अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
साळवी : पण संकटाला प्रसंगी देवच धावुन येतो हे सत्य आहे की ?
मी : हे सत्य हिंदी फिल्मला लागु होते. काहीच दिवसापुर्वी टि.व्ही वर कुणीकाचा, ‘स्ट्राईवहर्स व अचिव्हर्स’, हा टॉक शो बघत होतो. निनू केवलानी ह्या पोलीओग्रस्त महिलेची मुलाखत सुरू होती. मुलाखती दरम्यान ह्या मुलीचे वडील म्हणाले, ‘आमच्या निनूला पोलीओ झाला, हे आम्हाला वर्षातच माहीत झाले, माहीत झाल्यावर पोलीओ दुरूस्त होण्यासाठी आम्ही भारतभरातील मंदीर, मस्जीद, गुरूद्वार व चर्च पालथे घातले. परंतु निनुच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही. शेवटी आम्ही सत्य स्विकिृत केले की, मंदीर - मस्जिद, चर्च फिरण्याऐवजी आता आहे त्या स्थितीतच आपल्याा मुलीला मोठी व्यक्ती बनवावी. आम्ही तसे प्रयत्न केले.’ मोठ्या गर्वाने निनुचे वडील म्हणाले, ‘आज आमची निनू ग्रॅज्युएट आहे, कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे. तिला चांगले संगीत येते व ती सोशल वर्करही आहे.’
आपण देवळात गेलो की देव आपले रक्षण करील असे बर्याच भाविकांना वाटते पण ते तसे आहे का ? शिर्डी आणि शेगावला दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या गाड्यांचेही अपघात होतातच, हे आम्ही बर्याचदा वृत्तपत्रात वाचीत असतो. आताच, नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी माझी सासु, हनुमानाच्या दर्शनासाठी रांगेत लागली होती. माझ्या साल्यांनी तिला सांगीतले की गर्दी खुप असल्यामुळे दर्शन टाळलेल बरे. पण तिने काही ऐकले नाही. आण तिच्या गळ्यातील गळकंठी वर चोराने हात साफ केला.
साळवी : मग ह्यात तुम्ही देवाला दोष देता का ?
मी : मी तसे बोललो का ? मी आपल्याला सांगितले की देवळातही चोरी होते. समाजात फोफावलेल्या बेकारी व बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्थ झालेल्या तरूणांच्या डोक्यात, देवळात चोरी करतांना ही, कुठलेच भय निर्माण होत नाही. उलटे, त्याला ही जागा, हात साफ करायला, सोयीची वाटते. एखाद्या वेळेस तो विचार करीत असेल, की मी एवढा शिकलेलो पण मला नोकरीही लागत नाही. मग काय करतो हा देव ? हा भाव निर्माण होऊन नवयुवक त्वेषाने इथेच हात साफ करीत असतील. समाजात वाढणार्या चोर्यामार्यासाठी कारण आहे वाढणारी बेरोजगारी आणि ह्याचे उत्तर आपल्याला कुठल्याच देवळात नव्हे तर सामाजीक व्यवस्थेत शोधावे लागेल. ह्यासाठी समाजातील सर्व स्तराच्या व वर्गाच्या लोकांच्या सामुहीक प्रयत्नांची गरज आहे.
साळवी : ढोबळे साहेब, आम्ही सतगुरू सदानंद महाराजांचे भक्त आहोत प्रत्येक गुरूवारी त्यांचा सतसंग चालतो.
मी : म्हणजे प्रत्येक गुरूवारी सदानंद महाराज सत्संगासाठी उपस्थित असतात का ?
साळवी : तसे नाही. मी अजुनपर्यंत महाराजांना बघीतले नाही. महाराजांचे भक्त सांगतात की कधी महाराज अमेरिकेत आहेत तर कधी स्वित्झरलंडला.
मी : म्हणजे हे महाराज नेहमी परदेशी दौर्यावर असतत का ?
साळवी : होय. फार मोठे महाराज आहेत. त्यांचा इथला कार्यभाग त्यांचा शिष्यसंप्रदायच सांभाळतो.
मी : पण ह्या महाराजांना एवढ्या महागड्या विदेश दौर्याचा खर्च कसा काय झेपतो.
साळवी : ह्यासाठी भक्तगणांकडून ते देणगी गोळा करतात. त्यांचे शिष्यत्व पत्कारायच्या अभिषेकासाठी प्रत्येकी 500 रू. द्यावे लागतात. मी माझ्या पत्नीसमवेत शिष्यत्व पत्करण्यासाठी फार आधीपासुन अपॉईटमेंट घेतली होती. आणि त्यातही प्रत्येकालाच महाराज शिष्यत्व देत नाही. मी नशिबवान म्हणुन, मला शिष्यत्व भेटले. त्यासाठी त्यांच्या शिष्यसंप्रदायातील एका शिष्याला मी दान म्हणून, आधीच एक हजार रूपये देऊ केले होते. खर सांगायच म्हणजे शिष्यत्व द्यायचे की नाही हे त्यांच शिष्यसंप्रदायातील लोक ठरवीत असतात.
मी : खरं तर तुम्ही दिलेल 1000 रू. दान नव्हे, लाच होय. असु द्या. पण तरीही शिष्यत्व देण्यासाठी महाराजांना कुठून वेळ.
साळवी : महाराज फार मोठ आहेत. माझ्या सारख्या शुद्र व्यक्तीला शिष्यत्व देण्यासाठी महाराजांना कुठून वेळ. त्यांचे शिष्यत्व मिळाले. हेच मी माझे परम भाग्य समजतो.
