मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
येथवर धर्मांतर विरोधकांनी जा कारणे पुढे केलेला आहेत त्या कारणांचा विचार केला आहे. आता धर्मांतर विषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका प्रदर्शित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल, असा बऱ्याचशा महार लोकांना बाऊ वाटत आहे, असे माझ्या कानी आले आहे. वरिष्ठ जातीतील धर्मांतर विरुद्ध लोकांना तुम्ही धर्मांतर केले तर तुमच्या महारक्या जातील, अशी भीती गावोगावी महार लोकांना घातल्याचे माझ्या कानी आले आहे. महारक्या गेला तर मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही हि गोष्ट तुम्हा सर्वाना माहित आहे. महारांना अघोगतीस नेणारी ज़र दलाली एखादी बाब असेल तर ती महारकी होय. हे माझे मत गेल्या दहा वर्षापासून लोकांपुढे मी मांडीत आलो आले आणि ज्या दिवशी या महारकीच्या बेडीतून तुमचा सुटका होईल ल्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला असे मी समजेन. परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांना मी एवढेच आश्वासन देऊ शकतो कि धर्मांतरामुळे महारकी वतनाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू शकत नाही. या बाबतीत सन १८५० खालच्या कायद्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाच्या केवल त्याने धर्मांतर केले तेवढयाच कारणामुळे वारसाच्या अगर मालमत्तेच्या कोणत्याही अधिकारास बाध येऊ शकत नाही. ज्यांना कायद्याचा आधार पुरेसा वाटत नसेल त्यांना नगर जिल्हयातील परिस्थिती विचारात घ्यावी. नगर जिल्हयातील पुष्कळ महार ख्रिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे ख्रिस्ती आहेत व काही महारच राहिले आहेत. तथापि जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांचा वतना वरचा हक्क नाहीसा झाला नाही याचा दाखला नगरचे महार तुम्ही सर्वाना देऊ शकतील. तेव्हा धर्मातरापासून महारकी वतनाला धोका येणार आहे, अशी भीती कोणीही बालगू नये.
दुसरी शंका राजकीय हक्कासंबंधी आहे. धर्मांतर केले तर आमच्या राजकीय हवकांचे काय होईल अशी ही शंका पुष्कल लोकांकडून प्रदर्शित करण्यात येते. अस्पृश्य वर्गाला मुळालेल्या राजकीय हवकांचे महत्व मी ओळखीत नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही, हे राजकिय हक्क मिळण्याकरिता जेवढी दगदग व देवता पराकाष्ठा मी केली तेवढा दगदग व तेवढी पराकाष्ठा इतर कोणीही केलेली नाहीं तथापि राजकीय हक्कावरच सर्वस्व भर देणे योग्य होणार नाही, असे मला वाटते. जे राजकिय हक्क दिले आहेत ते काही यावश्चंद्र दिवाकरौ अशा अटीवर दिलेले नाहीत. ते कधी ना कधी संपुष्टात येतील. इंग्रज सरकारने जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलेल्या राजकीय हक्कांची कालमर्यादा विस वर्षाचा उरविलेली होती. पुढे करारात तशा प्रकारचा काल मर्यादा निश्चित केलेली नसली तरी त्यातील मुदत अमर्याद आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाहीं ज्यांचा राजकीय हक्कांवर भर आहे त्यांना हे राजकीय हक्क गेल्यावर मग काय होईल याचा विचार अवश्य करावा. ज्या दिवशी हे राजकीय हक्क जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावर अवलंबन राहावे लागेल. ते सामर्थ आपल्या अंगी नाही, हे मी वर सांगितलेच आहे. ते सामर्थ धर्मांतर केल्या शिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. हे हि या वर सिद्ध करून दिले आहे.
