Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आरक्षणाची पोटदुखी

जोशी : ब्राम्हणवादी ! म्हणजे तुम्ही मला तर म्हणत नाही ना ? 

मी : त्याचे ते तुम्हीच ठरवायचे आहे. पण एवढं निश्चित प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही. ब्राम्हणवाद ही एक सामाजीक व्यवस्था आहे. पूर्वकालीन ब्राम्हणांनी समाजात आपले स्थान सर्वश्रेष्ठ राहावे ह्यासाठी निरनिराळया स्मृती, पोथ्या, पुराणाच्या माध्यमातून विषमतावादी साहित्य निर्माण करून विषमतावादी समाज निर्माण केला. त्याकाळी शिक्षण देण्या-घेण्याचे आरक्षण त्यांनी स्वत:पुरतेच मर्यादित केले होते. ह्या विषमतावादी व्यवस्थेचे मुख्य निर्माते पूर्वकालीन ब्राम्हण असल्यामुळे ह्या व्यवस्थेला ब्राम्हणवादी व्यवस्था म्हणतात. मनु नावाच्या एका अमानवीय वृत्तीच्या ब्राम्हणाने ह्या विषमतावादी समाजाचे माणुसकीला काळीमा फासणारे कायदे व नियम 'मनुस्मृती' ह्या ग्रंथात लिखाणबद्ध केले, त्यामूळे कधीकधी ह्या व्यवस्थेला मनुवादी व्यवस्था असेही म्हणतात. आपणास माहीतच आहे की डॉ. बाबासाहेबांनी १९२७ ला म्हणूनच मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन हे विषमतावादी व्यवस्थेचे प्रतिकात्मक दहन होते. विषमतावादी मनुस्मृतीचे दहन केल्यावर समतावादी स्मृती लिहण्याची जबाबदारीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर स्वाभावीकपणे लादल्या गेली. 


जोशी : आंबेडकरांनी ती जबाबदारी पार पाडली का ? 

मी : होय डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव असलेली भारतीय राज्यघटना लिहून ही जबाबदारी पार पाडली. 

जोशी : माझ्या माहीतीनुसार मनु हा समाजशास्त्रीय तत्ववेत्ता होता. त्यांनी लिहलेली मनुस्मृती विषमतावादी होती हे तुम्ही दाव्याने कसे म्हणू शकता  ? 

मी : त्यासाठी मनुस्मृतीचेच दाखले मी तुम्हाला देऊ इच्छितो.

शतं ब्राम्हणमाय क्षत्रियो दण्डमर्हती ।
वैश्योऽप्यर्धशतं द्वे वा शूद्रस्तु वधमर्हति ।। 

म्हणजेच ब्राम्हणाला उद्देशुन अपशब्द उच्चारल्यास क्षत्रियास १०० पण दंड, वैश्यास १५० किंवा २०० पण दंड आकारावा तर शुद्रास वध हीच शिक्षा योग्य आहे.  

अब्राम्हण: संग्रहणे प्राणान्तं दण्डमहती ।
चातुर्णामपि वर्णानां दारा रक्ष्यतमाः सदा ।। 

म्हणजेच ब्राम्हणेतराने परस्त्री बरोबर कामक्रीडा केली तर त्यास देहान्ताची सजा द्यावी. परंतु ब्राम्हणाला हे लागू नाही. चारही वर्णातील स्त्रीयांचे नेहमी रक्षण झाले पाहिजे. 

शक्तेनापि हि शुद्रेण न कार्यो धनसंचयः।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राम्हणानेव बाधते ।। 

म्हणजेच शक्ती असताही शुद्राने धनसंचय करू नये, कारण की शुद्राने धन जमा केल्यास ते ब्राम्हणास बाधते वा त्रासदायक ठरते. जोशीसाहेब ह्या दाखल्यावरून तुम्ही मान्य करणारनं की मनुस्मृती विषमतावादी होती. 


जोशी : खरे आहे. पण ढोबळे, तुम्ही म्हणालात प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही. ह्याचा अर्थ काय ?

