Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आरक्षणाची पोटदुखी

(देशमुख आत येतात.)   

 देशमुख : तुमची काय चर्चा सुरु आहे ? 
 
 जोशी : आम्ही जरा जातीव्यवस्थेची चिरफाड करतोय. का 
 
 देशमुख : अहो ही वेळ जातीपातीची चर्चा करण्याची नव्हे. अकरा वाजता सोसायटीची मिटींग आहे. त्याबद्दल बोलूया. 
 
 जोशी : नाही. आमची व्यवस्था परिवर्तनाची चर्चा सुरु आहे. तुम्हाला इंटरेस्ट नसल्यास तुम्ही निघु शकता. 
 
 देशमुख : अस कस म्हणता. मला ही समाजसेवेची खूप हौस आहे. मी ही घेतोना चर्चेत भाग. बोला. 
 
 जोशी : मग शर्त ही आहे की तुम्ही आधी सांगा, तुम्ही ब्राम्हणवादी आहात की बहुजनवादी.माणात 
 
 देशमुख :
ते काही मला समजत नाही. सरळ साधं विचारा. हाला मान 
 
 जोशी : अहो देशमुख तुमची जात कोणती? 
 
 देशमुख : कुणबी
 
 मी : म्हणजेच ओबीसी 
 
 देशमुख :
होय पण ओबीसीत आमची जात सर्वात वर. असं म्हणा की आम्ही ओबीसीतले ब्राम्हणच. 
 
 मी :
धन्यवाद देशमुख. जोशीनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अतिशय सोप करून दिलं. 
 
 जोशी : ते कसे ?

Aarakshan acchi potdukhi मी : जोशी ब्राम्हणी व्यवस्थेचा मूळ आधार जातीय व्यवस्था आहे. ही व्यवस्था लोकांना जातीत विभागते. पण ह्या जातींनाही ती समसमान स्थानावर ठेवत नाही तर एका जातीला दुसऱ्या जातीच्या वर वा खाली ठेवते. बाबासाहेबांनी ह्या विभागणीला क्रमीक असमानता असे म्हटले आहे. बाबासाहेबांनी म्हटले आहे ' ब्राम्हणी जातीय व्यवस्था ही एक इमारत आहे. ह्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ब्राम्हण आहेत तर खालच्या मजल्यावर मांग, अस्पृश्य. ह्या इमारतीला वर खाली यायला जायला पायऱ्या नाहीत. जो ज्या जातीच्या मजल्यावर जन्म घेतो, त्याने मग कितीही चांगले काम केले तरी तो वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही व एखाद्याने कितीही निच काम केले तरी त्याला खालच्या मजल्यावर ढकलता येत नाही. ज्याला त्याला त्याच्याच मजल्यावर मरावे लागते.' ह्या व्यवस्थेत सामाजिक उत्कर्षाचा अभाव आहे आणि म्हणूनच ही इमारत ताबडतोब पाडली पाहीजे. संत रामदासासारखा संतही ह्या व्यवस्थेचा बळी पडून म्हणाला,
 
 

'जरी झाला भ्रष्ट । तरी ब्राम्हण तिन्ही लोकी श्रेष्ठ।।' 

संत तुलसीदास सुद्धा रामचरितमानस मध्ये म्हणतात. 

ढोल गवार शूद्र पशु नारी । ये सब ताडनके अधिकारी ।। 

जर ब्राम्हण संताची ही स्थिती तर सर्वसामान्य ब्राम्हणांची बहुजनाप्रती काय वागणूक असणार? ह्या देशात आजही मनुष्याचा सामाजीक दर्जा त्यांच्या जातीनुसार ठरतो. सामाजिक संदर्भ बदलत आहेत पण सामाजिक दर्जाची इमारत पाहीजे त्या गतीने ढासळत नाही. म्हणूनच जोशीसाहेब देशमुख तुमच्यासमोर जात सांगायला कचरत होते. पण तेच कांबळेसमोर मान ऐलावून म्हणतात आम्ही कुणबी-पाटील आहोत. ठीक ना देशमुख साहेब. 

देशमुख : तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे ढोबळेसाहेब. आपण जात पात मानत नाही अस म्हणतो, पण मनात ते आपल्या असतच. आपल्या वागण्यातून जोपर्यंत आपण जात पात घालवत नाही, ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. आपण आजही माणसांच्या गरजांपेक्षा, त्यांच्या आर्थीक दर्जापेक्षा, त्यांचा जातीय दर्जाला उगाच अधिक महत्व देतो आणि समाजात जातीय तेढ निर्माण करतो. माझ्या हातून होणाऱ्या एका मोठया चुकीतून तुम्ही मला वाचवल. 