कोणत्याही माणसाने जवळचा विचार करून भागणार नाही. तात्पुरत्या लाभाला लाभाला जाऊन शाश्वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करणे हे अंती दुखदायक होणार आहे. अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टीत साठविलेला आहे, याचा विचार सर्वानी अवश्य करावयास पाहिजे. माझ्या मते शाश्वत हिताच्या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे त्याकरिता राजकीय हक्कांचा जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणीही भीक घालू नये. धर्मातराने राजकीय हक्कांस धोका नाही परंतु धर्मातर केले असता आपल्या राजकीय हक्काला का धोका बसवा, हेच मला समजत नाही. तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते तुम्ही कोठे ही गेला असता तुमच्या बरोबर येतील. याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. तुम्ही मुसलमान झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणुन तुम्हाला मिळतील. तुम्ही शीख झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणुन तुम्हाला मिळतील. राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून आहेत. ज्या समाजाची लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकीय हक्क हि वाढतील. आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आपल्या पंधरा जागा राहिलेल्या हिंदूंच्या वाट्यास जातील असा काणीही आपला भ्रम करून घेऊ नये. आणि मुसलमान झालो तर आमच्या पंधरा जागा मुसलमान लोकांना ज्या हल्ली जागा प्राप्त झाल्या आहेत त्यांच्यात भरीला पडतील, आम्ही खिस्ती झालो तर आमच्या जागा खिस्ती समाजाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्यांच्या पूर्णता जातील. एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जिकडे जाऊ तिकडे जातील. तेव्हा या बाबतीत भिण्याचे असे काहीच कारण नाही उलटपक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदु धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय, याचा विचार तुम्ही अवश्य केला पाहिजे. समजा हिंदू लोकांना अस्पृश्यता मानू नये व मानल्यास तो गुन्हा आहे, असा एक कायदा पास केला व तसा कायदा पास केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला कि तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे. आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाहीत. फार तर तुम्ही गरीब व दरिद्री आहात. तुमच्या प्रमाणे इतर जातीत हि दरिद्री आहेत. परंतु अशा दरिद्री जातीना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत. मग तुम्हाला का द्यावेत? या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा तुम्हा पूर्णपणे विचार करावयास पाहिजे. मुसलमान लोकांना खिस्ती लोकांना याचे उत्तर सहज देता येण्यासारखे आहे. आमचा समाज दरिद्री आहे, अज्ञानी आहे, मागासलेला आहे. म्हणून आम्हास स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आले आहेत असे नसून, आमचा धर्म निराळा आहे आमचा समाज निराळा आहे आणि जोपर्यंत आमचा धर्म निराळा आहे तोपर्यंत राजकीय हक्काचा वाटा आम्हास मिळाला पाहिजे, असे समर्थक उत्तर ते देऊ शकतील. तुमचा समाज निराळा, तुमचा धर्म निराळा म्हणून तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदु धर्मात आहात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी हि भूमिका तुम्हाला घेता येईल. तोपर्यंत घेता येणार नाही आणि जोपर्यत अशा स्वतंत्र भूमिकेवर राहून तुमच्या राजकीय हक्काची मागणी तुम्ही करू शकत नाही. तोपर्यत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत. त्यास धोका नाही, असे समजून चालणे अत्यंत अज्ञान पणाचे लक्षण आहे असे मला वाटते. या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतर राजकीय हक्कांना विरोधी नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे असेच म्हटले पाहिजे. तुम्ही हिंदु धर्मात राहिले तर तुमचे राजकीय हक्क जातील. तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यावयाचे नसतील तर धर्मांतर करा. धर्मांतराने ते कायम राहणार आहेत.
मी माझा निश्चित करून टाकलेला आहे. मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मातर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही कि अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही. माझ्या धर्मातराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धांला पटु शकत नाही. हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही. तुम्हाला मात्र अध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरिता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐहिक लाभाकरिता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अशा लोकांना मूर्ख म्हणण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावरती आत्म्याचे काय होईल? हे सांगणारा धर्म श्रीमंताच्या उपयोगाचा असेल. फावल्या वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन त्यांना करता येईल. जिवंतपणी त्यांनी सौंख्य भोगले त्यांना आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिक आहे पण त्यांचा अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राख रांगोळी झाली आहे. जे अन्न वसाला मौताज झाले आहेत. त्यांचा माणुसकी नाहीशी झाला आहे. त्या लोकांनी धर्माचा ऐहिक दृष्टया विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहात राहावे? या गर्भ श्रीमंत रिकाम टेकड्याच्या वेदांताचा गोर गरिबाला काय उपयोग?