मी : साळवी वाईट वाटून घेऊ नका. पण तुमच्या सारख्या भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धा की, शिष्यत्व मिळणे म्हणजेच महतभाग्य, ह्यातून दर माणसी 500 रू. वसुली व शिष्यत्व मिळेल की नाही ? ह्या भितीतून त्यांच्या शिष्याच्या हातात ठेवलले हजार रूपये, ह्यातून ह्या महाराजांचे खरे म्हणजे विदेशवारीचे खर्च निघतात. आपल्यासारखे अनेक महाभाग अशा प्रकारे खुले आम स्वत:स लुटू देतात. ह्यातून त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस येतो.
साळवी : आपण काय बोलता आहो. माझ्या महाराजांचा अपमान करता. त्यांचे शिष्यत्व मिळविण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतात. दिवसाला कमीतकमी 500 भक्त तरी त्यांचे शिष्यत्व असतात.
मी : 500 भक्त रोजचे आणि प्रत्येक भक्तास शिष्यत्व म्हणजे 500 रु. म्हणजे दिवसाकाठी 500 गुणीले 500 = 250000. बापरे अडीच लाख रू. अहो काहीच काम न करता, दिवसाला निव्वळ अडीच लाख रू. फायदा देणारा, कोणता धंदा असू शकतो ? अडीच लाख गुणीले 30 = 75 लाख, पाऊण कोटी रुपये महिन्याचे उत्पन्न.
साळवी : साहेब, महाराजांमध्ये निश्चित काहीतरी दैविक शक्ती असते त्याशिवाय का एवढे लाखो लोक त्यांना मानतात.
मी. : आपण सदानंद महाराजांकडे आकर्षित कसे झालात ?
साळवी : आमचे शेजारी श्री. देशपांडे ह्यांनी सर्वात आधी मला महाराजाबद्दल माहीती दिली. त्यानीच सांगीतले की महाराज अतिशय दैविक आहेत. ते म्हणाले एकदा तुम्ही त्यांचे दर्शन घ्याच.
मी : बरोबर आहे. महाराजांकडे घेऊन जाणारा एखादा देशपांडे वा पोतदारच आसेल. एखादा कांबळे वा मेश्राम तुम्हाला महाराजांकडे घेऊन जाणार नाही. बाबासाहेबांच्या विचारक्रांतीतून कांबळे व मेश्राम आधीच जागे झाले आहे. आमचा ओबीसी वर्ग केव्हा जागा होईल ? कांबळे व मेश्राम बाबा महाराजांना फक्त नाकारतच नाही तर त्यांच्यातील एक उत्तम कांबळे या बाबाबुवांचा समाचार घेण्यासाठी ग्रंथच लिहतो, ‘कुंभमेळा, साधुंचा की संधीसाधूंचा’ असो.
मी : पण महाराजात दैवकि शक्ती आहे ह्याची प्रचिती तुम्हास कशी आली.
साळवी : देशपांडे सोबत जेव्हा मी एकदा महाराजांच्या दर्शनासाठी गेलो, तेव्हा त्यांचे भक्तसंप्रदायातील लोकाकडून मी महाराजांच्या दैविक शक्तीबद्दल ऐकल.
मी : तुम्ही त्यांच्या भक्तांकडून काय ऐकल.
साळवी ः त्यांचे भक्त म्हणत होते की महाराजांच्या आर्शाीवार्दाने बरेच लुळेलंगडे चालायला लागले, बर्याच लोकांचा तर कॅन्सरसारखा रोग ही दुरूस्त झाला.
मी : एखादा लुळापांगळा चालायला लागला वा एखादा कॅन्सरचा बरा झालेल्या रोग्यास आपण स्वत: भेटले आहात का ?
साळवी : नाही. पण अशा एखाद्या व्यक्तीचा शोध घेणे, म्हणजे महाराजांवर अविश्वास दाखविण्यासारखे नव्हे का ?
मी : ह्यात अविश्वास दाखविण्यासारखे काय आहे ? पण तुम्हास तसे करणे म्हणजे, महाराजांवर अविश्वास ठेवल्यासारखे वाटते. सत्य शोधुन काढण्याची तुमची प्रवृत्ती नष्ट झाली आहे. आणी सत्य शोधनाची प्रवृत्ती नष्ट होणे म्हणजेच बुध्दी गहाण ठेवणे होय. साळवीसाहेब बुध्दीचा वापर करणे शिका ज्या निर्मीकाने तुम्हास निर्माण केले आहे त्यांनेच, ह्या निर्मितीत बुध्दी नावाची एक महाशक्ती ही आम्हास प्रदान केली आहे. ह्या बुद्धीमुळेच माणूस हा इतर सर्व प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धीमुळेच त्याने विज्ञानाचे नवनवे शोध लावले व नवनवीन संस्कृत्या निर्माण केल्या. ह्या बुद्धीचा उपयोग वा प्रयोग न करणे हा त्या निर्मीकांचा अपमान करण्यासारखे आहे, हे तर तुम्ही निश्चितच मानाल. ह्या बाबामहाराजांपेक्षा आपला निर्मीक हा फार मोठा आहे.
साळवी : हो निश्चितच
मी : मग जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग वा प्रयोग करत नाही त्यावेळेस तुम्ही निर्मिकावर अविश्वास ठेवत असता आणि निर्मीकावरील अविश्वासाच्या पापाचे धनी होत असता.