मी : कोणती चूक बाबा ? 

देशमुख : सानपाड्याला माझा अजून एक फ्लॅट आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तो भाड्यानी द्यायचा आहे. त्यासाठी काल दोघेजण भाड्यानी मागायला आले होते. एक होता कुळकर्णी. पगाार ५ हजार रुपये. महिंद्रला क्लर्क. सध्या बायकोसहीत त्याच्या वाशीच्या मावशीकडे राहतोय. दुसरा होता मेश्राम. पगार ८ हजार रुपये. इन्कमटॅक्स इन्सपेक्टर. बदलीवर आलाय. सध्या दादरला लॉजमध्ये थांबलाय. तातडीने त्याला घर हवय, पण मी म्हटल घर कुळकर्णीलाच द्यायच. मेश्राम अतिशय हतबल होउन बोलत होता, 'अहो माझ ह्या मुंबईत कोणीच नाही. फार उपकार होतील'. माझी बायकोही म्हणाली,' अहो हा मेश्राम अतिशय गरजू वाटतो आणि पगार कुलकरण्‍यापेक्षाही जास्त आहे. किराया देण्याच्या दृष्टीने जास्त पगारवाला कधी महिना बुडविणार नाही. पण मी म्हटले, नाही. घर कुळकर्णीलाच द्यायच.'  पण ढोबळे मला अस वाटतय, मी चुकतोय. मेश्रामच्या तातडीच्या गरजेपेक्षा मी  कुळकर्ण्‍याच्‍या सामाजिक जातीय दर्जाला कुठेतरी जास्त महत्व देऊन निर्णय घेतोय, अस मला वाटतयं. आता थोड्याच वेळात ते दोघेही येतील. मी घर मेश्रामला किरायानी देतो आणि कुळकर्णीला क्षमा मागतो. येतो मी. 

मी : जोशी, आता तुम्हाला कळलेच असेल. देशमुखचा निर्णय  हा जातीला सामाजिक दर्जा मानुनच घेतलेला निर्णय होतो. ह्या निर्णयात माणुसकीचा अभाव होता. 

जोशी : ज्याला निकडीची गरज आहे त्यालाच देशमुखनी फ्लॅट भाड्याने द्यायला हवा. पण मी मात्र जातपात मुळीच मानत नाही. ढोबळे साहेब, आम्ही तर सर्वांना आव्हान करतो. आपण हिंदु म्हणून एक झालो पाहीजे. "गर्व से कहो हम हिंदु है!' आम्ही आता आपआपल्या जातीचा विसर पाडायला पाहीजे आणि हिंदु म्हणून एक व्हायला पाहीजे. हे हिंदु राष्ट्र व्हायला पाहीजे. 

मी : व्हायला पाहीजे म्हणजे! मुळातच हे 'हिंदु राष्ट्र'च आहे. ह्या भारतात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदुच आहे. ह्या भौगोलीक प्रदेशात सिंध नदी वाहते. सिंधचा अपभ्रंश हिंद झाला असे म्हणतात. ह्या नदीच्या आसपास राहणारे लोक म्हणजेच हिंदु आणि म्हणूनच ह्या प्रदेशाला जसे भारत म्हणूनही ओळखले जाते, तसे हिंदुस्थान म्हणूनही ओळखले जाते.

जोशी : अहो आपण हिंदु धर्मीयना, त्या अनुषंगाने मी हिंदु राष्ट्र म्हणतोय. 

मी : अहो मग त्या अनुषंगानेही हे हिंदुच राष्ट्र आहे. ह्या देशाचे आतापर्यंतचे सर्वच पंतप्रधान हिंदु धर्मीयच राहीले आहेत. आजही जवळजवळ सर्व प्रांताचे मुख्यमंत्री हे हिंदुच आहेत. पण तुमच्या मनात कोणते हिंदु आहेत ते ओळखायला लागलोय आम्ही. तुमची मजबुरी आहे की, जे पोटात आहे ते तम्ही ओठात आण शकत नाही. कारण ह्यासाठी ह्या देशाची लोकशाही जिम्मेदार आहे. मंत्रीमंडळातील ९५ टक्के च्यावर मंत्री हिंदुच असतात. एखाद दुसरा परधर्मीय असला तरी तो विशेष काही फरक पाडू शकत नाही, कारण मंत्रीमंडळाचे निर्णय हे सामुहिकरित्या घेतले जातात. त्यात एकट दुकट मंत्री काय विशेष फरक पाडणार ? 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209