Aarakshan acchi potdukhi  मी : आमच्या देशात मागील हजारो वर्षापासून ब्राम्हणवादी व्यवस्था कार्यरत आहे. ह्या व्यवस्थेमुळे ब्राम्हण जात उच्च मानल्या जाते, तर महार, मांग, चांभार ह्या जाती खालच्या मानल्या जातात. त्यामुळे ब्राम्हण आपला शैक्षणीक, सामाजिक व आध्यात्मिक विकास करू शकला. पण ह्याच सवलती महार-मांगाना, तेल्या-कुणब्यांना नाकारण्यात आल्या. ब्राम्हणांना ही व्यवस्था फायद्याची असल्यामुळे ते ही व्यवस्था टिकवण्यासाठी राबले तर बहुजनांना ही व्यवस्था तोटयाची असल्यामूळे ते ही व्यवस्था भंग करण्यासाठी लढले. ह्याच लढाईत आमचा भारतीय समाज शतकानुशतके गुरफटून पडला आणि आम्ही सातत्याने परकियांचे गुलाम बनत राहीलो. प्रत्येक माणूस तो कोणत्या जातीत जन्म घेतो, धर्मात जन्म घेतो ह्यापेक्षा तो माणूस म्हणून जन्म घेतो व त्याकडे माणूस म्हणूनच बघितले पाहीजे हा सरळ व साधा विचार आम्ही भारतीय पचनी पाडू शकलो नाही. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, वीर सावरकर ह्यासारखे उच्च प्रतीची प्रतिभा असणारे महान व्यक्तीमत्वांना सुद्धा ह्या लढाईत आपला वेळ घालवावा लागला. जर समतावादी व्यवस्था ह्या महापुरुषांच्या आधीच समाजात निर्माण असती तर बहुधा महात्मा फुलेंनी महारमांग मुलांची व मुलींची शाळा काढण्याऐवजी एखादी तांत्रिक प्रयोगशाळा काढली असती व सत्यशोधक समाजाचा शोध लावण्याऐवजी टी.व्ही.चा शोध लावला असता. लोकमान्य टिळक तर अतिशय प्रखर व तेजस्वी बुद्धीचे होते. त्यांनीही 'जो वेदाला प्रमाण मानतो तोच हिंदु' ह्यासारखे घोषवाक्य देण्याऐवजी गणितातील एखादे नवीन प्रमेय शोधून काढून स्वत:स आंतराष्ट्रीय दर्जाचा गणिततज्ञ म्हणून मान मिळविला असता व देशाची मानही गर्वाने उंचावली असती. डॉ. आंबेडकरांसारखा एका महाराच्या घरात जन्म घेतलेला पोरगा वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठात आपला पी. एच.डी.चा थेसीस वाचतो. समतावादी व्यवस्था असती तर हाच प्रखर पांडित्य असलेला तरुण बहुधा नुक्लीअर फिजीक्सचा जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ ठरला असता. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी लावलेल्या अणुशक्तीच्या संशोधनातून अमेरिका नंबर १ ची जागतिक शक्ती बनली आहे. बहुधा त्या ठिकाणी आम्ही स्वत:स प्रस्थापित करू शकलो असतो. ब्राम्हणवादी व्यवस्था फक्त ब्राम्हणातूनच शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते निर्माण होउ शकते असे मानते आणि त्यामुळे बहुजन समाजातून निर्माण होऊ शकणाऱ्या कितीतरी न्युटन, आइन्सटाइनच्या बळी ह्या व्यवस्थेने घेतला आहे. भारत स्वतंत्र झाला. समताधिष्ठित भारतीय राज्यघटना या देशात लागू झाली. शैक्षणिक, सामाजीक क्षेत्रात बहजनांना वाव मिळाला. म्हणूनच २०००-०१ वर्षीच्या बारावीच्या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम मेरिट येण्याचा मान श्री. मदन नागरगोजे ह्या मागासवर्गीय दलीत विद्यार्थ्याने मिळविला. ब्राम्हणवादी व्यवस्थेने असे कितीतरी नागरगोजे पायदळी तुडविले असतील व भविष्यात असे होऊ नये ह्याची काळजी आता सर्वांनीच घेतली पाहिजे आरक्षणाच्या माध्यमातून दलीत-आदिवासींना संधी मिळाली आणि त्यातूनच मदन नागरगोजे निर्मीत झाला. कोळशाच्या खाणीतही बराच काळ व पैसा गुंतवावा लागतो तेव्हा कुठे एखादा हिरा हाती लागतो. मग आम्हाला तर ह्या राष्ट्रातील अनेक हिरे शोधून काढायचे आहे, जे हजारो वर्ष निरर्थक म्हणून पायदळी तुडवल्या गेले. बीज कितीही शक्तीशाली असेल पण त्यालाही जमीनीचे घर व पाण्याची साथ द्यावी लागते, तेव्हाच त्याच्यातून एक मोठा वृक्ष निर्माण होतो. येथे तर बहुजन समाजातील पिढयानपिढया शिक्षणापासून दूर ठेवण्यात आल्या. त्यांना संधीची निश्चित गरज आहे. जोशीसाहेब दलीत-आदिवासी व मागासवर्गियांना विशेष संधी व सवलती देण्यात याव्या हे आतातरी तुम्हाला पटतय का ? 

जोशी : काही अंशी तुमच म्हणणे खरे आहे. मला पटतयं. 

मी : मग जेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे पटेल आणि एक समतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा आमच्या प्रयत्नात तुम्हीही सामील व्हाल, त्यावेळेस तुम्ही ब्राम्हण असणार पण ब्राम्हणवादी नसणार. 

जोशी : जे ब्राम्हणवादी नाहीत त्यांना तुम्ही काय म्हणाल ? 

मी : जे ब्राम्हणवादी नाहीत ते समतावादी वा बहुजनवादी. ब्राम्हणवादी व्यवस्थेवर सर्वप्रथम ऐतिहासीक हल्ला चढविणारा महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धाने घोषवाक्य दिलय – 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!' त्या काळी ब्राम्हणी व्यवस्थेमुळे नाडला जाणारा वर्ग होता शुद्र-अतिशुद्राचा. हा वर्ग सन्मानाने जगू शकेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी ही बुद्धाची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे त्याकाळी बुद्धाने मानलेल्या लोकांनाच आपण बहुजन म्हणू शकतो.

जोशी : आजच्या रुढ झालेल्या नामावलीनुसार बहुजन कोण ? 

मी : भारतीय समाजातील दलित, आदिवासी व मागासवर्गिय ओबीसी मराठा हे बहुजन होत. 

जोशी : ही सर्व बहुजन मंडळी बहुजनवादी विचार सरणीचीच असते काय ? 

मी : असेही नाही. ज्याप्रमाणे प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक बहुजन हा बहुजनवादी असतोच असे ही नाही ? 

जोशी : हे जरा विस्ताराने समजवाल काय? हे बघा देशमुख साहेब पण आले आहेत. या देशमुख.


 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209