मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ठराव १ ला - (अ) मुंबई इलाख्यातील महार जातीचा हा परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते कि महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच न्याय आहे. हा परिषद आमच एकमेव परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिक रित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.
(ब) पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये. हिंदूंचे सण, व्रत वैकत्ये, उपाषणे वैगेरे पाळू नयेत व हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नयेत. तिर्थाटने, वैगेरे करू नयेत. अशी या परिविक्षा महार जातीला सूचना आहे.
हा ठराव नाशिकचे सुप्रसिद्ध पुढारी श्री. भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी मांडला तर या ठरावाला धारवाडचे श्रा. एस. एस. वराळे यांना अनुमोदन दिले आणि त्यानी त्यानुसार आपले विचार प्रकट केले. या ठरावाला पाठिबा दर्शविताना अहमद नगरचे श्री. पी. जे. रोहम, जनाबाई मोरे, कु. राजुबाई गायकवाड, सौ. सोनुबाई डावरे, कु. भागिरथीबाई तांबे कुलाब्याचे प्रमुख पुढारी श्री. विश्राम गंगाराम सवादकर यांची भाषणे झाली
दि. ३१ में १९३६ रोजी अखिल मुंबई इलाखा महार परिषदेला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.