहोत. पुरातन काळात आदर्श मानलेली पात्र आजच्या काळातील पीढीसमोर कुठलाच आदर्श ठेवू शकत नाही.
साळवी : परंतू राम तर आदर्श होता. त्यांनी वडीलांच्या आज्ञेचा मान राखुन 14 वर्षाचा वनवास स्विकारला.
मी : ह्यात कसला आदर्श. आपण न कलेल्या चुकीची शिक्षा आपण का भोगावी ? अशा समाजात आज आम्ही राहतो आहे. काहीही चूक केली की माझ्या 5 वर्षाच्या छोट्या एकताला 10 उठाबशा काढायला लावतो. एकदा मी तिला असेच म्हटले, ‘एकता 10 उठाबशा काढ’ ती म्हणाली, ‘का ? मी कोणतीच चुक केलेली नाही ?’ मी दटावूनच म्हटले, ‘मी म्हणतोना म्हणून काढ’ मी ही उत्तरली, ‘पप्पा, मी उठाबशा काढणार नाही. मी काहीच चुक केलेली नाही.’ तिचा निर्धर पक्का होताच. मी म्हटले, ‘बेटा जीवनात असच जगायच. न केलेल्या चुकीसाठी आपण शिक्षा का भोगावी ?’ आजच्या संवैधानीक व्यवस्थेमध्ये आम्ही गुन्हाच्या आणि शिक्षेचा संबंध कायद्याद्वार जोडला आहे. कुणाचा खुन केला तर फाशीची शिक्षा होईल ह्या तर्कशास्त्रावर आधारीत कायद्यामुळेच खुन करणारा, खून करण्याच्या प्रवृत्तीपासून दूर रहातो.
वहिनी : परंतू भाऊजी राम हा देव आहे त्याबाबत आम्हास आदर असलाच पाहीजे.
मी : वहिनी राम हा एक क्षत्रिय राजा होता. एखाद्या व्यक्तीस आम्ही देव वा आदर्श तेव्हा मानतो जेव्हा त्या व्यक्तीच्या आचरणातुन वा चरित्र्यातून आम्हास चांगले बनण्याची स्फर्ती मळते. आणि म्हणूनच माझ्या मते कलानुरूप आम्ही देव, आदर्श व प्रतिकांचा बदलेल्या परिस्थीतीनुसार विश्लेषण करूनच त्यांना आदर्श देव मानयचे की नाही हे ठरवीले पाहीजे. वनवासाची आज्ञा रामाला झाली होती. तरीही त्याची प्रेमळ सहकारीणी म्हणून सीता रामासोबत वनवासासाठी निघाली. रामासाठी तीने वनवास भोगला. रामाने व लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखा हीस विद्रुप केल. खरतर त्यावेळी राम व लक्ष्मण शूर्पणखेच्या राज्यात वास्तवास होते. त्यावेळी मूलनिवासी बहुजनामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीप्रधान समाज होता. पुरूषप्रधान समाजाचे निर्माते आर्यब्राम्हण होत. राम हा पुरूषप्रधान संस्कृतीचा नायक आहे तर शर्पणखाही स्त्रीप्रधान संस्कृतीची नायीका आहे. राम हा देखणा असल्यामुळे शूर्पणखाही रामासमोर लग्नाची इच्छा बोलून दाखविली. ह्यात काहीच वावगे नाही. राम म्हणाला, ‘माझे लग्न झाले आहे, तु माझ्या छोटा भाऊ लक्ष्मणास विचार.’ खरं तर राम खोटा बोलला होता; त्यास माहीत होते की लक्ष्मणाचेही लग्न झालेले आहे म्हणून तो शर्पणखेस सरळ सांगू शकला असता की, ‘बाई तू येथुन निघन जा’ पण रामाने तसे केले नाही. ह्याही पेक्षा जेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेस विद्रुप केले. शूर्पणखा ही आमच्या स्त्रीप्रधान मुलनिवासी बहुजन समाजाची बहीण आहे. आपल्या बहीणीस अशी हीन दर्जाची वागणूक दिलयावर रक्त खचळणार नाही असा कोण भाऊ असु शकतो. आजच्या हिंदी सिनेमाच्या डॉयलॉग बाजीत म्हणायचे झाल्यास, शूर्पणखेचा भाऊ, रावण म्हणाला, ‘मेरी बहन को हात लगाने वालो, मै तुम्हारी बीबी को उठाके लेके जाता हुँ.’ रावणाने सीतीचे अपहरण केले. पण रावण सज्जन होता. त्याने कुठल्याच प्रकारचा, गैेर व्यवहार सीतासोबत केला नाही. प्रेमळ व संदर दिसणार्या सीतेस े फक्त विनवणी केली, ‘हे सीते, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला पट्टराणी बनवील’, आणि निर्णय त्याने सीतेवर सोडून दिला. खरं तर सीतेने जर रावणाचे म्हणने ऐकुन घेतले असते, तर ती त्या सुवर्णनगरीची सम्राज्ञी बनली असती. पण रामाच्या प्रेमा पुढे तीला हे साम्राज्य तुच्छ वाटले. अशोक वनात दिवसरात्र पतीचा ध्यास करीत ती बसून राहीली. परंतू मुक्त झालेल्या सतीच्याबद्दल,. जेव्हा एक नागरिक शंका उपस्थित करतो, तर हाच राम, त्या नागरिकाचे निमीत्त समोर करून, आपल्या मनातील शंकेला तिच्यापुढे मांडतो. सीतेने रावणाच्या राज्यतही आपल चारित्र्य जपलले असते. तरीही रामाच्या समाधानासाठी ती अग्नीपरिक्षेच्या दिव्यातून बाहेर निघते. पण तरीही रामाच्य मनातील शंका तशीच आहे, असे तीला वाटते, तेव्हा ती आत्महात्या करते. ह्यास रामायणात धरती फाटते व सीता त्यात समावून जाते असे म्हटले आहे. राम हा मागासलेल्या, शंकेखोर पुरषप्रधान संस्कतीचा नायक आहे आणि सीता ही पतीच्या प्रेमासाठी सुवर्णलंका नाकारणारी, सम्राज्ञीपद नाकारणारी, पतीच्या विश्वासासाठी अग्नीपरीक्षा देणारी. शेवटी स्वत:स नष्ट करुन देणारी सर्वोत्कृष्ठ आदर्श नायीका आहे. जेव्हा रामास वनवास झाला, तेव्हा सीता त्याच्यापाठीशी पहाडासारखी उभी राहिली, परंंतू जेव्हा सीतेस रामाची गरज होती, त्यावेळेस रामातील राम नष्ट झाला होता. रामायणात आदर्श वाटते ती रावणाची पत्नी मंदोदरी. ती आपल्या पतीला म्हणते, ‘अहो, त्या रामाने तुमच्या बहीणीचा अपमान केला आहे, त्यासाठी तुम्ही सीतेला का शिक्षा देता ? सोडून द्या त्या स्त्रीला.’ शत्रूपक्षातील तरी असली तरी ती एक स्त्री आहे, ह्याबदलचा कळवळा असणारी, मंदोदरी ही मला श्रेष्ठ वाटते.
साळवी : एक शेवटचा प्रश्न. बालपणीच्या संस्कारातील देवाची भक्ती जीवनभर आमच्या मनात का रहाते ?
मी : मनुष्याच्या मनात देवाची कल्पना साधारणत: दोन कारणामुळे राहते. 1. इच्छा आणि 2. भिती इच्छा : उदाहरणार्थ,. देव मला चांगली नोकरी लागू दे. हयावर उपाय आहे अथक प्रयत्न भिती : दोन प्रकारची असते. 1. स्वभावीक भिती : उदाहरणार्थ, आईस वाटते आपले बाळ आजारी पडू नये, म्हणून ती म्हणते, ‘देवा, माझा बाळ आजारी पडू देऊ नको.’ ह्यावर उपाय आहे, काळजी व व्यव्स्थीतपणे बाळाचा सांभळ करणे. 2. स्वयनिर्मीत भिती: उदाहरणार्थ, भ्रष्टाचार केलेल्या आधिकार्याने देवास म्हणने, ‘देवा माझा भ्रष्टाचार बाहेर पडू देऊ नकोस ह्यावर उपाय आहे, एकतर व्यक्तीने, असले वाईट कृत्यन करणे किंवा सरकारने सशक्त कायद्याची व्यवस्था राबवीणे. इच्छा आणी स्वाभावी भीतीतून देवास माननारे समाजास तेवढे घातक नसतात. अज्ञानामुळे प्रयत्नात व योजनेत स्वत:बाबत कमी पडतात. परंतू स्वनिर्मीत भितीतून देवाला माननारे समाजास तेवढे घातक नसतात. अज्ञानामुळे प्रयत्नात व योजनेत स्वत:बाबत कमी पडता. परंतू स्वनिर्मीत भितीतून देवाला माननारे, अतिशय दांभिक व समाजाचे खरे शत्रु असतात. देवाच्या नवावर समाजाचे शोषण करणारे हे दानव होत. भ्रष्ट्राचाराच्या रकमेतुन मंडळी समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरतात. हे प्रतिष्ठीत समाजातील सर्वात मोठी घाण आहे. ह्यांच्यापासून देशाला वाचवीले पाहिजे.
साळवी : ढोबळेसाहेब आज आमच्याकडे येऊन आम्हास खुपच प्रबोधीत केले आहे. सामाजीक, धर्मीक व राजकीय घडामोडीकडे एक नवीनच कोन बघण्याचे धारीष्ट्य दिले आहे. आज आमच्या खर्या अर्थाने सत्यनारायणाची नव्हे, सत्याची पूजा झाली आहे. आणि एकदाका सत्याची पूजा केली की सत्यनारायणाची कथा करण्यांची गरज भासणार नाही हे ही आमच्या ध्यानात आले आहे.